Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 21

63 Mantra
8/21
Devata- गृहपतयो देवताः Rishi- अत्रिर्ऋषिः Chhand- स्वराट आर्षी उष्णिक्, Swara- ऋषभः
Mantra with Swara
देवा॑ गातुविदो गा॒तुं वि॒त्त्वा गा॒तुमि॑त। म॒न॑सस्पतऽइ॒मं दे॑व य॒ज्ञꣳ स्वाहा॒ वाते॑ धाः॥२१॥

देवाः॑। गा॒तु॒वि॒द॒ इति॑ गातुऽविदः। गा॒तुम्। वि॒त्त्वा। गा॒तुम्। इ॒त॒। मन॑सः। प॒ते॒। इ॒मम्। दे॒व॒। य॒ज्ञम्। स्वाहा॑। वाते॑। धाः॒ ॥२१॥

Mantra without Swara
देवा गातुविदो गातुँ वित्त्वा गातुमित । मनसस्पत इमन्देव यज्ञँ स्वाहा वाते धाः ॥

देवाः। गातुविद इति गातुऽविदः। गातुम्। वित्त्वा। गातुम्। इत। मनसः। पते। इमम्। देव। यज्ञम्। स्वाहा। वाते। धाः॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (गृहस्थांचे वचन) हे (गातुविद:) आपल्या गुण, कर्म आणि स्वभावाने पृथ्वीच्या गती-परिभ्रमण आदीनां जाणणार्‍या आणि (देवा:) सत्य-असत्याच्या विवेकाचा प्रसार करणार्‍या विद्वज्जनहो, आपण (गातुम्) भूगर्भविद्या आणि भूगोलाचे (नित्त्वा) ज्ञान प्राप्त करून (गातुम्) पृथ्वीवर योग्य आणि उत्तम कर्म करण्यासाठी तसेच सर्वांवर उपकार करण्यासाठी (इत्) प्राप्त व्हा. (भूगर्भ व भूपृष्ठ यांतील ज्ञान मिळवून प्राणिमात्राना सुखकर व्हा) हे (मनसस्पते) इंद्रियांचा संयम करणारे (देव) श्रेष्ठविद्यासंपन्न विद्वज्जनहो, आपणांपैकी प्रत्येक विद्वानांने (स्वाहा) धर्मवर्धक कार्यांद्वारे (इयम्) या गृहाश्रमरुप (यज्ञम्) सर्वसुखदायी यज्ञाचे (वाते) विशेष ज्ञान मिळवून त्याचा विशेष उपयुक्त कामात (धा:) उपयोग करावा ॥21॥
Essence
भावार्थ - गृहस्थांकरिता आवश्यक आहे की त्यांनी अत्यंत यत्न करून भुगर्भ विद्येचे ज्ञान संपादित करावे आणि इंद्रियांवर विजय मिळवून परोपकार करीत गृहस्थाश्रमाच्या कर्तव्य-कर्मांचे पालन करावे अशाप्रकारे स्वत: उन्नती करून प्राणिमात्रास सुख द्यावे. ॥21॥
Subject
पुनष्च पुढील मंत्रात देखील गृहस्थांच्या कर्त्तव्याविषयी सांगितले आहे -