Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 2

63 Mantra
8/2
Devata- गृहपतिर्मघवा देवता Rishi- आङ्गिरस ऋषिः Chhand- भूरिक् पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
क॒दा च॒न स्त॒रीर॑सि॒ नेन्द्र॑ सश्चसि दा॒शुषे॑। उपो॒पेन्नु म॑घव॒न् भूय॒ऽइन्नु ते॒ दानं॑ दे॒वस्य॑ पृच्यतऽआदि॒त्येभ्य॑स्त्वा॥२॥

क॒दा। च॒न। स्त॒रीः। अ॒सि॒। न। इ॒न्द्र॒। स॒श्च॒सि॒। दा॒शुषे॑। उपो॒पेत्युप॑ऽउप। इत्। नु। म॒घ॒व॒न्निति॑ मघऽवन्। भूयः॑। इत्। नु। ते॒। दान॑म्। दे॒वस्य॑। पृ॒च्य॒ते॒। आ॒दि॒त्येभ्यः॑। त्वा॒ ॥२॥

Mantra without Swara
कदा चन स्तरीरसि नेन्द्र सश्चसि दाशुषे । उपोपेन्नु मघवन्भूय इन्नु ते दानन्देवस्य पृच्यतेऽआदित्येभ्यस्त्वा ॥

कदा। चन। स्तरीः। असि। न। इन्द्र। सश्चसि। दाशुषे। उपोपेत्युपऽउप। इत्। नु। मघवन्निति मघऽवन्। भूयः। इत्। नु। ते। दानम्। देवस्य। पृच्यते। आदित्येभ्यः। त्वा॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पत्नी म्हणते) हे ऐश्वर्यवान पतिराज, आपण (पदा) (चन) कधीही (स्तरी:) मनातील भाव वा स्वभावाला लपविणारे (न) असि) नाहींत. (आपण स्पष्ट व सत्य बोलता) आपण (दाशुषे) दान देणार्‍या (उपोय) जवळ (सश्चसि) प्राप्त होता (म्हणजे दान देण्यासाठी व घेण्यासाठी ही तत्पर असता) (मधवन्) प्रशंसनीय ऐश्वर्याचे स्वामी हे पतिराज, (देवस्य) (ते) आपल्यासारख्या विद्वानांचे जे (दामन्) दान आहे म्हणजे आपण जे उत्तम ज्ञान व धनादी पदार्थांचे दान करता (इत्) ते (नु) लवकरच (भूय:) अधिक वृद्धींगत होऊन मला (प्रच्यते) मिळावे (आपल्या दानवृत्तीमुळे आपले धन दुपटीने वाढावे) यासाठी मी आपली पत्नी म्हणून (आदित्येभ्य:) दरमहा मला सुख देणार्‍या अशा आपल्या आश्रयाला येते. (दरमहा आपल्याकडून मिळणार्‍या धनाने गृहाची व्यवस्था करते)॥2॥
Essence
भावार्थ - विवाहेच्छू युवतीने कामना करावी की तिला असाच पती मिळावा की जो छळ-छद्मापासून दूर, एकच पत्नी इच्छा करणारा, जितेन्द्रिय, उद्योगशील, धार्मिक आणि विद्वान आहे. अशाच पुरुषाशी विवाह करून युवती स्त्रीने आनंदात रहावे. ॥2॥
Subject
पुढील मंत्रात गृहस्थधर्माविषयी उपदेश केला आहे -
Footnote
(टीप- येथे ‘जितेन्द्रिय’ शब्दाचा ‘कुमार्गगामी वा व्यभिचारी नसलेला-अपकीर्ती नसलेला‘ हा अर्थ घ्यावा)