Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 18

63 Mantra
8/18
Devata- गृहपतयो देवताः Rishi- अत्रिर्ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
सु॒गा वो॑ देवाः॒ सद॑नाऽअकर्म॒ यऽआ॑ज॒ग्मेदꣳ सव॑नं जुषा॒णाः। भ॑रमाणा॒ वह॑माना ह॒वीष्य॒स्मे ध॑त्त वसवो॒ वसू॑नि॒ स्वाहा॑॥१८॥

सु॒गेति॑ सु॒ऽगा। वः॒। दे॒वाः॒। सद॑ना। अ॒क॒र्म॒। ये। आ॒ज॒ग्मेत्या॑ऽज॒ग्म। इ॒दम्। सव॑नम्। जु॒षा॒णाः। भर॑माणाः। वह॑मानाः। ह॒वीꣳषि॑। अ॒स्मेऽइत्य॒स्मे। ध॒त्त॒। व॒स॒वः॒। वसू॑नि। स्वाहा॑ ॥१८॥

Mantra without Swara
सुगा वो देवाः सदना अकर्म य आजग्मेदँ सवनञ्जुषाणाः । भरमाणा वहमाना हवीँष्यस्मे धत्त वसवो वसूनि स्वाहा ॥

सुगेति सुऽगा। वः। देवाः। सदना। अकर्म। ये। आजग्मेत्याऽजग्म। इदम्। सवनम्। जुषाणाः। भरमाणाः। वहमानाः। हवीꣳषि। अस्मेऽइत्यस्मे। धत्त। वसवः। वसूनि। स्वाहा॥१८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (वसव:) श्रेष्ठगुण प्राप्त करण्यात आनंद मानणार्‍या (देवा:) सांसारिक गृहस्थजनहो, (स्वाहा) उत्तम व्यवहाराद्वारे प्राप्त (इदम्) या (सवनम्) ऐश्वर्य-संपदेचे (जुषाणा:) सेवन करीत तसेच (भरमाणा:) त्याचे रक्षण व धारण करीत आम्ही घरातील वरिष्ठ वयोवृद्ध जन इतरजन इच्छा करीत असतांनाही (सुगा) सहजतेने प्राप्तव्य आणि (सदना) सर्वांना हवे व आवश्यक वाटणार्‍या (हवींषि) देण्या-घेण्यास योग अशा (वसूनि) धन-ऐश्वर्याला तुमच्याकरिता (अकर्म) प्रकट करीत आहोत, (ते घर तुमच्यासाठी व्यय करीत आहोत अथवा तुम्हास देत आहोत) व ते देण्यासाठी तुमच्याजवळ (आजन्म) आलो आहे, (अस्मे) आमच्यासाठी म्हणजे (आमच्याकडून होणार्‍या आग्रहामुळे त्या (वसूनि) धनाचा तुम्ही (धत्त) स्वीकार करा. ॥18॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे घरातील पिता, पती, श्वसूर, सासू आणि मित्रगण आपल्या पुत्र, कन्या, पत्नी, सून तसेच मित्र व सेवक, या सर्वांचे पालन करीत त्यांना सुख देतात, त्याप्रमाणे पुत्र, कन्या, सून आदींनी देखील आपल्या घरातील वरिष्ठ मंडळीची सेवा केली पाहिजे. ॥18॥
Subject
पुढील मंत्रातदेखील गृहकर्माविषयी उपदेश केला आहे -