Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 17

63 Mantra
8/17
Devata- विश्वेदेवा गृहपतयो देवताः Rishi- अत्रिर्ऋषिः Chhand- स्वराट आर्षी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
धा॒ता रा॒तिः स॑वि॒तेदं जु॑षन्तां प्र॒जाप॑तिर्निधि॒पा दे॒वोऽअ॒ग्निः। त्वष्टा॒ विष्णुः॑ प्र॒जया॑ सꣳररा॒णा यज॑मानाय॒ द्रवि॑णं दधात॒ स्वाहा॑॥१७॥

धा॒ता। रा॒तिः। स॒वि॒ता। इदम्। जु॒ष॒न्ता॒म्। प्र॒जा॑पति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः। नि॒धि॒पा इति॑ निधि॒ऽपाः। दे॒वः। अ॒ग्निः। त्वष्टा॑। विष्णुः॑। प्र॒जयेति॑ प्र॒ऽजया॑। स॒ꣳर॒रा॒णा इति॑ सम्ऽर॒रा॒णाः। यज॑मानाय। द्रवि॑णम्। द॒धा॒त॒। स्वाहा॑ ॥१७॥

Mantra without Swara
धाता रातिः सवितेदञ्जुषन्ताम्प्रजापतिर्निधिपा देवो अग्निः । त्वष्टा विष्णुः प्रजया सँरराणा यजमानाय द्रविणन्दधात स्वाहा ॥

धाता। रातिः। सविता। इदम्। जुषन्ताम्। प्रजापतिरिति प्रजाऽपतिः। निधिपा इति निधिऽपाः। देवः। अग्निः। त्वष्टा। विष्णुः। प्रजयेति प्रऽजया। सꣳरराणा इति सम्ऽरराणाः। यजमानाय। द्रविणम्। दधात। स्वाहा॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (विद्वज्जन म्हणत आहेत) हे गृहस्थजनहो, तुम्ही (धाता) गृहस्थाश्रम धर्माचे श्रेष्ठ पालन करण्यासाठी (राति:) सर्वांना सुख देण्यासाठी (सविता) समस्त ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी (प्रजापति:) संतानें आदींच्या पालनकर्मासाठी (निधिपा:) विद्यारुप निधीच्या प्राप्तीसाठी (ऋद्धि:) धन-समृद्धीच्या रक्षणासाठी (देव:) दोषांवर विजय मिळविण्यासाठी (अग्नि:) अविद्यारुप अंधकाराला भस्म करण्यासाठी (त्वष्टा) सुखवृद्धीसाठी (विष्णु:) समस्त उत्तम शुभ कर्म करणार्‍या विद्वानांप्रमाणे व्हा. आणि (प्रजमा) आपल्या संततीसह (संरराणा:) दानधर्म करीत व (स्वाहा) सत्याचरण करीत (इदम्) या गृहाश्रमाचे (जुषन्ताम्) प्रीतीने सेवन करा. तसेच ज्या कार्यामुळे व धनामुळे (यजमानाय) यज्ञानुष्ठान करणार्‍या गृहस्थाचे बळ-सामर्थ्य वाढत जाईल, तसेच अधिकाअधिक बलवान पुरुषांची संख्यावृद्धी होईल, अशा (द्रविणम्) धनाचे (दधात) स्वामी व्हा. (यज्ञ करणार्‍या गृहस्थाला दानादीद्वारे सहाय्य करा) ॥17॥
Essence
भावार्थ - गृहस्थजनांनी यथोचित रीतीने गृहाश्रम जीवन व्यतीत करीत सद्गुण धारण व सत्कर्म करावे, आपल्या ऐश्वर्याची उन्नती आणि रक्षण करावे. तसेच संततीचे पालन करण्याबरोबरच योग्य व्यक्तींना दान देत, दु:खीजनांना दु:खापासून मुक्त करीत. शूत्रंना पराजित करून आपल्या शारीरिक व आत्मिक शक्ती वाढविण्यासाठी, सद्गुणधारणास सदैव प्रवृत्त असावे. ॥17॥
Subject
पुन्हा पुढील मंत्रात गृहस्थांच्या कर्माविषयीच सांगितले आहे -