Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 14

63 Mantra
8/14
Devata- गृहपतयो देवताः Rishi- भरद्वाज ऋषिः Chhand- विराट आर्षी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
सं वर्च॑सा॒ पय॑सा॒ सं त॒नूभि॒रग॑न्महि॒ मन॑सा॒ सꣳशि॒वेन॑। त्वष्टा॑ सु॒दत्रो॒ वि द॑धातु॒ रायोऽनु॑मार्ष्टु त॒न्वो यद्विलि॑ष्टम्॥१४॥

सम्। वर्च॑सा पय॑सा। सम्। त॒नूभिः॑। अग॑न्महि। मन॑सा। सम्। शि॒वेन॑। त्वष्टा॑। सु॒दत्र॒ इति॑ सु॒ऽदत्रः॑। वि। द॒धा॒तु॒। रायः॑। अनु॑। मा॒र्ष्टु॒। त॒न्वः᳖। यत्। विलि॑ष्ट॒मिति॒ विऽलि॑ष्टम् ॥१४॥

Mantra without Swara
सँवर्चसा पयसा सन्तनूभिरगन्महि मनसा सँ शिवेन । त्वष्टा सुदत्रो वि दधातु रायो नु मार्ष्टु तन्वो यद्विलिष्टम् ॥

सम्। वर्चसा पयसा। सम्। तनूभिः। अगन्महि। मनसा। सम्। शिवेन। त्वष्टा। सुदत्र इति सुऽदत्रः। वि। दधातु। रायः। अनु। मार्ष्टु। तन्वः। यत्। विलिष्टमिति विऽलिष्टम्॥१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - सर्व विद्यांचे अध्ययन करणारे, (त्वष्य) सर्वश्रेष्ठ व्यवहारांचे पालन करणारे (सुदत्र:) अत्युत्तम दान देणारे हे विद्वान महोदय, आपण (संशिवेन) उचित कल्याणकारी (मनसा) बुद्धी आणि मनाने (संवर्घसा) आणि अध्ययन-अध्यापनाद्वारे (पयसा) तसेच उत्तम जल आणि अन्नाद्वारे (यत्) ज्या (तन्व:) शरीराचा (विलिष्टम्) न्यूनतेला (अनुमार्ष्टु) पूर्ण करता (शरीराला पूर्ण स्वस्थ करता) आणि (राय:) श्रेष्ठ संपदेला (विदधातु) प्राप्त करता, त्याचप्रकारे आम्ही (सामान्यजनांनी) देखील (तनूभि:) ब्रह्मचर्य आदी व्रतांचे व उचित निममांचे पालन करून शरीर बलवान करावे आणि (समगन्माहि) त्या बलयुक्त शरीराने श्रेष्ठ कार्यें संपन्न करावीत. ॥14॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांनी पुरुषार्थाद्वारे विद्या संपादन करावे, यथाविधी अन्न व जलाचे सेवन करावे, शरीर नीरोग ठेवावे आणि मनाला धर्मकार्यात मन लीन ठेवून सुखाची वृद्धी करीत रहावे. याशिवाय शरीर आणि मनात जी काही न्यूनता असेल, ती दूर करावी. ज्याप्रमाणे तुमचा कोणी मित्र तुम्हास सुखी करण्यासाठी यंत्र करतो वा तुमच्याशी आचरण करतो, तसेच यज्ञ व आचरण तुम्हीदेखील त्याच्यासाठी करावे. ॥14॥
Subject
पुढील मंत्रात पुन्हा त्याला उद्देश मित्राचे कर्त्तव्यांविषयी उपदेश केला आहे -