Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 12

63 Mantra
8/12
Devata- गृहपतयो देवताः Rishi- भरद्वाज ऋषिः Chhand- आर्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
यस्ते॑ऽअश्व॒सनि॑र्भ॒क्षो यो गो॒सनि॒स्तस्य॑ तऽइ॒ष्टय॑जुष स्तु॒तस्तो॑मस्य श॒स्तोक्थ॒स्योप॑हूत॒स्योप॑हूतो भक्षयामि॥१२॥

यः। ते॒। अ॒श्व॒सनि॒रित्य॑श्व॒ऽसनिः॑। भ॒क्षः। यः। गो॒सनि॒रिति॑ गो॒ऽसनिः॑। तस्य॑। ते॒। इ॒ष्टय॑जुष॒ इती॒ष्टऽय॑जुषः। स्तु॒तस्तो॑म॒स्येति॑ स्तु॒तऽस्तो॑मस्य। श॒स्तोक्थ॒स्येति॑ श॒स्तऽउ॑क्थ॒स्य। उप॑हूत॒स्येत्युप॑ऽहूतस्य। उप॑हूत॒ इत्युप॑ऽहूतः। भ॒क्ष॒या॒मि॒ ॥१२॥

Mantra without Swara
यस्ते अश्वसनिर्भक्षो यो गोसनिस्तस्य त इष्टयजुष स्तुतसोमस्य शस्तोक्थस्योपहूतो भक्षयामि ॥

यः। ते। अश्वसनिरित्यश्वऽसनिः। भक्षः। यः। गोसनिरिति गोऽसनिः। तस्य। ते। इष्टयजुष इतीष्टऽयजुषः। स्तुतस्तोमस्येति स्तुतऽस्तोमस्य। शस्तोक्थस्येति शस्तऽउक्थस्य। उपहूतस्येत्युपऽहूतस्य। उपहूत इत्युपऽहूतः। भक्षयामि॥१२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पत्नी म्हणते) हे प्रिय वीर पुरुष माझे पती आणि मित्र, आपण (उपहूत:) माझ्याकडून सत्कार करण्यास पात्र आहात. आपण (घरासाठी) (अश्वसीन:) अग्नी आदी पदार्थ अथवा घोडे आदी पशू देणारे आहात आणि (गोसनि:) संस्कृत वाणी बोलणारे, भूमीची वृद्धी आणि विद्येचा प्रकाश करणारे (असि) आहात. (शक्तोस्शस्य) ऋग्वेदाच्या सक्तांनी युक्त (इष्टयजुष:) इष्ट सुखकारक यजुर्वेदाच्या भागाने संयुक्त आणि (स्तुतसोमस्य) सोमवेदगानाची प्रशंसा करणारे अशा (ते) ‘आपला जो (भक्ष:) प्रिय इष्ट भक्ष्य पदार्थ आहे, आपण तो मला देऊन माझा जो सत्कार केला आहे, त्या रुचिकर पदार्थाचे मी भोजन करतो. (पती म्हणतो) हे प्रिय पत्नी, माझी सखी, तू या घरात अग्नी आदी पदार्थांचा उपयोग करतेस, घोडे आदी पशूंचे पालन करतेस, आणि सुमधुर सुसंस्कृत वाणी बोलत विद्येचा विकास करतेस, प्रशंसनीय ऋक्सूत्र आणि सामगानाने तू ज्या भोज्य पदार्थांचे सेवन करतेस, त्या स्वादिष्ट पदार्थाचा सेवन करण्यासाठी तू जेव्हा मोठ्या आदराने मला बोलावतेस, तेव्हा मी मोठ्या आनंदाने त्याचे सेवन करतो. (पति-पत्नींनी एकमेकाच्या आवडीचे भोज्य पदार्थ एकमेकास आग्रह करून द्यावेत वाढावेत) ॥12॥
Essence
missing
Subject
पुढील मंत्रात गृहस्थांच्या मैत्रीविषयी सांगितले आहे -