Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 10

63 Mantra
8/10
Devata- गृहपतयो देवताः Rishi- भरद्वाज ऋषिः Chhand- विराट ब्राह्मी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
अग्ना३इ पत्नी॑वन्त्स॒जूर्दे॒वेन॒ त्वष्ट्रा॒ सोमं॑ पिब॒ स्वाहा॑। प्र॒जाप॑ति॒र्वृषा॑सि रेतो॒धा रेतो॒ मयि॑ धेहि प्र॒जाप॑तेस्ते॒ वृष्णो॑ रेतो॒धसो॑ रेतो॒धाम॑शीय॥१०॥

अग्नाऽ२इ। पत्नी॑व॒न्निति॒ पत्नी॑ऽवन्। स॒जूरिति॑ स॒ऽजूः। दे॒वेन॑। त्वष्ट्रा॑। सोम॑म्। पि॒ब॒। स्वाहा॑। प्र॒जाप॑ति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः। वृषा॑। अ॒सि॒। रे॒तो॒धा इति॑ रेतःऽधः। रेतः॑। मयि॑। धे॒हि॒। प्र॒जाप॑ते॒रिति॑ प्र॒जाऽप॑तेः। ते॒। वृष्णः॑। रे॒तो॒धस॒ इति॑ रेतः॒ऽधसः॑। रे॒तो॒धामिति॑ रे॒तःऽधाम्। अ॒शी॒य॒ ॥१०॥

Mantra without Swara
अग्ना३इ पत्नीवन्त्सजूर्देवेन त्वष्ट्रा सोमम्पिब स्वाहा । प्रजापतिर्वृषासि रेतोधा रेतो मयि धेहि प्रजापतेस्त वृष्णो रेतोधसो रेतोधामशीय ॥

अग्नाऽ२इ। पत्नीवन्निति पत्नीऽवन्। सजूरिति सऽजूः। देवेन। त्वष्ट्रा। सोमम्। पिब। स्वाहा। प्रजापतिरिति प्रजाऽपतिः। वृषा। असि। रेतोधा इति रेतःऽधः। रेतः। मयि। धेहि। प्रजापतेरिति प्रजाऽपतेः। ते। वृष्णः। रेतोधस इति रेतःऽधसः। रेतोधामिति रेतःऽधाम्। अशीय॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पत्नी म्हणजे) हे समस्त सुखदाता स्वामिन्, (सजू:) मी आपल्यावर करीत असलेल्या प्रेमाप्रमाणे आपण माझ्यावर प्रेम करता. (देवेन) दिव्य सुख देणारे आणि (त्वष्ट्रा) समस्त दु:खविनाश तसेच (स्वाहा) सत्यवचन आणि सत्य-व्यवहार करणारे आहात. या (सोमम्) सोमवल्ली आदी औषधींपासून तयार केलेले हे विशेष आसव आपण (पिब) प्या. हे (पत्नीवत्) आपल्या प्रिय स्त्रीला पत्नी म्हणून ग्रहण करणारे (वृषा) वीर्यसिंचन करणारे (रेतोधा:) वीर्यवान आणि (प्रजापति:) सन्तानांचे पालन करणारे, (असि) आहात (मयि) माझ्यात म्हणजे विवाहिता पत्नीमध्ये (रेत:) वीर्याचे (धेहि) आधान करा. हे स्वमिन्, (वृष्ण:) वीर्यसिंचन करण्यास समर्थ असलेल्या (प्रजापते:) संतानांचे रक्षण करणार्‍या (ते) अशा आपल्या पतीशी समागम करून (रेतोधाम्) मी वीर्यवान अतिपराक्रमी पुत्रास (अशीय) प्राप्त करावे, अशी माझी कामना आहे. ॥10॥
Essence
भावार्थ - या संसारात मनुष्य जन्म स्त्री-पुरुषांनी मिळाल्यानंतर ब्रह्मचर्य धारण करीत उत्तम विद्या, सद्गुण आणि शक्ती मिळविल्यानंतरच विवाह करावा. विवाहाच्या वेळी किंवा गृहाश्रमात घातलेल्या मर्यादा, नियम आदींचे पालन करीत संतानेत्पत्ती करावी आणि रतिक्रीडेद्वारे मिळणारे आनंद प्राप्त करीत सुखी असावे. विवाह केल्याशिवाय स्त्रीने पुरुषाशी तसेच पुरूषाने स्त्रीशी समागमाची इच्छा देखील करूं नये. ज्या योगे मनुष्य-समाजाची शक्ती वाढत राहील, स्त्री-पुरुषांनी अशाच प्रकारचे गृहाश्रम धर्म आचरावे. ॥10॥
Subject
पत्नीने आपल्या पतीची कशाप्रकारे प्रशंसा आणि काय प्रार्थना करावी, पुढील मंत्रात याविषयी उपदेश केला आहे -