Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 8

48 Mantra
7/8
Devata- इन्द्रवायू देवते Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- आर्षी गायत्री,आर्षी स्वराट् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
इन्द्र॑वायूऽइ॒मे सु॒ताऽउप॒ प्रयो॑भि॒राग॑तम्। इन्द॑वो वामु॒शन्ति॒ हि। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि वा॒यव॑ऽइन्द्रवा॒युभ्यां॑ त्वै॒ष ते॒ योनिः॑ स॒जोषो॑भ्यां त्वा॥८॥

इन्द्र॑वायू॒ इ॒तीन्द्र॑ऽवायू। इ॒मे। सु॒ताः। उप॒ प्रयो॑भि॒रिति॒ प्रयः॑ऽभिः। आ॑गत॒म्। इन्द॑वः। वा॒म्। उ॒शन्ति॑। हि। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। वा॒यवे॑। इ॒न्द्रवा॒युभ्या॒मिती॑न्द्रवा॒युऽभ्या॑म्। त्वा॒। ए॒षः। ते। योनिः॑। स॒जोषो॑भ्यामिति॑ स॒जोषः॑ऽभ्याम्। त्वा॒ ॥८॥

Mantra without Swara
इन्द्रवायू इमे सुताऽउप प्रयोभिरागतम् इन्दवो वामुशन्ति हि उपयामगृहीतो सि वायव इन्द्रवायुभ्यात्वैष ते योनिः सजोषेभ्यां त्वा ॥

इन्द्रवायू इतीन्द्रऽवायू। इमे। सुताः। उप प्रयोभिरिति प्रयःऽभिः। आगतम्। इन्दवः। वाम्। उशन्ति। हि। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। वायवे। इन्द्रवायुभ्यामितीन्द्रवायुऽभ्याम्। त्वा। एषः। ते। योनिः। सजोषोभ्यामिति सजोषःऽभ्याम्। त्वा॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (इन्द्रवायू) योगशास्त्र शिकणार्‍या आणि शिकविणार्‍या योगसाधकांनी तुम्ही प्राणाप्रमाणे आणि सुर्याप्रमाणे बलवान व तेजस्वी आहात. (हि) या शक्तीने (इमे) (सुता:) हे उत्पन्न झालेले (इन्दव:) सुखकारक जलआदी पदार्थ (वाम्) तुम्हा दोघांना (उशन्ति) प्राप्त होतात. या योगशक्तीमुळे तुमच्याकडे (प्रयोभि:) जगातील मनोहर पदार्थ (आगतम्) येतात (योगामुळे ऋद्धी-सिद्धीची प्राप्ती होते) - हे योगसाधका, जो योगशास्त्र शिकवणार्‍या अध्यापकाकडून (वायवे) वायूप्रमाणे योगसिद्धी प्राप्त करण्याकरिता अथवा योगबलाने चराचर सृष्टीचे ज्ञान प्राप्त करण्याकरिता तसेच (उपयामगृहीत:) योगाच्या यम-नियम आदी आठ अंगाचे शिक्षण घेण्यास तू (असि) पात्र ठरला आहेस. साधकशिष्याचे वचन) हे योगाध्यापक भगवन्, (एष:) हा योग (ते) तुमच्यासाठी (योनि:) सर्व दु:खाचे निवारण करणार्‍या सुखदायी घराप्रमाणे आहे. (इन्द्रवायुभ्याम्) विद्युत आणि प्राणवायूप्रमाणे योगशक्तीची वृद्धी करणार्‍या, समाधी अवस्थेत जाणार्‍या आणि परत (सामान्य अवस्थेत) येणार्‍या हे योगाध्यापका, आपणांस या शक्ती व स्थिती (जुष्टम्) प्रसन्न आहेत (तुम्हांस सर्व योगसिद्धी अवगव आहे) मी अशा शक्तीसंपन्न (त्वा) आपणाकडे येऊ इच्छितो. (अध्यापकाचे साधकाप्रत कथन) हे योगाची कामना करणार्‍या साधका, (सजेषिभ्याम्) तू पूर्वोक्त गुणांना प्राप्त कर. (माझ्याप्रमाणे योगशक्ती संपन्न होण्यासाठी) मीही तुला चाहतो की ज्यामुळे तुला व मला सुख मिळेल. ॥8॥
Essence
भावार्थ - जे मनुष्य योगविद्याभ्यास करून ईश्वरापासून पृथ्वीच्या सर्व पदार्थांचा साक्षात्कार करण्याचा (त्याचे ज्ञान प्राप्त करण्याचा) यज्ञ करतात, ते पूर्ण योगी होऊन योगशास्त्रात सिद्ध होतात. तसेच यमनियम आदी साधनांत रममाण असणारे आणि योगाच्या सिद्धींचे सेवन करणारे लोक देखील योगसिद्धी प्राप्त करतात, अन्य लोकांना ते अशक्य आहे ॥8॥
Subject
तो योगी कसा असतो, हे पुढील मंत्रात सांगितले आहे -