Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 6

48 Mantra
7/6
Devata- योगी देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- भूरिक् त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
स्वाङ्कृ॑तोऽसि॒ विश्वे॑भ्यऽइन्द्रि॒येभ्यो॑ दि॒व्येभ्यः॒ पार्थि॑वेभ्यो॒ मन॑स्त्वाष्टु॒ स्वाहा॑ त्वा सुभव॒ सूर्या॑य दे॒वेभ्य॑स्त्वा मरीचि॒पेभ्य॑ऽउदा॒नाय॑ त्वा॥६॥

स्वाङ्कृ॑त॒ इति॒ स्वाम्ऽकृ॑तः। अ॒सि॒। विश्वे॑भ्यः। इ॒न्द्रि॒येभ्यः। दि॒व्येभ्यः॑। पार्थि॑वेभ्यः। मनः॑। त्वा॒। अ॒ष्टु॒। स्वाहा॑। त्वा॒। सु॒भ॒वेति॑ सुऽभव। सूर्य्या॑य। दे॒वेभ्यः॑। त्वा॒। म॒री॒चि॒पेभ्य॒ इति॑ मरीचि॒पेभ्यः॑। उ॒दा॒नायेत्यु॑त्ऽआ॒नाय॑। त्वा॒ ॥६॥

Mantra without Swara
स्वाङ्कृतोसि विश्वेभ्य इन्द्रियेभ्यो दिव्येभ्यः पार्थिवेभ्यो मनस्त्वाष्टु स्वाहा त्वा सुभव सूर्याय । देवेभ्यस्त्वा मरीचिपेभ्यः उदानाय त्वा ॥

स्वाङ्कृत इति स्वाम्ऽकृतः। असि। विश्वेभ्यः। इन्द्रियेभ्यः। दिव्येभ्यः। पार्थिवेभ्यः। मनः। त्वा। अष्टु। स्वाहा। त्वा। सुभवेति सुऽभव। सूर्य्याय। देवेभ्यः। त्वा। मरीचिपेभ्य इति मरीचिपेभ्यः। उदानायेत्युत्ऽआनाय। त्वा॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सुभव) सुशोभन एैश्वर्याने युक्त अशा हे योगिन्, तू (स्वड्कृत:) अनादीकाळापासून स्वयसिद्ध (असि) आहेस. (जीवाला म्हणून तू अनादी आहेस आणि योगसाधनेसाठी स्वयमेव तत्पर आहेस) मी परमेश्वर (विश्वेभ्य:) समस्त (दिव्येभ्य:) शुद्ध (देवेभ्य:) गुणवान आणि प्रशंसनीय विज्ञानांशी तसेच (मरीचिपेभ्य:) योगाकरिता आवश्यक कार्य व व्यवहारांशी (त्वा) तुला संयुक्त करीत आहे. (योगसाधनेसाठी तुला विद्वत्संगती आणि उत्तम व्यवहार करण्यास सांगत आहे.) तसेच (पार्थिवेभ्य:) पृथ्वीवरील प्रसिद्ध पदार्थांसाठी (त्वा) तुझा स्वीकार करीत आहे (तुझ्या ऐहिक साधने व उचित वातावरण देत आहे) तसेच मी (सूरर्याय) सूर्याच्या प्रकाशप्रमाणे योगविद्येचा प्रकाश पसरविण्यासाठी आणि (उदानाय) उत्कृष्ट जीवन व शक्ती देण्यासाठी (त्वां) तुझा स्वीकार करीत आहे. (माझ्या कृपेमुळे) (त्वा) योगाविषयी जिज्ञासा वा कामना करणार्‍या तुझ्या (मन:) योगसमाधियुक्त मन आणि (स्वाहा) योग करण्याची सत्य क्रिया वा पद्धती (अष्टु) प्राप्त होवो. ॥6॥
Essence
भावार्थ – जोपर्यंत माणूस श्रेष्ठाचारी होत नाही, तोपर्यंत ईश्वर त्याचा स्वीकार करीत नाही (त्यावर कृपा करीत नाही) आणि बलाची प्राप्ती होत नाही. जोपर्यंत साधकाजवळ वा मनुष्याजवळ आत्मशक्ती येत नाही, तोपर्यंत तो सुखी होऊ शकत नाही ॥6॥
Subject
पुढील मंत्रात योगविद्येची कामना करणार्‍या मनुष्यास ईश्वर उपदेश करीत आहे -