Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 5

48 Mantra
7/5
Devata- ईश्वरो देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- आर्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
अ॒न्तस्ते॒ द्यावा॑पृथि॒वी द॑धाम्य॒न्तर्द॑धाम्यु॒र्वन्तरि॑क्षम्। स॒जूर्दे॒वेभि॒रव॑रैः॒ ॒परै॑श्चान्तर्या॒मे म॑घवन् मादयस्व॥५॥

अ॒न्तरित्य॒न्तः। ते॒। द्यावा॑पृथि॒वीऽइति॒ द्यावा॑पृथि॒वी। द॒धा॒मि॒। अ॒न्तः। द॒धा॒मि॒। उ॒रु। अ॒न्तरि॑क्षम्। स॒जूरिति॑ स॒ऽजूः। दे॒वेभिः॑। अव॑रैः। परैः॑। च॒। अ॒न्त॒र्य्याम इत्य॑न्तःऽया॒मे। म॒घ॒वन्निति॑ मघऽवन्। मा॒द॒य॒स्व॒ ॥५॥

Mantra without Swara
अन्तस्ते द्यावापृथिवी दधाम्यन्तर्दधाम्युर्वन्तरिक्षम् । सजूर्देवेभिरवरैः परैश्चान्तर्यामे मघवन्मादयस्व ॥

अन्तरित्यन्तः। ते। द्यावापृथिवीऽइति द्यावापृथिवी। दधामि। अन्तः। दधामि। उरु। अन्तरिक्षम्। सजूरिति सऽजूः। देवेभिः। अवरैः। परैः। च। अन्तर्य्याम इत्यन्तःऽयामे। मघवन्निति मघऽवन्। मादयस्व॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(परमेश्वर योग्यास उपदेश करीत आहे) हे (मघवन्) योगी, मी परमेश्वर (ते) तुझ्या (अंत:) हृदयाकाशामध्ये (द्यावा पृथिवी) ज्याप्रमाणे सूर्य भूमीमध्ये विज्ञानासाठी आवश्यक पदार्थांची स्थापना करतो, त्याप्रमाणे मी तुझ्या हृदयात ज्ञानाची, यमादी योगाची (दधमि) स्थापना करतो. (उरु) विशाल (अन्रिक्षम्) आकाशाला (अन्त:) तुझ्या शरीरात (दधामि) धारण करण्यास सांगतो (आकाशाप्रमाणे विशाल अंत:करण व उदारवृत्ती असावी, असा आदेश देतो किंवा प्राण अपान आदीची गती नियमित करतो) तू (रुजू:) मित्रा प्रमाणे (देवेभ्य:) विद्वानांपासून विद्या प्राप्त कर आणि (अवरै:) (परै:) (च) आपल्या मित्रादींकडून वा दुसर्‍यांकडून थोडे अथवा अधिक योग साधना शिकून व (अन्तर्यामी) शरीरातील आवश्यक व्यवहारांचे पालन करून सर्वांना (मादयस्व) आनंदित करीत जा. ॥5॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ईश्वराचा योगीजनास वा सर्वांस असा उपदेश आहे की या सकळ ब्रह्मांडामध्ये ज्या ज्या प्रकारे जे जे पदार्थ आहेत, ते ते सर्व माझ्या ज्ञानात विद्यमान आहेत (मी सर्वात व्याप्त असून सर्व पदार्थ माझ्यात आहेत) जो योगविद्या जाणत नाही, तो त्या पदार्थांना (आणि त्या पदार्थात व्याप्त मला) पाहू वा जाणू शकत नाही. तसेच माझी उपासना केल्याशिवाय कोणी योगी होऊ शकत नाही. ॥5॥
Subject
योगाभ्यासात प्रथम प्रवृत्ती ईश्वराकडे होते. त्यासाठी काय केले पाहिजे, याचा उपदेश पुढील मंत्रात केला आहे -