Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 48

48 Mantra
7/48
Devata- आत्मा देवता Rishi- आङ्गिरस ऋषिः Chhand- आर्षी उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
को॑ऽदा॒त् कस्मा॑ऽअदा॒त् कामो॑ऽदा॒त् कामा॑यादात्। कामो॑ दा॒ता कामः॑ प्रतिग्रही॒ता कामै॒तत्ते॑॥४८॥

कः। अ॒दा॒त्। कस्मै॑। अ॒दा॒त्। कामः॑। अ॒दा॒त्। कामा॑य। अ॒दा॒त्। कामः॑। दा॒ता। कामः॑। प्र॒ति॒ग्र॒ही॒तेति॑ प्रतिऽग्रही॒ता। काम॑। ए॑तत्। ते॒ ॥४८॥

Mantra without Swara
को दात्कस्मा ऽअदात्कामो दात्कामायादात् । कामो दाता कामः प्रतिग्रहीता कामैतत्ते ॥

कः। अदात्। कस्मै। अदात्। कामः। अदात्। कामाय। अदात्। कामः। दाता। कामः। प्रतिग्रहीतेति प्रतिऽग्रहीता। काम। एतत्। ते॥४८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
पदार्थ - (परमेश्राने जीवास आज्ञा केली आहे प्रारंभी प्रश्न विचारून नंतर (त्यांची उत्तरे दिली आहेत) (क:) कर्माचे फळ कोण (अदात्) देतो? आणि (करमे) कोणाला कर्माचे फळ (अदात्) देतो? या दोन प्रश्नांची उत्तरे अशी - (काम:) ज्यात सर्वजण कामना करतात, तो परमेश्वर (अदात्) देतो आणि कामना करतात, तो परमेश्वर (अदात्) देतो आणि (कामाय) कामना करणार्‍या जीवाला (आत्म्याला) (अदात्) देतो. यानंतर या मंत्राना विशेष अर्थ प्रगट केला आहे. तो असा की (काम:) योगीजन ज्याची कामना करतात, तो परमेश्वर (दाता) देणारा आहे आणि (काम:) कामना करणारा जीव (प्रतिग्रहीता) घेणारा वा भोगणारा आहे. हे (काम) कामना करणार्‍या जीवा (ते) तुझ्यासाठी मी वेदांद्वारे (एतत्) अशा प्रकारे ही आज्ञा केली आहे हे तू निश्चयाने जाणून घे ॥48॥
Essence
भावार्थ - या संसारात जीव हा कर्म करणारा आणि ईश्वर हा फळ देणारा आहे. इथे हे जाणून घ्यावे (स्पष्टपणे लक्षात असू द्यावे) की कामना केल्याशिवाय (अन्य कर्म तर दूरच) डोळ्याच्या पापण्या देखील कोणी डालवू शतकत नाही. यामुळे जीवाने कामाना अवश्य करावी, पण ती कामना धर्मासंबंधी असावी, अधर्मासाठी नव्हे. याशिवाय मनु महाराज यांनी जे सांगितले आहे, ते वेदानुकूल आहे, असे सर्वांना निश्चयाने समजावे. तसे पाहता या संसारात अतिकामना करणे प्रशंसनीय नाही, पण हे ही सत्य की कामना केल्याशिवाय जगात कोणतेही कार्य सिद्ध होत नाही. यामुळे कामना करावी तर धर्माची, अधर्माची कदापी नव्हे. वेदांचे पठन-पाठन (अध्ययन, अध्यापन) आणि वेदोक्त धर्माचे आचारण आदी कार्य कामना म्हणजे इच्छेविना केव्हांही पूर्ण होऊ शकत नाही. या जगात त्रिकाळात इच्छेविना कोणतीही क्रिया संपन्न होताना दिसत नाही. जे जे केले जात आहे, ते ते सर्व इच्छेचाच व्यापार आहे. यामुळे मनुष्याने श्रेष्ठ वेदोन्त कर्माचीच कामना करावी, अन्य दुष्कर्मांची मुळीच नको ॥48॥
Subject
पुढील मंत्रात ईश्वराने जीवांना उपदेश केला आहे -
Footnote
या सातव्या अध्यायात खालील विषयांचे वर्णन केले आहे - अंतर्बाह्य व्यवहार, मनुष्यांची एकमेकाशी वागणूक, आत्म्याचे कर्म, आत्म्यात मनाची प्रकृती, प्रथम सिद्धयोग्यासाठी ईश्वराने केलेला उपदेश, ज्ञा जिज्ञासूने योगाभ्यास करावा, योगाचे लक्षण, अध्ययन-अध्यापनाची रीती, योगविद्येच्या अभ्यासकाची वर्तणूक, योगविद्येद्वारे अंत:करण शुद्धी, योगाभ्यासाचे लक्षण, गुरु-शिष्याचे एकमेकाशी आचरण, स्वामि-सेवकाचे आचरण, न्यायाधीशाने कशाप्रकारे प्रजेचे रक्षण करावे, राजपुरुष आणि सभासदांचे कर्त्तव्य-कर्म, राजाचा उपदेश, राजांची कर्त्तव्यें, योग्य व आवश्यक परीक्षा करून सेनापतीची नियुक्ती, पूर्ण विद्वानालाच सभापतीपदी नेमणे, विद्वानांची कर्त्तव्ये, उपासकास ईश्वराचा उपदेश, यज्ञानुष्ठान करणार्‍याविषयी, प्रजाजनांशी सभापतीचे व्यवहार, राजा आणि प्रजाजनांचा सत्कार, गुरु-शिष्याची आसपातील वर्तणूक, नित्य पठनाचे विषय, विद्येची वृद्धी करणे, राजाची कर्त्तव्य-कर्में, सेनापतीची कर्त्तव्य-कर्में, सभाध्यक्षासाठी आचरणाचे नियम, ईश्वराच्या गुणांचे वर्णन, त्याची प्रार्थना, शूरवीरांसाठी युद्धाचे नियम, सैनिकांची कर्त्तव्यें, ब्रह्मचर्य धारणाची रीती आणि ईश्वराचा जीवांप्रत उपदेश, ॥ या सर्व विषयांची संगती मागील सहाव्या अध्यायाच्या अर्थाशी आहे, हे जाणून असावे. ॥^महर्षी दयानंद सरस्वतीकृत हिंदी वेदभाष्याचा सातवा अध्याय समाप्त