Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 46

48 Mantra
7/46
Devata- विद्वांसो देवता Rishi- आङ्गिरस ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
ब्रा॒ह्म॒णमद्य॒ वि॑देयं पितृ॒मन्तं॑ पैतृम॒त्यमृषि॑मार्षे॒यꣳ सु॒धातु॑दक्षिणम्। अ॒स्मद्रा॑ता देव॒त्रा ग॑च्छत प्रदा॒तार॒मावि॑शत॥४६॥

ब्रा॒ह्म॒णम्। अ॒द्य। वि॒दे॒य॒म्। पि॒तृ॒मन्त॒मिति॑ पितृ॒ऽमन्त॑म्। पै॒तृ॒म॒त्यमिति॑ पैतृऽम॒त्यम्। ऋषि॑म्। आ॒र्षे॒यम्। सु॒धातु॑दक्षिण॒मिति॑ सु॒धातु॑ऽदक्षिणम्। अ॒स्मद्रा॑ता॒ इत्य॒स्मत्ऽरा॑ताः। दे॒व॒त्रेति॑ देव॒ऽत्रा। ग॒च्छ॒त॒। प्र॒दा॒तार॒मिति॑ प्रऽदा॒तार॑म्। आ। वि॒श॒त॒ ॥४६॥

Mantra without Swara
ब्राह्मणमद्य विदेयम्पितृमन्तम्पैतृमत्यमृषिमार्षेयँ सुधातुदक्षिणम् । अस्मद्राता देवत्रा गच्छत प्रदातारमा विशत ॥

ब्राह्मणम्। अद्य। विदेयम्। पितृमन्तमिति पितृऽमन्तम्। पैतृमत्यमिति पैतृऽमत्यम्। ऋषिम्। आर्षेयम्। सुधातुदक्षिणमिति सुधातुऽदक्षिणम्। अस्मद्राता इत्यस्मत्ऽराताः। देवत्रेति देवऽत्रा। गच्छत। प्रदातारमिति प्रऽदातारम्। आ। विशत॥४६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (एक नागरिक सभ्यजन म्हणत आहे) हे प्रजानन हो, सभासदजन हो आणि सैनिकहो, (अध) आज मी (ब्राह्मणम्) वेद आणि ईश्वराचा ज्ञात अशा (दानशूर उत्तम मनुष्याला) (पितृमन्तम्) प्रशंसनीय पितर म्हणजे सत्यासत्याचा विवेक असणार्‍या (पैतृत्यम्) पित्याप्रमाणे पूज्य असलेल्या (ऋषिम्) वेदार्थाचे व्याख्यान करणार्‍या विद्वान व दानशूर व्यक्तीला प्राप्त केले आहे. (सद्भाग्यामुळे मला असा विद्वान व दानी मनुष्य भेटला आहे) तो (आर्षियम्) ऋषीजनांच्या संपर्कामुळे ज्ञान-विज्ञानचा ज्ञाता झाला आहे आणि (सुधातुदक्षिणम्) उत्तम पुष्टिकारक वस्तूंच्या सेवनामुळे बलवान आहे अशा (पदातारम्) उत्तम दानशील मनुष्याला (विद्येम्) सतत प्राप्त करावे, अशी इच्छा मी बाळगीत आहे. माझ्याप्रमाणे तुम्ही देखील (अस्मप्राता:) आमच्यासारख्या सभ्यजनांसाठी उत्तम गुण देणारे होऊन (देवत्रा) शुद्ध गुण, कर्म, स्वभाव असलेल्या विद्वानांजवळ (आणच्छत) जा आणि शुभगुणांमध्ये (आविशत्) प्रविष्ट वहा, सद्गुणी व्हा ॥46॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. उत्साही मनुष्याला कोणती वस्तू अप्राप्त आहे? (अर्थात कोणतीही नाही. तो सर्व इच्छित पदार्थ प्राप्त करू शकतो.) जगात कोणीतरी असा मनुष्य आहे का की जो प्रयत्न पुरुषार्थ करीत विद्वज्जनांच्या संगतीत राहून ऋषिगणांनी दाखविलेल्या योगविज्ञानाला प्राप्त करू शकणार नाही. (अर्थात् असा कोणीही नाही.) तसेच कोणीही विद्वान चांगले गुण, कर्म आणि स्वभावाच्या विपरीत असे आचरण कदापी करणार नाही. (तसेच हे ही सत्य आहे की) दानी, दानशूर मनुष्य कधीही कृपणता वा अभावग्रस्त होत नाही (त्याच्या समृद्धीत वाढ होत असते) यामुळे जे लोक धार्मिक सर्वोपकारी आणि सत्पात्र अशा विद्वानांना दक्षिणा म्हणून प्रशंसनीय पदार्थांचे दान करतात, त्यांची कीर्ती उज्ज्वल व चिरंतन होते, असे का होऊ नये? (अर्थात ते होणे साहजिकच आहे) ॥46॥
Subject
दक्षिणा कुणाला द्यावी आणि कशाप्रकारे द्यावी, याविषयी पुढी मंत्रात उपदेश केला आहे -