Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 44

48 Mantra
7/44
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- आङ्गिरस ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒यं नो॑ऽअ॒ग्निर्वरि॑वस्कृणोत्व॒यं मृधः॑ पु॒रऽए॑तु प्रभि॒न्दन्। अ॒यं वाजा॑ञ्जयतु॒ वाज॑साताव॒यꣳ शत्रू॑ञ्जयतु॒ जर्हृ॑षाणः॒ स्वाहा॑॥४४॥

अ॒यम्। नः॒। अग्निः॒। वरि॒॑वः। कृ॒णो॒तु॒। अ॒यम्। मृधः॑। पु॒रः। ए॒तु॒। प्र॒भि॒न्दन्निति॑ प्रऽभि॒न्दन्। अ॒यम्। वाजा॑न्। ज॒य॒तु॒। वाज॑साता॒विति॒ वाज॑ऽसातौ। अ॒यम्। शत्रू॑न्। ज॒य॒तु॒। जर्हृ॑षाणः। स्वाहा॑ ॥४४॥.

Mantra without Swara
अयन्नोऽअग्निर्वरिवस्कृणोत्वयम्मृधः पुर एतु प्रभिन्दन् । अयँ वाजाञ्जयतु वाजसातावयँ शत्रून्जयतु जर्हृषाणः स्वाहा ॥

अयम्। नः। अग्निः। वरिवः। कृणोतु। अयम्। मृधः। पुरः। एतु। प्रभिन्दन्निति प्रऽभिन्दन्। अयम्। वाजान्। जयतु। वाजसाताविति वाजऽसातौ। अयम्। शत्रून्। जयतु। जर्हृषाणः। स्वाहा॥४४॥.

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(युद्धाच्या प्रसंगी चार प्रकारचे सैन्याधिकारी असावेत, त्यापैकी)^शब्दार्थ : (अयम्) हा पहिला (अग्नि:) वैद्यकशास्त्राचा प्रकांड (स्वाहा) वैद्यक शास्त्र आणि युद्धकलेचा ज्ञाता, सेनापती व प्रमुख सरदार आपल्या युद्धनीतीविषयीच्या वाणीद्वारे (यंत्रणा व मार्गदर्शनाद्वारे) वाजसातौ) युद्धक्षेत्रामध्ये (न:) आम्हांला (आम्हा सैनिकांना तसेच नागरिकांना) (वरिन:) सुखमय (कृणोतु) करो. (अयम्) हा दुसरा युद्धनिपुण प्रमुख वीर सरदार (प्रतिन्दन्) शत्रूंना छिन्न-भिन्न करीत (मृध:) संग्रामात सैन्याच्या स्वत: (पुर:) पुढे (एतु) राहून सर्वांचा नेता होणे. (अयम्) हा तिसरा सरदार आमच्या हृदयात वीररस वाढविणारा होऊन उपदेश देऊन आम्हा (वाजान्) अत्यंत वेगाने पुढे जाणार्‍या वीरांना (जयतु) विजयासाठी प्रोत्साहित करो. (अयम्) हा चौथावीर सरदार (जर्हृषाण:) नित्य निरंतर आनन्दयुक्त होऊन (अगदी सहजतेने) (शत्रून्) धर्मविरोधी शत्रुजनांना (जयतु) पराजित करो. ॥44॥
Essence
भावार्थ - युद्धाच्या वेळी चार प्रकारचे वीर (सैन्यप्रमुख वा सरदार) अवश्य असावेत. त्यापैकी पहिला वैद्यकशास्त्रात (औषधीयोजना आणि शस्त्रक्रियेमध्ये) निपुण वैद्य असावा. दुसर सैन्यप्रमुख सर्व वीरांना आनंद व उल्हास देणारा उपदेशक असावा. तिसरा सैनानी शत्रूंना सर्वदृष्टीने पराभूत करून लज्जित करणार असावा आणि चवथा शत्रूंचा विनाश करणारा आसावा. असे असल्यानंतरच युद्धकर्म सफल होऊन विजय मिळतो.
Subject
परमेश्वराच्या उपासक शूरवीरांनी संग्रामामध्ये कशाप्रकारे युद्ध करावे, पुढील मंत्रात या विषयी उपदेश केला आहे -