Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 4

48 Mantra
7/4
Devata- मघवा देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- आर्षी उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्य॒न्तर्य॑च्छ मघवन् पा॒हि सोम॑म्। उ॒रु॒ष्य राय॒ऽएषो॑ यजस्व॥४॥

उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। अ॒न्तः। य॒च्छ॒। म॒घ॒व॒न्निति॑ मघऽवन्। पा॒हि॒। सोम॑म्। उ॒रु॒ष्य। रायः॑। आ। इषः॑। य॒ज॒स्व॒ ॥४॥

Mantra without Swara
उपयामगृहीतो स्यन्तर्यच्छ मघवन्पाहि सोमम् । उरुष्य राय एषो यजस्व ॥

उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। अन्तः। यच्छ। मघवन्निति मघऽवन्। पाहि। सोमम्। उरुष्य। रायः। आ। इषः। यजस्व॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - योगाविषयी जिज्ञासा असणार्‍या हे उपासका, (वा योगाचे ज्ञान, क्रिया, पद्धती शिकवण्याची इच्छा असणार्‍या साधका) तू योग शिकण्याकरिता आवश्यक नियमानी (यम, नियम आदी आठ अंगांनी) बांधलेला (अस्ति) आहेस. त्यामुळे (अंत:) शरीराच्या अंतर्भागातील जे प्राण आदी पवन आणि आणि मन, इंद्रिये आहेत, त्यांना (यच्छ) नियंत्रणात ठेव. हे (मधवन्) पवित्र पूजित ऐश्वर्याच्या स्वामी एखाद्या मनुष्यासारखा तू देखील (सोमम्) योगविद्याद्वारे प्राप्त योगैश्वर्याचा स्वामी असून त्या योगधूताचे तू (पाहि) रक्षण कर. याशिवाय (उरुष्य) अविद्या आदी ने क्लेश आहेत, त्यांना आपल्या योगविद्येच्या बलाने नष्ट कर, ज्यामुळे तुला (राय:) ऋद्धी, समृद्धी आणि (इष:) वांछित सिद्धीची (आयजस्व) प्राप्ती होईल. ॥5॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे योगजिज्ञासू मनुष्यासाठी आवश्यक आहे की त्याने यम, नियम आदी अष्ट योगांच्या सहाय्याने अंत:करणाच्या चित्त आदी वृत्तीना नियंत्रित वा वश करावे. तसेच अविद्यादी दोषांचे निवारण करून संयम वृत्ती ठेऊन ऋद्धी-सिद्धीची प्राप्ती करावी ॥5॥
Subject
यानंतर मनाच्या सहायाने आत्म्याच्या उत्कर्षासाठी (आत्मोन्नतीसाठी) कशाप्रकारे यज्ञ करावा, पुढील मंत्रात हा विषय सांगितला आहे -