Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 37

48 Mantra
7/37
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- निचृत् आर्षी त्रिष्टुप्,विराट आर्ची पङ्क्ति Swara- धैवतः
Mantra with Swara
स॒जोषा॑ऽइन्द्र॒ सग॑णो म॒रुद्भिः॒ सोमं॑ पिब वृत्र॒हा शू॑र वि॒द्वान्। ज॒हि शत्रूँ॒२रप॒ मृधो॑ नुद॒स्वाथाभ॑यं कृणुहि वि॒श्वतो॑ नः। उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑तऽए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑ते॥३७॥

स॒जोषा॒ इ॒ति॑ स॒ऽजोषाः॑। इ॒न्द्र॒। सग॑ण इति॒ सऽग॑णः। म॒रुद्भि॒रिति॑ म॒रुत्ऽभिः॑। सोम॑म्। पि॒ब॒। वृ॒त्र॒हेति॑ वृत्र॒ऽहा। शू॒र॒। वि॒द्वान्। ज॒हि। शत्रू॑न्। अप॑। मृधः॑। नु॒द॒स्व॒। अथ॑। अ॒भय॑म्। कृ॒णु॒हि॒। वि॒श्वतः॑। नः॒। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। इन्द्रा॑य। त्वा॒। म॒रुत्व॑ते। ए॒षः। ते॒। योनिः॑। इन्द्रा॑य। त्वा॒। म॒रुत्व॑ते ॥३७॥

Mantra without Swara
सजोषाऽइन्द्र सगणो मरुद्भिः सोमम्पिब वृत्रहा शूर विद्वान् । जहि शत्रूँरप मृधो नुदस्वाथाभयङ्कृणुहि विश्वतो नः । उपयामगृहीतो सीन्द्राय त्वा मरुत्वतऽएष ते योनिरिन्द्राय त्वा मरुत्वते ॥

सजोषा इति सऽजोषाः। इन्द्र। सगण इति सऽगणः। मरुद्भिरिति मरुत्ऽभिः। सोमम्। पिब। वृत्रहेति वृत्रऽहा। शूर। विद्वान्। जहि। शत्रून्। अप। मृधः। नुदस्व। अथ। अभयम्। कृणुहि। विश्वतः। नः। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। इन्द्राय। त्वा। मरुत्वते। एषः। ते। योनिः। इन्द्राय। त्वा। मरुत्वते॥३७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - परमेश्वराने सेनापतीस उपदेश केला आहे - हे (इन्द्र) सर्व सुखांनी परिपूर्ण आणि (शूर) शत्रूंचा नाश करण्यात निर्भय असणार्‍या सेनाध्यक्षा, तू (उपयामगृहीत:) सैन्याच्या उत्कृष्ठ नियमांनी बांधलेला (असि) आहेस. (मरूत्वते) वायूची जी प्रभावकारी अस्त्रविद्या आहे, त्याद्वारे (इन्द्राय) परमैश्वर्य देणार्‍या संग्रामाकरिता मी (त्वा) तुला उपदेश करीत आहे, तो असा की (ते) तुझा (एव:) हा सैन्याधिकार पद (योनि:) इष्ट आणि सुखदायक आहे. मी तुला (मरूत्वये) (इन्द्राय) ते युद्ध करण्यासाठी स्वीकार करतो (तुला नियुक्त करतो) तू (सजोवा:) सर्वांना (सर्व आत्मीयजनांना) समानरुपेण प्रेम करणारा आणि (संगण:) आपल्या मित्र व (गण म्हणजे सैनिकांसह) या पदाचे सेवन कर. ज्याप्रमाणे (मरूद्भि:) पवनासह (वृत्रहा) मेघातील पाण्याला छिन्न-भिन्न करणारा सूर्य (सोमम्) सर्व पदार्थांच्या रसांना शोषून घेतो, त्याप्रमाणे तूही सर्व (पुष्टिकारी) पदार्थांच्या रसाचे (पिब) सेवन कर. (या वीरत्व जागृत करणार्‍या रसांचे सेवन करून) तू (विद्वान) बुद्धीमान, नीतिकुशल हो आणि (शत्रून्) सत्य न्यायाच्या विरोध करणार्‍या दृष्ट शत्रूंचा (जहि) विनाश कर. (अथ) यानंतर (प्रजानन म्हणतात) मी (मृघ:) जे दुष्टजन जिथे जिथे दुसर्‍यांच्या सुखाची हानी करून स्वत:च्या मनात प्रसन्न होत असतील, त्या त्या ठिकाणी युद्ध करून हे सेनापती, आपण (अनुपदस्व) त्या दुर्जनांना दूर करा आणि (न:) आम्हा प्रजाजनांना (विश्वत:) सर्वत्र (अभयम्) निर्भय (कृणुहि) करा. ॥37॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे जीव मोठ्या प्रेमाने आपल्या मित्राचे वा स्वत:च्या देहाचे रक्षण करतो, त्याप्रमाणे राजाने प्रजेचे पालन-रक्षण करावे. तसेच ज्याप्रमाणे सूर्य वायू आणि विद्युतेसह मिळून मेघांचे छेदन-भेदन करून जलवृष्टीद्वारे सर्वांना सुख देतो, त्याप्रमाणे राजासाठी आवश्यक आहे की त्याने युद्धसाहित्याचा भरपूर संग्रह करून शत्रूंना नष्ट करून प्रजेला सुख, धर्मात्माजनांना निर्भयता द्यावी व दृष्टांना भयभीत करावे ॥37॥
Subject
पुढील मंत्रात सेनापतीच्या कर्त्तव्य कर्मांविषयी कथन केले आहे -