Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 36

48 Mantra
7/36
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- विराट आर्षी त्रिष्टुप्,विराट आर्ची पङ्क्ति,साम्नी उष्णिक् Swara- धैवतः, ऋषभः
Mantra with Swara
म॒रुत्व॑न्तं वृष॒भं वा॑वृधा॒नमक॑वारिं॑ दि॒व्यꣳ शा॒समिन्द्र॑म्। वि॒श्वा॒साह॒मव॑से॒ नूत॑नायो॒ग्रꣳ स॑हो॒दामि॒ह तꣳ हु॑वेम। उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑तऽए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑ते। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि म॒रुतां॒ त्वौज॑से॥३६॥

म॒रुत्व॑न्तम्। वृ॒ष॒भम्। वा॒वृ॒धा॒नम्। वा॒वृ॒धा॒नमिति॑ ववृधा॒नम्। अक॑वारि॒मित्यक॑वऽअरिम्। दि॒व्यम्। शा॒सम्। इन्द्र॑म्। वि॒श्वा॒साह॑म्। वि॒श्व॒सह॒मिति॑ विश्व॒ऽसह॑म्। अव॑से। नूत॑नाय। उ॒ग्रम्। स॒हो॒दामिति॑ सहः॒ऽदाम्। इ॒ह। तम्। हु॒वे॒म॒। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। इन्द्रा॑य। त्वा॒। म॒रुत्व॑ते। ए॒षः। ते॒। योनिः॑। इन्द्रा॑य। त्वा॒। म॒रुत्व॑ते। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। म॒रुता॑म् त्वा॒। ओज॑से ॥३६॥

Mantra without Swara
मरुत्वन्तँवृषभँवावृधानमकवारिं दिव्यँ शासमिन्द्रम् । विश्वासाहमवसे नूतनायोग्रँसहोदामिह तँ हुवेम । उपयामगृहीतो सीन्द्राय त्वा मरुत्वतऽएष ते योनिरिन्द्राय त्वा मरुत्वते । उपयामगृहीतो सि मरुतान्त्वौजसे ॥

मरुत्वन्तम्। वृषभम्। वावृधानम्। वावृधानमिति ववृधानम्। अकवारिमित्यकवऽअरिम्। दिव्यम्। शासम्। इन्द्रम्। विश्वासाहम्। विश्वसहमिति विश्वऽसहम्। अवसे। नूतनाय। उग्रम्। सहोदामिति सहःऽदाम्। इह। तम्। हुवेम। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। इन्द्राय। त्वा। मरुत्वते। एषः। ते। योनिः। इन्द्राय। त्वा। मरुत्वते। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। मरुताम् त्वा। ओजसे॥३६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (कवय:) मागील मंत्रामध्ये ज्यांचे वर्णन आहे, ते आम्ही विद्वज्जन (नूतनाम) नवीन अथवा नित्य व सदैव (अवसे) आपल्या सुरक्षेकरिता (मरूत्वन्तम्) प्रशंसनीय व प्रजाप्रिय (वृषभम्) सर्वोत्तम आणि (वावृधानम्) शुभगुणांत व कर्मांत सर्वोन्नत (अशा सभापतीला स्वीकार करत आहोत) तो सभापती (अकवारिम्) धर्मविरोधी दृष्टांचे निर्दालन करणारा आहे, (दिव्यम्) शुद्ध आहे (विश्वासाहम्) सहनशील आहे (उग्रम्) प्रचंड पराक्रमी (सहोदाम्) सहायक आहे आणि (शासम्) सर्वांना शिक्षण देणारा आहे. अशा (तम्) त्या सर्व गुण संपन्न (इन्द्रम्) परमेश्वर्यशाली सभाध्यक्षाला आम्ही (हुवेम) आवाहन करतो (अथवा आपल्या सुरक्षेकरिता रक्षक म्हणून स्वीकार करीत आहोत) - हे मुख्य सभासद, (सभासदांतून निवडलेला मुख्य सभासद म्हणजे राष्ट्राध्यक्ष वा सभापती), आपण उपयामगृहीत:) मोठे वा लहान (मुख्य वा गौण) सर्व प्रकारच्या नियमांनी बद्ध (असि) आहात. यामुळे आम्ही विद्वज्जन (त्वा) आपणाला (मरुत्वते) प्रशंसनीय व प्रजाप्रिय (इन्द्राय) परमैश्वर्यशाली सभापती होण्यासाठी निवडतो वा स्वीकार करतो (एष:) या सभेमध्ये राहून हे न्यायदानाचे कार्य म्हणजे (ते) आपल्या (योनि:) घराप्रमाणे प्रीतीकारक आहे. यामुळे (त्वा) आपणाला (मरुत्वते) प्रजेला उत्तम करण्यासाठी आणि (इन्द्राय) अतिशय ऐश्वर्य प्राप्तीसाठी स्वीकार करीत आहोत. आपण (उपयामगृहीत:) राज्याच्या नियम आणि उपनियमांनी बांधलेले (असि) आहात, म्हणून प्रजाजनांच्या (ओजसे) बलाची वृद्धी करण्यासाठी आम्ही (इतर सभासद) (त्वा) आपली निवड करीत आहोत (वा आपणांस सभापती म्हणून मान्यता देत आहोत) ॥36॥
Essence
भावार्थ -या मंत्रात मागील मंत्रातील ‘कवय:’ या शब्दाची आवृत्ती होत आहे. प्रजाजनांसाठी हेच योग्य कर्तव्य आहे की त्यांनी जो समस्तविद्यानिपुण सकलगुण संपन्न सर्वोत्तम विद्वान आणि शूरवीर आहे, त्यास सभेच्या मुख्य कार्यात नियुक्त करावे (त्यास सभापति, राजा, सभाध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष निवडावे) राजसभेच्या सर्व कार्य व जबाबदार्‍यांकरिता नेमलल्या अशा सभापतीने देखील सत्य, धर्म आणि न्यायाच्या आधारे सर्व कार्ये करीत प्रजेचा उत्साह निरंत वाढवावा. ॥36॥
Subject
यानंतर राजा आणि प्रजेची कर्त्तव्यें कोणती, पुढील मंत्रात याविषयी उपदेश केला आहे -