Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 35

48 Mantra
7/35
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप्,विराट आर्ची पङ्क्ति, Swara- धैवतः, ऋषभः
Mantra with Swara
इन्द्र॑ मरुत्वऽइ॒ह पा॑हि॒ सोमं॒ यथा॑ शार्या॒तेऽअपि॑बः सु॒तस्य॑। तव॒ प्रणी॑ती॒ तव॑ शूर॒ शर्म॒न्नावि॑वासन्ति क॒वयः॑ सुय॒ज्ञाः। उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑तऽए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा म॒रुत्व॑ते॥३५॥

इन्द्रः॑। म॒रु॒त्वः॒। इ॒ह। पा॒हि॒। सोम॑म्। यथा॑। शा॒र्य्या॒ते। अपि॑बः। सु॒तस्य॑। तव॑। प्रणी॑ती। प्रनी॑तीति॒ प्रऽनी॑ती। तव॑। शू॒र॒। शर्म्म॑न्। आ। वि॒वा॒स॒न्ति॒। क॒वयः॑। सु॒य॒ज्ञा इति॑ सुऽय॒ज्ञाः। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। इन्द्रा॑य। त्वा॒। म॒रुत्व॑ते। ए॒षः। ते॒। योनिः॑। इन्द्रा॑य। त्वा॒। म॒रुत्व॑ते ॥३५॥

Mantra without Swara
इन्द्र मरुत्वऽइह पाहि सोमँयथा शार्याते अपिबः सुतस्य । तव प्रणीती तव शूर शर्मन्ना विवासन्ति कवयः सुयज्ञाः । उपयामगृहीतो सीन्द्राय त्वा मरुत्वतेऽएष ते योनिरिन्द्राय त्वा मरुत्वते ॥

इन्द्रः। मरुत्वः। इह। पाहि। सोमम्। यथा। शार्य्याते। अपिबः। सुतस्य। तव। प्रणीती। प्रनीतीति प्रऽनीती। तव। शूर। शर्म्मन्। आ। विवासन्ति। कवयः। सुयज्ञा इति सुऽयज्ञाः। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। इन्द्राय। त्वा। मरुत्वते। एषः। ते। योनिः। इन्द्राय। त्वा। मरुत्वते॥३५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (इन्द्र) सर्व विघ्ननिवारक सर्वसंपदायुक्त तेजस्वी आणि (भरूत्व:) धर्माने प्रजापालन करणार्‍या प्रशंसनीय सभाध्यक्षा, हे राजन, आपण (इह) या संसारात (यथा) ज्याप्रमाणे (शार्य्याते) स्वत:च्या हाता-पायांच्या श्रमाने (स्वकष्टाने) आचरण करीत (सुतस्य) विद्यारुप रसाचे (अषिब:) पान केले आहे, त्याप्रमाणे (सोमन्) सर्व सद्गुण, ऐश्वर्य आणि सुख देणार्‍या पठण-पाठनरुप यज्ञाचे (पाहि) पालन करा. (तुम्ही कष्ट करून शिक्षण मिळविले व विद्यावान झालात, त्यामुळे त्या विद्या-शिक्षणादीचा प्रबन्ध सुरक्षित व सुनियोजित करा) हे (शूर धर्मविरोधी जनांना दंडित करणारे महोदय, (तव) आपल्या (शर्म्मन्) राज्यरूप घरात (सुयजा) उत्तम अध्यापन, अध्ययन करणारे जे विद्वान आहेत, ते व त्यांच्या समान (कनय:) अनेक बुद्धिमान जन (तव) आपल्या (प्रणीती) उत्तम नीतीचा (अविवासन्ति) लाभ घेतात (अनेक मेघावीजन राजाने केलेल्या शिक्षण-व्यवस्थेमुळे लाभान्वित होतात) हे शूर राजन्, आपण (उपमामगृहीत:) प्रजापालनादी नियमांनी बांधलेले (असि) आहात, त्यामुळे (त्वा) (इन्द्राय) परमैश्वर्यशाली आणि (मसत्वते) प्रजापालक असे आपणाकडे आम्ही प्रार्थना करतो की (हे) आपली जी (एष:) ही विद्येची प्रसार-नीती आहे, तीच (योनि:) सुखदायक घराप्रमाणे आहे. म्हणून (इन्द्राय) परम ऐश्वर्याकरिता आणि (मरूत्वते) प्रजापालनाकरिता आम्ही प्रजाजन (त्वा) व आपणाला मान्य करतो, स्वीकृत करतो ॥35॥
Essence
भावार्थ - सर्व विद्वानांसाठी उचित आहे की न्यायाधीशांच्या न्यायसभेने दिलेल्या आज्ञा वा निर्णयाविरूद्ध वागू नये, आज्ञेचे उल्ंलघन करू नये. त्याचप्रमाणे राजसभेच्या सभासदांनी देखील वेदज्ञ विद्वानांच्या आज्ञेचे उल्लंघन कदापि करू नये. जो सर्वगुणसंपन्न व सर्वोत्तम असेल, त्यालाच सभापती (राष्ट्राध्यक्ष) करावे. तसेच त्या सभापतीने देखील उत्तम नीतिरीतीने राज्याचा प्रबन्ध करावा ॥35॥
Subject
राजाने अध्ययन - अध्यापनादींची व्यवस्था आणि त्यांचे रक्षण कशा रीतीने करावे, हे पुढील मंत्रात सांगितले आहे-