Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 32

48 Mantra
7/32
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- त्रिशोक ऋषिः Chhand- आर्षी गायत्री,आर्ची उष्णिक् Swara- ऋषभः, षड्जः
Mantra with Swara
आ घा॒ऽअ॒ग्निमि॑न्ध॒ते स्तृ॒णन्ति॑ ब॒र्हिरा॑नु॒षक्। येषा॒मिन्द्रो॒ युवा॒ सखा॑। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्यग्नी॒न्द्राभ्यां॑ त्वै॒ष ते॒ योनि॑रग्नी॒न्द्राभ्यां॑ त्वा॥३२॥

आ। घ॒। ये। अ॒ग्निम्। इ॒न्ध॒ते। स्तृ॒णन्ति॑। ब॒र्हिः। आ॒नु॒षक्। येषा॑म्। इन्द्रः॑। युवा॑। सखा॑। उ॒पा॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। अ॒ग्नी॒न्द्राभ्या॑म्। त्वा॒। ए॒षः। ते॒। योनिः॑। अ॒ग्नी॒न्द्राभ्या॑म्। त्वा॒ ॥३२॥

Mantra without Swara
आ घा ये अग्निमिन्धते स्तृणन्ति बर्हिरानुषक् । येषामिन्द्रो युवा सखा । उपयामगृहीतो स्यग्नीन्द्राभ्यान्त्वैष ते योनिरग्नीन्द्राभ्यां त्वा ॥

आ। घ। ये। अग्निम्। इन्धते। स्तृणान्ति। बर्हिः। आनुषक्। येषाम्। इन्द्रः। युवा। सखा। उपायामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। अग्नीन्द्राभ्याम्। त्वा। एषः। ते। योनिः। अग्नीन्द्राभ्याम्। त्वा॥३२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ये) जे वेद विद्यासंपन्न विद्वान सभासद (अग्निम्) प्रकाशित करतात (विद्युत अग्नीच्या गुणांचा शोध व आविष्करण करतात) आणि (आनुषक्) व अनुक्रमाने म्हणजे योग्य रीतीने करून (बर्हि:) अंतरिक्षाला (आ) (स्तृणन्ति) आच्छादित करतात, तसेच (धमाम) ज्या विद्वानांचा नेता (राष्ट्राध्यक्ष वा सभाध्यक्ष) (युवा) एक पुष्ट, सर्वांगसुंदर सर्व विद्या विचक्षण असा युवक आहे, तो (इन्द्र:) सकल ऐश्वर्ययुक्त सभापती त्या विद्वान सभासदांचा (सखा) मित्र आहे. ते राजसभेचे सभासद (अग्नीन्द्राभ्याम्) अग्नी आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या सभासदांकडून हे सभाध्यक्ष (उपयामगृहीत:), आपण प्रजाधर्म पालनासाठी ग्रहण केलेले वा नियुक्त केलेले (असि) आहात. (ते) आपले (एष:) न्यायपूर्ण सिद्धांत (वा लागू केलेले नियम) (योनि:) घराप्रमाणे सुखकारक आहेत. अशा (त्या) आपल्यासारख्या राष्ट्राध्यक्षाला प्राप्त करून आम्ही (प्रजाजन) (अग्नीन्द्राभ्याम्) वरील पदार्थांसाठी (विद्युत, अग्नी व यज्ञ) आपणांस आवाहन करती. ॥32॥
Essence
भावार्थ - राजधर्माप्रमाणे किंवा राज्यशासन करतांना सर्व कार्ये (वा निर्णय) सभेच्या अधीन असतात, त्यामुळे विचार-सभांचे सभासद असलेल्या राजनीतज्ञ मनुष्यांपैकी दोन-तीन सदस्यांनी मिळून अथवा अनेक सभासदांनी मिळून विचाराअंती सर्व निर्णय घ्यावेत. ते सभासद जो निर्णय देतील, त्याप्रमाणेच सर्व राज्याधिकारी आणि ग्रजाजनांनी वर्तन करावे. (राज्यसभा व लोकसेभेतील सदस्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर निर्णय करण्यासाठी समित्या, उपसमित्या असाव्यात, असे सूचित आहे) ॥32
Subject
आता त्याच विषयाना प्रकाशन्तराने सांगितले आहे -