Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 31

48 Mantra
7/31
Devata- इन्द्राग्नी देवते Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
इन्द्रा॑ग्नी॒ऽआग॑तꣳ सु॒तं गी॒र्भिर्नभो॒ वरे॑ण्यम्। अ॒स्य पा॑तं धि॒येषि॒ता। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसीन्द्रा॒ग्निभ्यां॑ त्वै॒ष ते॒ योनि॑रिन्द्रा॒ग्निभ्यां॑ त्वा॥३१॥

इन्द्रा॑ग्नी॒ऽइतीन्द्रा॑ग्नी। आ। ग॒त॒म्। सु॒तम्। गी॒र्भिरिति॑ गीः॒ऽभिः। नभः॑। वरे॑ण्यम्। अ॒स्य। पा॒त॒म्। धि॒या। इ॒षि॒ता। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मगृ॑हीतः। अ॒सि॒। इ॒न्द्रा॒ग्निभ्या॒मिती॑न्द्रा॒ग्निऽभ्याम्। त्वा॒। ए॒षः। ते॒। योनिः॑। इ॒न्द्रा॒ग्निभ्या॒मिती॑न्द्रा॒ग्निऽभ्याम्। त्वा॒ ॥३१॥

Mantra without Swara
इन्द्राग्नी आ गतँ सुतङ्गीर्भिर्नभो वरेण्यम् । अस्य पातन्धियेषिता । उपयामगृहीतो सीन्द्राग्निभ्यात्वैष ते योनिरिन्द्राग्निभ्यां त्वा ॥

इन्द्राग्नीऽइतीन्द्राग्नी। आ। गतम्। सुतम्। गीर्भिरिति गीःऽभिः। नभः। वरेण्यम्। अस्य। पातम्। धिया। इषिता। उपयामगृहीत इत्युपयामगृहीतः। असि। इन्द्राग्निभ्यामितीन्द्राग्निऽभ्याम्। त्वा। एषः। ते। योनिः। इन्द्राग्निभ्यामितीन्द्राग्निऽभ्याम्। त्वा॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजानज म्हणत आहेत) हे (इन्द्राग्नी) सूर्य आणि अग्नी यांच्याप्रमाणे प्रकाशमान कीर्तीमंत सभापती आणि सभासदजन, आपण दोघे (आग तम्) एकत्र होऊन मिळून (गीर्भि:) चांगल्या भद्र वाणीद्वारे आम्हांसाठी (प्रजाजनांसाठी) (वरेण्यम्) श्रेष्ठ (नभ:) सुख (सुतम्) उत्पन्न वा निर्माण करा. तसेच, (इषिता) आमची प्रार्थना ऐकून तुम्ही दोघे (घिया) आपल्या नीतिकौशल्याने व राज्यशासनकर्माने (अस्य) या (म्हणजे आम्हास मिळालेल्या) सुखाचे (पातम्) रक्षण करा. (आम्हास सदैव सुखी आनंदी ठेवा) आता ते राजा आणि सभासद प्रजाजनाला उद्देशून म्हणत आहेत- हे प्रजाजन, तू (उपयामगृहीत:) प्रजेसाठी निश्चित केलेल्या नियमांना स्वीकृत केले (असि) आहेस (प्रजेच्या कर्त्तव्य-पालनाची शपथ घेतलेली आहेस) (त्वा) तुला (इन्द्राग्नीभ्याम्) वर वर्णित आम्ही दोघे तसा म्हणजे प्रतिज्ञाबद्ध प्रजाजन मानत आहोत. (एष:) ही राजनीती वा राजकर्म (ते) तुझे (योनि:) घर आहे (तू राज्याच्या नियमात वागणारा नागरिक आहेस) (इन्द्राग्नीभ्याम्) आम्ही दोघे (त्वा) तुला जाणीव करून देत आहोत. अर्थात तुझ्यासाठी राज्यशासनाच्या नियमांचे वर्णन करीत आहोत ॥31॥
Essence
भावार्थ - एकटा मनुष्य यथोचित राज्यशासन करू शकत नाही. यामुळे राजा वा राष्ट्राध्यक्षाने श्रेष्ठ पुरुषांचा सत्कार करून राज्यकार्यात नियुक्त करावे (प्रतिष्ठित सुयोग्य विद्वान, साहित्यिक, कलाकर, आदींना राज्यसभेवर नेमावे वा त्यांना अधिकारपद द्यावे) त्या नियुक्त श्रेष्ठ पुरुषांचेही कर्त्तव्य आहे की यथायोग्य व्यवहार करणार्‍या राजाचा सत्कार करावा ॥31॥
Subject
राज्याच्या नियमांनी संयमित आणि राजकर्मात प्रवृत्त राजा आणि प्रजापुरुष (सभासद) यांना उद्देशून त्याची स्तुती करीत कोणी (प्रजाजन) म्हणत आहे -