Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 3

48 Mantra
7/3
Devata- विद्वांसो देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- विराट ब्राह्मी जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
स्वाङ्कृ॑तोऽसि॒ विश्वे॑भ्यऽइन्द्रि॒येभ्यो॑ दि॒व्येभ्यः॒ पार्थि॑वेभ्यो॒ मन॑स्त्वाष्टु॒ स्वाहा॑ त्वा सुभव॒ सूर्या॑य दे॒वेभ्य॑स्त्वा मरीचि॒पेभ्यो॒ देवा॑शो॒ यस्मै॒ त्वेडे॒ तत्स॒त्यमु॑परि॒प्रुता॑ भ॒ङ्गेन॑ ह॒तोऽसौ फट् प्रा॒णाय॑ त्वा व्या॒नाय॑ त्वा॥३॥

स्वाङ्कृ॑त॒ इति॒ स्वाम्ऽकृ॑तः। अ॒सि॒। विश्वे॑भ्यः। इ॒न्द्रि॒येभ्यः॑। दि॒व्येभ्यः॑। पार्थि॑वेभ्यः। मनः॑। त्वा॒। अ॒ष्टु॒। स्वाहा॑। त्वा॒। सु॒भ॒वेति॑ सुऽभव। सूर्य्या॑य। दे॒वेभ्यः॑। त्वा॒। म॒री॒चि॒पेभ्य॒ इति॑ मरीचि॒ऽपेभ्यः॑। देव॑। अ॒शो॒ऽइत्य॑ऽशो॒। यस्मै॑। त्वा॒। ईडे॑। तत्। स॒त्यम्। उ॒प॒रि॒प्रुतेत्यु॑परि॒ऽप्रुता। भ॒ङ्गेन॑। ह॒तः। अ॒सौ। फट्। प्रा॒णाय॑। त्वा॒। व्या॒नायेति॑ विऽआ॒नाय॑। त्वा॒ ॥३॥

Mantra without Swara
स्वाङ्कृतोसि विश्वेभ्यऽइन्द्रियेभ्यो दिव्येभ्यः पार्थिवेभ्यो मनस्त्वाष्टु स्वाहा त्वा सुभव सूर्याय । देवेभ्यस्त्वा मरीचिपेभ्यो देवाँशो यस्मै त्वेडे तत्सत्यमुपरिप्रुता भङ्गेन हतोसौ फट्प्राणाय त्वा व्यानाय त्वा ॥

स्वाङ्कृत इति स्वाम्ऽकृतः। असि। विश्वेभ्यः। इन्द्रियेभ्यः। दिव्येभ्यः। पार्थिवेभ्यः। मनः। त्वा। अष्टु। स्वाहा। त्वा। सुभवेति सुऽभव। सूर्य्याय। देवेभ्यः। त्वा। मरीचिपेभ्य इति मरीचिऽपेभ्यः। देव। अशोऽइत्यऽशो। यस्मै। त्वा। ईडे। तत्। सत्यम्। उपरिप्रुतेत्युपरिऽप्रुता। भङ्गेन। हतः। असौ। फट्। प्राणाय। त्वा। व्यानायेति विऽआनाय। त्वा॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(उपासक स्वत: आपल्या आत्मशक्तीला उद्दीप्त करीत म्हणत आहे) (अंशो) सूर्याप्रमाणे कांतिमान हे माझी आत्मशक्ती वा हे माझ्या आत्मन्ः तू (विश्वेभ्य:) समस्त (दिव्यंभ्य:) दिव्य पदार्थाना (पार्थिव:) पृथ्वीवर प्रख्यात (पंचभूतांनी निर्मित) अशा (इन्द्रियेभ्य:) इंदियांनां पवित्र करणारी आहेस (मरीचिपेभ्य:) सूर्याची किरणे ज्याप्रमाणे पवित्र करणार्‍या आहेत, त्याप्रमाणे तुझ्यातील आत्मशक्ती वा तू विद्वजनांसाठी आणि वायू आदी पदार्थांसाठी (स्वाह्कृत:) स्वयसिद्ध (असि) आहेस. (जगात आत्मबल हे श्रेष्ठ बल आहे) (त्वा) तुला (मन:) विज्ञान आणि स्नाहा) वेदवाणीचं ज्ञान (अष्टु) प्राप्त होवो. हे (सुभव) श्रेष्ठ गुणवान आत्मन्, मी (सूर्याय) सर्वप्रेरक चराचरात्मा परमेश्वराची (ईडे) प्रशंसा करण्यासाठी (त्वा) तुला सांगत आहे. (हे आत्मन्, तू ईश्वरोपासना करीत जा) (तत्) परमेश्वराच्या त्या प्रशंसनीय अशा (सत्यम्) सत्यरूपाचे प्रेमाने ध्यान करीत जा. (उपरिप्रुता) उत्कर्षाचे सर्वांहून श्रेष्ठ साधन असा तू आहेस. तू आपल्या (भंगेन) शक्तीने (असो) या अज्ञानरुप शत्रूला (फट्) झटपट (हृत:) मारून टाकले आहे. यासाठी मी (त्वा) तुला (प्राणाय) जीवनासाठी उद्दीप्त वा जागृत करीत आहे आणि (व्यानाथ) विविध सुखांच्या प्राप्तीसाठी (त्वा) तुला आग्रहाने सांगत आहे.
Essence
भावार्थ - जीवात्मा स्वयेम स्वयंसिद्ध व अनादीरुप आहे. त्यामुळे सर्व जीवांनी (आत्म्यांनी) शरीर, प्राण इंद्रियें आणि अंत:करण यांना निर्मळ व धर्मयुक्त व्यवहारांनी पवित्र करावे. परमेश्वराची उपासना सतत निरंतर करावी. आपल्या पुरुषार्थ व पराक्रमाने दुर्जनांचा विनाश आणि सज्जनांचे रक्षण करीत आनंदित असावे. ॥3॥
Subject
पुढील मंत्रात आत्म्याच्या क्रियेविषयी निरूपण केले आहे -