Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 28

48 Mantra
7/28
Devata- यज्ञपतिर्देवता देवता Rishi- देवश्रवा ऋषिः Chhand- ब्राह्मी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
आ॒त्मने॑ मे वर्चो॒दा वर्च॑से पव॒स्वौज॑से मे वर्चो॒दा वर्च॑से पव॒स्वायु॑षे मे वर्चो॒दा वर्च॑से पवस्व॒ विश्वा॑भ्यो मे प्र॒जाभ्यो॑ वर्चो॒दसौ॒ वर्च॑से पवेथाम्॥२८॥

आ॒त्मने॑। मे॒। व॒र्चो॒दा इति॑ वर्चः॒ऽदाः। वर्च॑से। प॒व॒स्व॒। ओज॑से। मे॒। व॒र्चो॒दा इति॑ वर्चः॒ऽदाः। वर्च॑से। प॒व॒स्व॒। आयु॑षे। मे॒। व॒र्चो॒दा इति॑ वर्चः॒ऽदाः। वर्च॑से। प॒व॒स्व॒। विश्वा॑भ्यः। मे॒। प्र॒जाभ्य॒ इति॑ प्र॒ऽजाभ्यः॑। व॒र्चो॒दसा॒विति॑ वर्चः॒ऽदसौ॑। वर्च॑से। प॒वे॒था॒म् ॥२८॥

Mantra without Swara
आत्मने मे वर्चादा वर्चसे पवस्वौजसे मे वर्चादा वर्चसे पवस्वायुषे मे वर्चादा वर्चसे पवस्व विश्वाभ्यो मे प्रजाभ्यो वर्चादसौ वर्चसे पवेथाम् ॥

आत्मने। मे। वर्चोदा इति वर्चःऽदाः। वर्चसे। पवस्व। ओजसे। मे। वर्चोदा इति वर्चःऽदाः। वर्चसे। पवस्व। आयुषे। मे। वर्चोदा इति वर्चःऽदाः। वर्चसे। पवस्व। विश्वाभ्यः। मे। प्रजाभ्य इति प्रऽजाभ्यः। वर्चोदसाविति वर्चःऽदसौ। वर्चसे। पवेथाम्॥२८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - सामान्यजन वा नागरिक, योगाध्यापक व योगशिष्य यांस उद्देशून म्हणत आहे - हे (वर्चोदा:) योग आणि ब्रह्मविद्येचे ज्ञान देणारे विद्वान, आपण (मेऽ) माझ्या (आत्मने) इच्छा आदी गुणांनी युक्त अशा चेतन अशा आत्म्यासाठी आणि (वर्चसे) आत्म्याचा उन्नतीसाठी (पवस्व) मला अनुकूल व्हा, मला पवित्र करा. (वर्चोदा:) योग आणि विद्येचे ज्ञाता, आपण (मे) मला (ओजसे) आत्मिकशक्ती आणि (वर्चसे) योगशक्ती यांचे (पवस्व) ज्ञान द्या (माझ्यातील सुप्त आत्मबल योगविद्या शिकवून जागृत करा) हे (वर्चोदा:) बलदायक, आपण (मे) मला (आयुषे दीर्घ जीवन प्राप्त करण्यासाठी व (वर्चसे) रोगनाशक औषधी (पवस्व) प्राप्त करणारे व्हा. हे (वर्चोदसौ) योगविद्या शिकविणारे आणि शिकणारे (अध्यापक व शिष्य) आपण दोघे (मे) एक सामान्यजन वा एक नागरिक) अशा माझ्या (विश्वाभ्य:) संपूर्ण (प्रजल्य:) संतानांसाठी वा समस्त नागरिकांसाठी (वर्चसे) सद्गुण देण्यांसाठी (पवेधाम्) अनुकूल व्हा (योगाचे लाभ सर्वसामान्य जनांना होऊ द्या.) ॥28॥
Essence
भावार्थ - योगविद्येविना कोणीही मनुष्य पूर्ण विद्यावान होऊ शकत नाही आणि पूर्ण विद्यावान झाल्याशिवाय स्वरूपाचे वा परमेश्वराचे ज्ञान होणे संभव नाही. तसेच स्वरूपाचे, योगविद्येचे व ईश्वराचे ज्ञान झाल्याशिवाय कोणी न्यायाधीश सत्पुरुषांचे वा प्रजेचे रक्षण करण्यात समर्थ होऊ शकत नाही. याकरिता सर्व मनुष्यांनी योगविद्या जाणावी व त्यानुसार जीवन व्यतीत करावे, हेच सर्वांसाठी उचित आहे ॥28॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय सांगितला आहे -