Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 26

48 Mantra
7/26
Devata- यज्ञो देवता Rishi- देवश्रवा ऋषिः Chhand- स्वराट् ब्राह्मी बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
यस्ते॑ द्र॒प्स स्कन्द॑ति॒ यस्ते॑ऽअ॒ꣳशुर्ग्राव॑च्युतो धि॒षण॑योरु॒पस्था॑त्। अ॒ध्व॒र्योर्वा॒ परि॑ वा॒ यः प॒वित्रा॒त्तं ते॑ जुहोमि॒ मन॑सा॒ वष॑ट्कृत॒ꣳ स्वाहा॑ दे॒वाना॑मुत्क्रम॑णमसि॥२६॥

यः। ते॒। द्र॒प्सः। स्कन्द॑ति। यः। ते॒। अ॒ꣳशुः। ग्राव॑च्युत॒ इति॒ ग्राव॑ऽच्युतः। धि॒षण॑योः। उ॒पस्था॒दित्यु॒पऽस्था॑त्। अ॒ध्व॒र्य्योः। वा॒। परि॑। वा॒। यः। प॒वित्रा॑त्। तम्। ते॒। जु॒हो॒मि॒। मन॑सा। वष॑ट्कृत॒मिति॒ वष॑ट्ऽकृतम्। स्वाहा॑। दे॒वाना॑म्। उ॒त्क्रम॑ण᳖मित्यु॒त्ऽक्रम॑णम्। अ॒सि॒ ॥२६॥

Mantra without Swara
यस्ते द्रप्स स्कन्दति यस्ते अँशुर्ग्रावच्युतो धिषणयोरुपस्थाति अध्वर्यार्वा परि वा यः पवित्रात्तन्जुहोमि मनसा वषट्कृतँ स्वाहा देवानामुत्क्रमणमसि ॥

यः। ते। द्रप्सः। स्कन्दति। यः। ते। अꣳशुः। ग्रावच्युत इति ग्रावऽच्युतः। धिषणयोः। उपस्थादित्युपऽस्थात्। अध्वर्य्योः। वा। परि। वा। यः। पवित्रात्। तम्। ते। जुहोमि। मनसा। वषट्कृतमिति वषट्ऽकृतम्। स्वाहा। देवानाम्। उत्क्रमणमित्युत्ऽक्रमणम्। असि॥२६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे यज्ञपती! (य:) जो (ते) तुझा (द्रप्स:) यज्ञीय पदार्थांचा संग्रह आहे, (तो यज्ञात आहुत केल्यानंतर) (स्कन्दति) वायूसोबत सर्वत्र सर्वस्थानीं पोहचलो आणि (य:) जो (ते) तुझ्या यज्ञामुळे (ग्रावच्युत:) मेघमंडळाकडे केलेला आणि नंतर तेथून खाली भूमीकडे येणारा (अंशु:) यज्ञीय पदार्थांचा भाग आहे, त्यामुळे (धिषणयो:) उल्हासित झालेल्या पृथ्वीच्या (पवित्र) पवित्र अशा (उपस्थान्) मांडीवर वा मातेच्या कुशीप्रमाणे पवित्र स्थानावर (भूमीवर) येतो (वा) अथवा (य:) जो यज्ञभाग (अध्वर्यो:) यज्ञ करणार्‍या यज्ञिकजनांकडून (परि) सर्वत्र प्रसारित होतो, (तम्) त्या यज्ञाला मी परमेश्वर (ते) तुझ्यासाठी (याज्ञिकासाठी) (स्वाहा) सत्य वेदवाणीद्वारे आणि (मनसा) मनाने (वषट्कृतम्) केलेल्या संकल्पाप्रमाणे (जुहोमि) तुला देत आहे (हे याज्ञिक, तू जो यज्ञ फलदायी आहे, त्यासाठी आवश्यक योग्य पदार्थ तुला देत आहे (तुझ्या यज्ञासाठी यज्ञीम पदार्थांची मी उत्पती वा निर्मिती केली आहे) यज्ञानुष्ठान करणारा तू, (देवामाम्) विद्वानांनी प्राप्त केलेल्या (उत्क्रमणम्) उच्च पदाला व ऐश्वर्याला प्राप्त केलेला (असि) आहेस. त्यामुळे तुला सुख मिळत आहे. ॥26॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. होता आदी विद्वज्जन अत्यंत गुणसमृद्ध अशा सामग्रीद्वारे यज्ञ करताना जल आदी पदार्थांना पवित्र करून त्यांच्यासह पृथ्वीवर येतात आणि सर्व प्रकारच्या रोगांना नष्ट करून प्राणिमात्रास आनंदित करतात. यामुळे सर्व मनुष्यांनी या यज्ञाचे अनुष्ठान व सेवन सदैव व अवश्य केले पाहिजे ॥26॥
Subject
पुढील मंत्रात यज्ञानुष्ठान करणार्‍या मनुष्यास ईश्वराने उपदेश केला आहे -