Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 24

48 Mantra
7/24
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- भरद्वाज ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
मू॒र्द्धानं॑ दि॒वोऽअ॑र॒तिं पृ॑थि॒व्या वै॑श्वान॒रमृ॒तऽआ जा॒तम॒ग्निम्। क॒विꣳ स॒म्राज॒मति॑थिं॒ जना॑नामा॒सन्ना पात्रं॑ जनयन्त दे॒वाः॥२४॥

मू॒र्द्धान॑म्। दि॒वः। अ॒र॒तिम्। पृ॒थि॒व्याः। वै॒श्वा॒न॒रम्। ऋ॒ते। आ। जा॒तम्। अ॒ग्निम्। क॒विम्। स॒म्राज॒मिति॑ स॒म्ऽराज॑म्। अति॑थिम्। जना॑नाम्। आ॒सन्। आ। पात्र॑म्। ज॒न॒य॒न्त॒। दे॒वाः ॥२४॥

Mantra without Swara
मूर्धानन्दिवोऽअरतिं पृथिव्या वैश्वानरमृत आ जातमग्निम् । कविँ सम्राजमतिथिञ्जनानामासन्ना पात्रञ्जनयन्त देवाः ॥

मूर्द्धानम्। दिवः। अरतिम्। पृथिव्याः। वैश्वानरम्। ऋते। आ। जातम्। अग्निम्। कविम्। सम्राजमिति सम्ऽराजम्। अतिथिम्। जनानाम्। आसन्। आ। पात्रम्। जनयन्त। देवाः॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (देवा:) धनुर्वेदाचे ज्ञाता विद्वज्जन धनुर्वेदाच्या शिक्षण-प्रशिक्षणाद्वारे (दिन:) प्रकाशमान सूर्याच्या (मृद्दनिम्) तेजाप्रमाणे (पृथिन्या:) पृथ्वीच्या गुणांना प्रकट वा व्यक्त करतात आणि (अरतिम्) शोधलेल्या (ऋते) सत्यमार्गात (आजातम्) सत्याने व्यवहार करतात, (वैश्वानरम्) समस्त मनुष्यांना आनंद देणार्‍या, (जनानाम्) सत्पुरुषांद्वारे (अतिथिम्) अतिथिप्रमाणे सत्कार करण्यास योग्य (अग्नीला) प्रकट वा व्यक्त करतात, तसेच (आसन्) ज्या अग्नीला विद्वज्जन यज्ञरुपमुखामधे (पात्रम्) समस्त शिल्प व्यवहारांच्या रक्षणासाठी (कविम्) अनेकप्रकारे प्रदीप्त करताता व (अग्निम्) आणि शुभगुण प्रकाशक अग्नीला (सम्राजम्) एकच्छत्र राज्य करणार्‍या चक्रवर्ती राजाप्रमाणे (आ) उत्तमप्रकारे (जनसंत) प्रकाशित करतात (अग्नीच्या गुणांना व्यक्त वा प्रकट करतात). सर्व मनुष्यांनीदेखील त्याप्रमाणेच केले पाहिजे (धनुर्वेदज्ञाता, विद्वज्जनांप्रमाणे अग्नी आणि विद्युत यांच्या गुणांना जाणून घेऊन त्यांपासून सर्वांनी लाभ घेणे उचित आहे) ॥24॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे धनुर्वेदज्ञाता परोपकारी विद्वान धनुर्वेदात सांगितलेल्या क्रियांप्रमाणे क्रिया करून यान आणि विविध शस्त्रास्त्रांमध्ये अग्नीशक्तीचा अनेकप्रकारे उपयोग करतात व शत्रूंवर विजय मिळवतात, त्याप्रमाणे सर्व मनुष्यांनी देखील आचरण करावे (युद्धामध्ये आपले सैनिक जे जे शस्त्रास्त्र वापरतात व शत्रूंना पराभूत करतात, राष्ट्रातील सर्व नागरिकांनी हे शस्त्रास्त्र चालविणे अवश्य शिकावे. युद्धाच्या प्रसंगी ते द्वितीय रक्षापंक्ती होऊ शकतात) ॥24॥
Subject
यानंतर विद्वानांच्या कर्त्तव्यांविषयी कथन केले आहे-