Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 22

48 Mantra
7/22
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- वत्सार काश्यप ऋषिः Chhand- विराट ब्राह्मी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा बृ॒हद्व॑ते॒ वय॑स्वतऽउक्था॒व्यं गृह्णामि। यत्त॑ऽइन्द्र बृ॒हद्वय॒स्तस्मै॑ त्वा॒ विष्ण॑वे त्वै॒ष ते॒ योनि॑रु॒क्थेभ्य॑स्त्वा दे॒वेभ्य॑स्त्वा देवा॒व्यं य॒ज्ञस्यायु॑षे गृह्णामि॥२२॥

उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृहीतः। अ॒सि॒। इन्द्रा॑य। त्वा॒। बृहद्व॑त॒ इति॑ बृहत्ऽव॑ते। वय॑स्वते। उ॒क्थाव्य᳖मित्यु॑क्थऽअ॒व्य᳖म्। गृ॒ह्णा॒मि॒। यत्। ते॒। इ॒न्द्र॒। बृ॒हत्। वयः॑। तस्मै॑। त्वा॒। विष्ण॑वे। त्वा॒। ए॒षः। ते॒। योनिः॑। उ॒क्थेभ्यः॑। त्वा॒। दे॒वेभ्यः॑। त्वा॒। दे॒वा॒व्य᳖मिति॑ देवऽअ॒व्य᳖म्। य॒ज्ञस्य॑। आयु॑षे। गृ॒ह्णा॒मि॒ ॥२२॥

Mantra without Swara
उपयामगृहीतोसीन्द्राय त्वा बृहद्वते वयस्वतऽउक्थाव्यङ्गृह्णामि । यत्तऽइन्द्र बृहद्वयस्तस्मै त्वा विष्णवे त्वैष ते योनिरुक्थेभ्यस्त्वा देवेभ्यस्त्वा देवाव्यँयज्ञस्यायुषे गृह्णामि मित्रावरुणाभ्यान्त्वा ॥

उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। इन्द्राय। त्वा। बृहद्वत इति बृहत्ऽवते। वयस्वते। उक्थाव्यमित्युक्थऽअव्यम्। गृह्णामि। यत्। ते। इन्द्र। बृहत्। वयः। तस्मै। त्वा। विष्णवे। त्वा। एषः। ते। योनिः। उक्थेभ्यः। त्वा। देवेभ्यः। त्वा। देवाव्यमिति देवऽअव्यम्। यज्ञस्य। आयुषे। गृह्णामि॥२२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (इन्द्र) सेनापती, तू (उपयामगृहीत:) योग्य प्रकारे नियमपूर्वक विद्या शिकणारा वा उत्तम युद्धविद्या (असि) आहेस. यामुळे मी (धर्म, अर्थ, काम, मोक्षाची इच्छा करणारा मी एक विद्वान) (बृहद्वते) उत्तम कर्म करणार्‍या (वयस्वते) आणि दीर्घायू असलेल्या (इन्द्राय) परमेश्वर्यशाली सभाध्यक्षा (राष्ट्राध्यक्ष) करिता (त्वा) तुझे (गृहणीमि) ग्रहण करीत आहे, कारण की तू (उक्याव्यम्) प्रशंसनीय आहेस व शस्त्रविद्या विशेषत्वाने जाणतोस. तसेच (यत्) (ते) तुझे जे (बृहत्) महान (वय:) जीवन आहे (तस्मै) याच्या संगोपन-रक्षणासाठी आणि (विष्णवे) ईश्वराचे व वेदांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी (त्वा) तुझा (गृह्णामि) स्वीकार करीत आहे. (ईश्वरीय ज्ञान ने वेद त्या वेदांच्या प्रचार-रक्षणासाठी तुझ्या दीर्घजीवनाची कामना करीत आहे) (एष:) हा सैन्यप्रमुख होण्याचा (ते) तुझे अधिकार पद योग्य (योनि:) असे स्थान आहे. हे सेनापती! (उक्थेथ्य:) प्रशंसनीय वेदोक्त कर्म करण्यासाठी तसेच (देवंभ्य:) विद्वान व दिव्य गुणांच्या प्राप्तीसाठी मी (त्वा) तुला ग्रहण करीत आहे. तसेच (देवान्यम्) दिव्य गुणांचे पालन करणार्‍या अशा (त्वा) तुला (यज्ञस्य) राज्यशासन पालनरुप यज्ञ पूर्ण करण्यासाठी तुझ्या (आयुषे) दीर्घायुष्याची कामना करून (गृह्णामि) तुझा स्वीकार करीत आहे ॥22॥
Essence
भावार्थ - सर्वविद्या विशारद विद्वानांसाठी हे उचित कर्त्तव्य कर्म आहे की त्यांनी राज्य-शासन व राज्य रक्षणासाठी तसेच वीर सैनिकांच्या सुरक्षेसाठी उत्कृष्ट प्रशिक्षणप्राप्त, शस्त्र-अस्त्र विद्यानिपुण अशा परमप्रवीण आणि याज्ञिक वीर पुरुषाला सेनाध्यक्षपदी नियुक्त करावे. तसेच सभाध्यक्ष आणि सेनापती या दोघांचेही कर्त्तव्य आहे की त्यांनी पारस्परिक सहमतीने राज्याचा विस्तार आणि यज्ञकार्याची वृद्धी करावी ॥22॥
Subject
अशा प्रकारच्या मनुष्यास सेनापती करावे, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -