Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 2

48 Mantra
7/2
Devata- सोमो देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- निचृत् आर्षी पङ्क्ति, Swara- निषादः
Mantra with Swara
मधु॑मतीर्न॒ऽइष॑स्कृधि॒ यत्ते॑ सो॒मादा॑भ्यं॒ नाम॒ जागृ॑वि॒ तस्मै॑ ते सोम॒ सोमा॑य॒ स्वाहा॒ स्वाहो॒र्वन्तरि॑क्ष॒मन्वे॑मि॥२॥

मधु॑मती॒रिति॒ मधु॑ऽमतीः। नः॒। इषः॑। कृ॒धि॒। यत्। ते॒। सो॒म॒। अदा॑भ्यम्। नाम॑। जागृ॑वि। तस्मै॑। ते॒। सो॒म॒। सोमा॑य। स्वाहा॑। स्वाहा॑। उ॒रु। अ॒न्तरि॑क्षम्। अनु॑। ए॒मि॒ ॥२॥

Mantra without Swara
मधुमतीर्नऽइषस्कृधि यत्ते सोमादाभ्यन्नाम जागृवि तस्मै ते सोम सोमाय स्वाहा स्वाहोर्वन्तरिक्षमन्वेमि ॥

मधुमतीरिति मधुऽमतीः। नः। इषः। कृधि। यत्। ते। सोम। अदाभ्यम्। नाम। जागृवि। तस्मै। ते। सोम। सोमाय। स्वाहा। स्वाहा। उरु। अन्तरिक्षम्। अनु। एमि॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ हे (सोम) ऐश्वर्यशाली विद्वन, आपण (न:) आम्हांसाठी (सामाजिकजनांसाठी) (मधुमती) मधुर व पुष्टिकारक (इष:) अन्न आदी पदार्थ (कृधि) द्या (आपल्या विद्या व ज्ञानाने पदार्थांचे हितकरण गुण व लाभ प्रकट करा.) हे (सोम) शुभकर्म करण्याकरिता प्रेरणा देणार्‍या विद्वन् (ते) तुमचे (यत्) जे (अदाभ्यम्) रक्षणीय (जागृवि) प्रसिद्ध (नाम) आहे. (महान विद्वान म्हणून तुमची जी ख्याती आहे त्या नामाची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी ) (सोमाय) श्रेष्ठ ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी आणि (ते) आपल्या आज्ञेप्रमाणे वागण्यासाठी मी (स्वाहा) सत्य-धर्मपालन, सत्कर्म तसेच (स्वाहा) सत्यभाषणाद्वारे (उरू) (अन्तरिक्षं) अवकाश प्राप्त करीत (म्हणजे वेळेचा सदुपयोग करीत) (एमि) आपल्याजवळ येतो. ॥2॥
Essence
भावार्थ - माणसांनी आपल्या स्वत:च्या सुख सोयीकरिता अन्न, जल आदी पदार्थांचे संपादन अवश्य करावे, पण त्याबरोबर ते पदार्थ अन्य जणांनादेखील द्यावेत. ज्याप्रमाणे माणूस आपल्या सत्कर्माची प्रशंसा करतो, तद्वत इतरांच्या चांगल्या कामाचीही यशोचित प्रशंसा अवश्य करावी. तसेच ज्याप्रमाणे विद्वज्जन उत्तम गुणवान असतात, तद्वत माणसाने स्वत: देखील व्हावे ॥2॥
Subject
माणसांनी एकमेकाशी कसे वागावे अथवा माणसांची पारस्परिक वागणूक कशी ठेवावी, हा विषय पुढील मंत्रात सांगितला आहे -