Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 19

48 Mantra
7/19
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- वत्सार काश्यप ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी पङ्क्ति Swara- धैवतः
Mantra with Swara
ये दे॑वासो दि॒व्येका॑दश॒ स्थ पृ॑थि॒व्यामध्येका॑दश॒ स्थ। अ॒प्सु॒क्षितो॑ महि॒नैका॑दश॒ स्थ ते दे॑वासो य॒ज्ञमि॒मं जु॑षध्वम्॥१९॥

ये। दे॑वा॒सः॒। दि॒वि। एका॑दश। स्थ। पृ॒थि॒व्याम्। अधि॑। एका॑दश। स्थ। अप्सु॒क्षित॒ इत्य॑प्सु॒ऽक्षितः॑। म॒हि॒ना। एका॑दश। स्थ। ते। दे॒वा॒सः॒। य॒ज्ञम्। इ॒मम्। जु॒ष॒ध्व॒म् ॥१९॥

Mantra without Swara
ये देवासो दिव्येकादश स्थ पृथिव्यामध्येकादश स्थ अप्सुक्षितो महिनैकादश स्थ ते देवासो यज्ञमिमथ्जुषध्वम् ॥

ये। देवासः। दिवि। एकादश। स्थ। पृथिव्याम्। अधि। एकादश। स्थ। अप्सुक्षित इत्यप्सुऽक्षितः। महिना। एकादश। स्थ। ते। देवासः। यज्ञम्। इमम्। जुषध्वम्॥१९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ये) जे (महिना) आल्या महिमेने (दिवि) विद्युतरुपाने स्थित (एकादश) अकरा देव (दिव्यगुणयुक्त देत आहेत) म्हणजे प्राण, अपान, उदान, व्यान, समान, नाग, कुर्म्म, कृकल, देवदत्त, धनंजय आणि जीवात्मा हे (देवास:) दिव्यगुणयुक्त देव (स्थ) आहेत, तसेच (पृथिन्याम्) पृथ्वी (अधि) वर जे (एकादश) अकरा म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, पवन, आकाश, आदित्य, चन्द्रमा, नक्षत्र, अहंकार, महत्तत्व आणि प्रकृती (स्थ) आहेत, तसेच जे (एकादश) अकरा म्हणजे श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, नासिका, वाणी, हात, पाय, गुदा, लिंग आणि मन (स्थ) आहेत (ते) ते सर्व ज्याप्रमाणे आपापल्या कार्यात मग्न व विद्यमान आहेत, त्याप्रमाणे हे (देवास:) राजसभेच्या सभासदजनही, आपणही आपापल्या कत्तर्व्यकर्मात तत्पर राहून (इमम्) या (यज्ञम्) राजा-प्रजा संबंध व राजधर्म विषयक कार्यामध्ये (जुवध्वम्) तल्लीन रहा. (या शासन कार्यातीत कर्त्तव्ये पूर्ण करा) ॥19॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे अन्तरिक्षादी स्थानातील सर्व पदार्थ आपापल्या कार्यात प्रवृत्त आहेत, त्याप्रमाणे राजसभासदांनी देखील आपापल्या न्याय्य कर्तव्यांची पूर्तता अवश्य करावी. ॥19॥
Subject
आता पुढील मंत्रात राजा आणि सभासद यांच्या कर्त्तव्याविषयी वर्णन केले आहे -