Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 16

48 Mantra
7/16
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- वत्सार काश्यप ऋषिः Chhand- निचृत् आर्षी त्रिष्टुप्,साम्नी गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ॒यं वे॒नश्चो॑दय॒त् पृश्नि॑गर्भा॒ ज्योति॑र्जरायू॒ रज॑सो वि॒माने॑। इ॒मम॒पा स॑ङ्ग॒मे सूर्य॑स्य॒ शिशुं॒ न विप्रा॑ म॒तिभी॑ रिहन्ति। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ मर्का॑य त्वा॥१६॥

अ॒यम्। वे॒नः। चो॒द॒य॒त्। पृश्नि॑गर्भा॒ इति॒ पृश्नि॑ऽगर्भाः। ज्योति॑र्जरायु॒रिति॒ ज्योतिः॑ऽजरायुः। रज॑सः। वि॒मान॒ इति॑ वि॒ऽमाने॑। इ॒मम। अ॒पाम्। स॒ङ्ग॒म इति॑ सम्ऽग॒मे। सूर्य्य॑स्य। शिशु॑म्। न। विप्राः॑। म॒तिभि॒रिति॑ म॒तिऽभिः॑। रि॒ह॒न्ति॒। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। मर्का॑य। त्वा॒ ॥१६॥

Mantra without Swara
अयँवेनश्चोदयत्पृश्निगर्भा ज्योतिर्जरायू रजसो विमाने । इममपाँ सङ्गमे सूर्यस्य शिशुन्न विप्रा मतिभी रिहन्ति । उपयामगृहीतोसि मर्काय त्वा ॥

अयम्। वेनः। चोदयत्। पृश्निगर्भा इति पृश्निऽगर्भाः। ज्योतिर्जरायुरिति ज्योतिःऽजरायुः। रजसः। विमान इति विऽमाने। इमम। अपाम्। सङ्गम इति सम्ऽगमे। सूर्य्यस्य। शिशुम्। न। विप्राः। मतिभिरिति मतिऽभिः। रिहन्ति। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। मर्काय। त्वा॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे शिल्पविद्येचे ज्ञाता विद्वान सभाध्यक्ष, (उपसामगृहीत:) राज्याची सेना आदी जी विविध अंगें असतात, त्या अंगांनी आपण बलवान व सक्षम (असि) आहात. (रजस:) लोक-लोकांतरामध्ये) (पृश्निगर्ब्भा:) अधिक अवकाश (स्थान) असलेले जे लोक (भुवन) आहेत, त्यांना (ज्योतिर्जरायु:) तारामंडळास निष्प्रभ करणारा (अथम्) हा (वेन:) मनोहर चंद्र (चोदयत्) त्या त्या ग्रह, नक्षत्र आदींना आपापल्या यथोचित मार्गात संचलित करतो. (इमम्) हा चंद्र ज्याप्रमाणे (अपां) जल आणि (सूर्यास्थ) सूर्याच्या (संगमे) आकर्षण आदी नियमांनी बांधलेला आहे, त्याप्रमाणे विद्वज्जन (शिशुम्) शिकण्यास पात्र अशा बालकाला आपल्या (मतिभि:) बुद्धी व ज्ञानाने (रिहंति) सत्कार व आदर देऊन ग्रहण करतात. मी (एक श्रेष्ठ वैज्ञानिक) (मर्काय) दुष्टांचे दलन-दमन करण्यासाठी आणि श्रेष्ठ व्यवहारांच्या स्थापनेसाठी (सुव्यवस्थित, शांत व निर्भय राज्य बनविण्यासाठी) (विमाने) या विशाल अंतरिक्षात विविध प्रकारचे यान निर्माण करण्यासाठी व चालविण्यासाठी (त्वा) तुझे ग्रहण करीत आहे. (आकाशातील युद्ध जिंकण्यासाठी विमानादीची निर्मिती व संचालन यांचे शिक्षण वा ज्ञान देत आहे) ॥16॥
Essence
भावार्थ - सभाध्यक्षाचे कर्तव्य आहे की त्याने विद्वानांच्या (वैज्ञानिकांच्या) श्रेष्ठ गुणांना प्रकट होण्याची संधी द्यावी. सूर्य आणि चंद्राप्रमाणे त्यांच्यातील प्रतिभा प्रगट व्हावी. तसेच सेना आदी द्वारे दृष्टांचे व्यवहार शांत करावेत आणि श्रेष्ठ व्यवहारांद्वारे सज्जनांना आल्हादित करावे ॥16॥
Subject
आता सभाध्यक्ष असलेल्या राजाने काय करावे, (त्याचे कर्त्तव्य-कर्म कोणते) याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -