Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 13

48 Mantra
7/13
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- वत्सार काश्यप ऋषिः Chhand- निचृत् आर्षी त्रिष्टुप्,प्राजापत्या गायत्री, Swara- धैवतः, षड्जः
Mantra with Swara
सु॒वीरो॑ वी॒रान् प्र॑ज॒नय॒न् परी॑ह्य॒भि रा॒यस्पोषे॑ण॒ यज॑मानम्। स॒ञ्ज॒ग्मा॒नो दि॒वा पृ॑थि॒व्या शु॒क्रः शु॒क्रशो॑चिषा॒ निर॑स्तः॒ शण्डः॑ शु॒क्रस्या॑धि॒ष्ठान॑मसि॥१३॥

सु॒वीर॒ इति॑ सु॒ऽवीरः॑। वी॒रान्। प्र॒ज॒नय॒न्निति॑ प्रऽज॒नय॑न्। परि॑। इ॒हि॒। अ॒भि। रा॒यः। पोषे॑ण। यज॑मानम्। स॒ञ्ज॒ग्मा॒न इति॑ सम्ऽजग्मा॒नः। दि॒वा। पृ॒थि॒व्या। शु॒क्रः। शु॒क्रशो॑चि॒षेति॑ शु॒क्रऽशो॑चिषा। निर॑स्त॒ इति॒ निःऽअ॑स्तः। शण्डः॑। शु॒क्रस्य॑। अ॒धि॒ष्ठान॑म्। अ॒धि॒स्थान॒मित्य॑धि॒ऽस्थान॑म्। अ॒सि॒ ॥१३॥

Mantra without Swara
सुवीरो वीरान्प्रजनयन्परीह्यभि रायस्पोषेण यजमानम् । सञ्जग्मानो दिवा पृथिव्या शुक्रः शुक्रशोचिषा निरस्तः शण्डः शुक्रस्याधिष्ठानमसि ॥

सुवीर इति सुऽवीरः। वीरान्। प्रजनयन्निति प्रऽजनयन्। परि। इहि। अभि। रायः। पोषेण। यजमानम्। सञ्जग्मान इति सम्ऽजग्मानः। दिवा। पृथिव्या। शुक्रः। शुक्रशोचिषेति शुक्रऽशोचिषा। निरस्त इति निःऽअस्तः। शण्डः। शुक्रस्य। अधिष्ठानम्। अधिस्थानमित्यधिऽस्थानम्। असि॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे योगिन्, (सुवीर:) वीरतेमुळे श्रेष्ठ असलेल्या वीराप्रमाणे आपणही योगशक्तीमुळे शूरवीर झाला आहात (वीरान्) उत्तम गुणांनी युक्त पुरूषांना आपण (प्रजनयन्) आपल्या योगशक्ती आणि गुणांनी अधिक समृद्धकरीत (परीहि) सर्वत्र भ्रमण करा (योगीजनांनी एके ठिकाणी वास्तव्य न करता सर्वांनी योगविद्येचे शिक्षण व लाभ प्राप्त करून द्यावेत) तसेच (यजमानम्) धन आदी उत्तम पदार्थांचे दान करणार्‍या दानी पुरुषांच्या (अभि) समोर (राय:) धनाची (पोषेण) समृद्धी देऊन (संजग्भान:) त्यांच्या सह रहा (जे धनी दानी आहेत, त्यांच्या ऐश्वर्यात वृद्धी होत राहील, असे करा) आपण (दिवा) सूर्याच्या आणि (पृथिव्या) पृथ्वीच्या गुणांनी (शुक्र:) अति बलवान झालेले आहात (सूर्याप्रमाणे सर्वांना प्रेरणा व प्रकाश देणारे आणि पृथ्वीप्रमाणे पोषण करणारे आहात) आपण (शुक्रशोचिषा) त्या आपल्या सूर्याप्रमाणे असलेल्या तेजस्वी दीप्तीने (भिरस्त:) अज्ञानरुप अंधकाराला तसेच योगशक्तीने विषय वासनेला नष्ट करणारे व (शण्ड:) शम-दम आदी गुणांनी युक्त आहात. आपण (शुक्रस्थ) योगबलाचे (अधिष्ठानम्) आधार (असि) आहात. (आपल्या जवळ जी अनंत अशी योगशक्ती आहे, ती योगविद्येचा आधार आहे) ॥13॥
Essence
भावार्थ - योभाग्यासात तत्पर एक योगी शम-दम आदी गुणांचा आधार असतो (तो मूर्तीमंत योग व योगाचा आदर्श असतो) तो योगविद्येची प्राप्ती करण्यास इच्छुक जनांना आपली योगविद्या शिकवितो. अशा प्रकारे तो शिकणार्‍या साधकांचे आत्मबल वाढवितो आणि स्वत: सूर्याप्रमाणे प्रकाशित म्हणजे कीर्तिमंत होतो. ॥13॥
Subject
योगानुष्ठान करणारा योगी कसा असतो, पुढील मंत्रात याविषयी उपदेश केला आहे. -