Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 11

48 Mantra
7/11
Devata- अश्विनौ देवते Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- ब्राह्मी उष्णिक्, Swara- ऋषभः
Mantra with Swara
या वां॒ कशा॒ मधु॑म॒त्यश्वि॑ना सू॒नृता॑वती। तया॑ य॒ज्ञं मि॑मिक्षितम्। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्य॒श्विभ्यां॑ त्वै॒ष ते॒ योनि॒र्माध्वी॑भ्यां त्वा॥११॥

या। वा॒म्। कशा॑। मधु॑मतीति॒ मधु॑ऽमती। अश्वि॑ना। सू॒नृताव॒तीति॑ सू॒नृता॑ऽवती। तया॑। य॒ज्ञम्। मि॒मि॒क्ष॒त॒म्। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। अ॒श्विभ्या॒मि॒त्य॒श्विऽभ्या॑म्। त्वा॒। ए॒षः। ते॒। योनिः॑। माध्वी॑भ्याम्। त्वा॒ ॥११॥

Mantra without Swara
या वाङ्कशा मधुमत्याश्विना सूनृतावती । तया यज्ञम्मिमिक्षतम् । उपयामगृहीतो स्यश्विभ्यान्त्वैष ते योनिर्माध्वीभ्यान्त्वा ॥

या। वाम्। कशा। मधुमतीति मधुऽमती। अश्विना। सूनृतावतीति सूनृताऽवती। तया। यज्ञम्। मिमिक्षतम्। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। अश्विभ्यामित्यश्विऽभ्याम्। त्वा। एषः। ते। योनिः। माध्वीभ्याम्। त्वा॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अश्विनौ) सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशासारखे ज्योतिमान योगाध्यापक व योगसाधक जनहो, (वाय्) तुमची (या) जी (मधुमती) मधुरगुणमयी स्तुत्य वाणी आहे, तसेच जी (सूनृतावती) प्रभातसमयी हळू हळू वाढत जाणार्‍या उष: काळाप्रमाणे मोहित करणारी आहे त्या (कशा) (तया) वाणीद्वारे (यज्ञम्) तुम्ही ईश्वराशी नाते जोडणार्‍या (समाधी अवस्थेत ईश्वराचा अनुभव देणारा) योगरुप यज्ञाला (मिमिक्षतम्) सिद्ध करा (योगाद्वारे अनुभव प्राप्त करा) हे योग शिकवणार्‍या साधका, तुला (उपयामगृहीत:) अध्यापकाने यम-नियम आदी अष्टांग- साधनांनी स्वीकार केले (यम-नियमांचे शिक्षण दिले आहे) (अकि) आहे (ते) तुझा (एष:) हा योग (यानि:) एका सुखशांतिदायक घराप्रमाणे आहे. (अश्विभ्याम्) योगसाधने करिता प्राण आणि अपान यांचे नियमनाचे जे नियम आहेत, त्याद्वारे (त्या) तुला (शिष्याला) आणि हे योगाध्यापका, तुला (माध्वीभ्याम्) माधुर्यपूर्ण श्रेष्ठ नीतीचे ज्ञान व्हावे, योगसाधनेची रीती तुम्हा दोघांप्रमाणे आम्हालाही प्राप्त व्हावी, यासाठी आम्ही (सामान्यजन) तुमच्या आश्रयास येतो. योगज्ञान प्राप्तीसाठी तुमच्याजवळ स्थानग्रहण करतो ॥11॥
Essence
missing
Subject
पुनश्च, पुढील मंत्रात योगाध्यापक आणि योगसाधक शिष्य यांच्या उपदेश केला आहे -