Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 1

48 Mantra
7/1
Devata- प्राणो देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- निचृत् आर्षी अनुष्टुप्, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
वा॒चस्पत॑ये पवस्व॒ वृष्णो॑ऽअ॒ꣳशुभ्यां॒ गभ॑स्तिपूतः। दे॒वो दे॒वेभ्यः॑ पवस्व॒ येषां॑ भा॒गोऽसि॑॥१॥

वा॒चः। पत॑ये। प॒व॒स्व॒। वृष्णः॑। अ॒ꣳशुभ्या॒मित्य॒ꣳशुऽभ्या॑म्। गभ॑स्तिपूत॒ इति॒ गभ॑स्तिऽपूतः॒। दे॒वः। दे॒वेभ्यः॑। प॒व॒स्व॒। येषा॑म्। भा॒गः। असि॑ ॥१॥

Mantra without Swara
वाचस्पतये पवव वृष्णो अँशुभ्याङ्गभस्तिपूतः । देवो देवेभ्यः पवस्व येषां भागो सि ॥

वाचः। पतये। पवस्व। वृष्णः। अꣳशुभ्यामित्यꣳशुऽभ्याम्। गभस्तिपूत इति गभस्तिऽपूतः। देवः। देवेभ्यः। पवस्व। येषाम्। भागः। असि॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्या, तू (वाच:) वाणीचा (पतये) स्वामी जो परमेश्वर, त्याच्यासाठी (पवस्व) पवित्र हो. (वाचस्पति) परमेश्वराच्या संसारात पवित्र वाणी व पवित्र आचरण ठेव (वृष्ण:) बलवान पुरुषाच्या (अंशुभ्य:) दोन्ही भुजा ज्याप्रमाणे शरीरातील व बाहेरील कर्म करण्यासाठी पवित्र असतात आणि (गभस्तिपूत:) सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे सर्व पदार्थ पवित्र व निर्मळ होतात, त्याप्रमाणे हे मनुष्या (अर्थात हे सर्व मनुष्यांनो, तुम्ही सर्वजण) (देव:) दिव्यगुणयुक्त न विद्वान व्हा. (येणां) ज्या विद्वानांचा जो (भाग:) सेवन करण्यास योग्य असा संग आहे, त्या (देवेभ्य:) विद्वज्जनांसाठी (पवस्व) तू पवित्र हो तुम्हा व्हा. (विद्वानांच्या संगतीत राहून जीवन पवित्र करू घे)
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे सर्व मनुष्यांसाठी उचित कर्म आहे की त्यांनी वेदांचे रक्षण करणार्‍या ईश्वरास जाणावे आणि विद्वज्जनांच्या संगतीत राहून विद्या आदी उत्तम गुण धारणा करावीत. तसेच गुणवंत होऊन सत्यभाषी व्हावे. ॥1॥
Subject
आता सातव्या अध्यायाचा आरंभ होत आहे॥7॥^सातव्या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात संसारामध्ये बाहेर व आंत (घरात व घराबाहेर समाजात) कसे वागावे, याविषयी उपदेश केला आहे.