Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 8

37 Mantra
6/8
Devata- बृहस्पतिर्देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- प्राजापत्या अनुष्टुप्,भूरिक् प्राजापत्या बृहती, Swara- ऋषभः
Mantra with Swara
रेव॑ती॒ रम॑ध्वं॒ बृह॑स्पते धा॒रया॒ वसू॑नि। ऋ॒तस्य॑ त्वा देवहविः॒ पाशे॑न प्रति॑मुञ्चामि॒ धर्षा॒ मानु॑षः॥८॥

रेव॑तीः। रम॑ध्वम्। बृह॑स्पते। धा॒रय॑। वसू॑नि। ऋ॒तस्य॑। त्वा॒। दे॒व॒ह॒वि॒रिति॑ देवऽहविः। पाशे॑न। प्रति॑। मु॒ञ्चा॒मि॒। धर्ष॑। मानु॑षः ॥८॥

Mantra without Swara
रेवती रमध्वं बृहस्पते धारया वसूनि । ऋतस्य त्वा देवहविः पाशेन प्रति मुञ्चामि धर्षा मानुषः ॥

रेवतीः। रमध्वम्। बृहस्पते। धारय। वसूनि। ऋतस्य। त्वा। देवहविरिति देवऽहविः। पाशेन। प्रति। मुञ्चामि। धर्ष। मानुषः॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (रेवतीः) श्रेष्ठ धनाचे स्वामी असलेल्या पुत्रांनो अथवा हे प्रजाजन हो, तुम्ही विद्या आणि उत्तम शिक्षणामधे (रमध्वम्) रममाण व्हा (चांगले ते शिका व विद्याभ्यासामधे रुची असू द्या) हे (बृहस्पते) वेदवाणीचे ज्ञाता विद्वान्, आपण (ऋतस्य) सत्य आणि न्याय्य मार्गाने, सत्यव्यवहाराद्वारे प्राप्त (वस्तूनि) धनाचा अर्थात आम्ही (शिक्षणार्थी) आपणांस देत असलेल्या द्रव्य आदी पदार्थांचा (धारय) स्वीकार करा. -(आता अध्यापकशिष्याप्रत उपदेश करीत आहे) हे राजन्, प्रजाजन वा हे राजपुरुष, (मानुषः) सर्व शास्त्रांचा अभ्यासक आणि विचारक मी एक अध्यापक (पाशेन) अविद्यारुप बंधनापासून तुम्हा सर्वांना (प्रति) (मुञ्चमि) सोडवितो. तुम्ही सर्व जण माझ्याकडून विद्या आणि चांगले शिक्षण प्राप्त करून निश्‍चयी व निस्संकोची व्हा. (अध्यापक, आचार्य आदींनी सभापती, अधिकारी प्रजाजन आदींचे निर्देशन करावे. शिक्षणार्थींनी अध्यापकास योग्य ते द्रव्य द्यावे) ॥8॥
Essence
भावार्थ - विद्वानांनी आपल्या ज्ञानाचा लाभ कुमार ब्रह्मचारी आणि कुमारी ब्रह्मचारिणीला द्यावे. हे ज्ञान व शिक्षण परमेश्‍वरापासून ते पृथ्वीवरील सर्व पदार्थां विषयी असावे की ज्यायोगे शिक्षणार्थी मूर्खत्वरूप बंधनापासून मुक्त होऊन सुखी होतील. ॥8॥
Subject
पिता आदी रक्षक-पालक जनांनी आपल्या संततीला अध्यापकांकडे सोपवावे, पण ते अध्यापक कसे असावेत व कोणत्या पद्धतीने सोपवावे? तसेच अध्यापकांनी त्या शिक्षणार्थी मुलांना कोणत्या रीतीने स्वीकारावे? पुढील मंत्रात याविषयी उपदेश केला आहे -