Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 7

37 Mantra
6/7
Devata- त्वष्टा देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- निचृत् आर्षी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
उ॒पा॒वीर॒स्युप॑ दे॒वान् दैवी॒र्विशः॒ प्रागु॑रु॒शिजो॒ वह्नि॑तमान्। देव॑ त्वष्ट॒र्वसु॑ रम ह॒व्या ते॑ स्वदन्ताम्॥७॥

उ॒पा॒वीरित्यु॑पऽअ॒वीः। अ॒सि॒। उप॑। दे॒वान्। दैवीः॑। विशः॑। प्र। अ॒गुः॒। उ॒शिजः॑। वह्नि॑तमा॒निति॒ वह्नि॑ऽतमान्। देव॑। त्व॒ष्टः॒। वसु॑। र॒म॒। ह॒व्या। ते॒। स्व॒द॒न्ता॒म् ॥७॥

Mantra without Swara
उपावीरस्युप देवान्दैवीर्विशः प्रागुरुशिजो वह्नितमान् । देव त्वष्टर्वसु रम हव्या ते स्वदन्ताम् ॥

उपावीरित्युपऽअवीः। असि। उप। देवान्। दैवीः। विशः। प्र। अगुः। उशिजः। वह्नितमानिति वह्निऽतमान्। देव। त्वष्टः। वसु। रम। हव्या। ते। स्वदन्ताम॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (देव) दिव्यगुणसंपन्न (त्वष्टः) सर्व दुःखांचे छेदन करणारे सभाध्यक्ष! आपण (उपावीः) आश्रयास येणार्‍याचे, म्हणजे शरणागताचे पालकासमान (असि) आहात. (देवीः) विद्वानांजवळ राहणारे दिव्यगुणसंपन्न (विशः) प्रजाजन (उशिजः) श्रेष्ठ गुणांची कामना करतांना (वह्नितमान्) धर्ममार्गावर चालणार्‍या आणि चालविणार्‍या (देवान्) अत्यंत विद्वानजनांकडे (अधिक विदय व सद्गुण प्राप्त करण्यासाठी.) (उपप्रागुः) जातात, त्याप्रमाणे ते (रक्षण आणि ऐश्‍वर्यासाठी) आपणाकडेही येतात. आपला आश्रय प्राप्त करून प्रजाजन धनाढ्य होऊन सुखी होतात, त्याप्रमाणे आपण देखील प्रजाजनांतर्फे सत्कृत होऊन (रमस्व) हर्षित व्हा. (राजाने प्रजेला आश्रय, संरक्षण व ऐश्‍वर्य द्यावे आणि प्रजाजनांनी आपल्या राजाचा यथोचित सम्मान-सत्कार करावा) हे राजन्, ज्याप्रमाणे आपण प्रजेने उत्पन्न व अर्जित केलेल्या पदार्थांचा उपभोग घेता, त्याप्रमाणे प्रजेने देखील आपण दिलेल्या (हवतया) भोग्य व अमूल्य (वसु) धन आदी पदार्थांचा (स्वदन्ताम्) आनंदाने उपभोग घ्यावा. ॥7॥
Essence
भावार्थ - सद्गुणग्रहणाची कामना करणारे लोक उत्तम गुणवान विद्वानांजवळ जातात (त्यांची सेवा करून त्यांच्या सहवासात राहतात) त्याचप्रमाणे प्रजाजन देखील न्यायप्रिय आणि नीतिकुशल राजाचा आश्रय ग्रहण करतात. यामुळेच दोघांत एकमेकाविषयी प्रीतिभाव निर्माण होतो. ॥7॥
Subject
राजाने प्रजाजनांप्रती काम करावे आणि प्रजेची राजाविषयी कोणती कर्त्तव्यें आहेत, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -