Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 37

37 Mantra
6/37
Devata- इन्द्रो देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
त्वम॒ङ्ग प्रश॑ꣳसिषो दे॒वः श॑विष्ठ॒ मर्त्य॑म्। न त्वद॒न्यो म॑घवन्नस्ति मर्डि॒तेन्द्र॒ ब्रवी॑मि ते॒ वचः॑॥३७॥

त्वम्। अ॒ङ्ग। प्र॒। श॒ꣳसि॒षः॒। दे॒वः। श॒वि॒ष्ठ॒। मर्त्य॑म्। न। त्वत्। अ॒न्यः। म॒घ॒व॒न्निति॑ मघऽवन्। अ॒स्ति॒। म॒र्डि॒ता। इन्द्र॑। ब्र॒वीमि॒। ते॒। वचः॑ ॥३७॥

Mantra without Swara
त्वमङ्ग प्र शँसिषो देवः शविष्ठ मर्त्यम् । न त्वदन्यो मघवन्नस्ति मर्डितेन्द्र ब्रवीमि ते वचः ॥

त्वम्। अङ्ग। प्र। शꣳसिषः। देवः। शविष्ठ। मर्त्यम्। न। त्वत्। अन्यः। मघवन्निति मघऽवन्। अस्ति। मर्डिता। इन्द्र। ब्रवीमि। ते। वचः॥३७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अंग) (शविष्ठ) अत्यंत बलशाली (मघवन्) महाराज वा महाशय (इन्द्र) ऋद्धी-सिद्दीचं दाता, ऐश्‍वर्य प्रदाता सभाध्यक्ष महोदय, (त्वम्) आपण (मर्त्यं) प्रजाजनांना (प्रशंसिष) प्रशंसित वा कीर्तीमान करा. आपण (देवः) देवांना म्हणजे (प्रजाजनांस त्रास देणार्‍या) शत्रूंना पराभूत करणारे आहात. (त्वदन्यः) (न) आपराव्यतिरिक्त कोणीही असा समर्थ व शक्तिमान नाही की जो प्रजाजनांना (मर्डिता) सुखी करू शकेल. मी (आपला एक प्रजाजन) (ते) आपणास (वचः) राज्यव्यवस्थेविषयी प्रार्थना वा निवेदन करीत (ब्रवीमि) उत्तम वचन बोलत आहे. ॥37॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे परमेश्‍वर हा सर्वांचा मित्र आणि पक्षपातविरहित आहे, त्याप्रमाणे सभाध्यक्षांनेदेखील राजधर्मानुवर्ती राजा होऊन प्रशंसनीय मनुष्याची प्रशंसा करावी, (त्याचा उत्साह वाढवावा) आणि निंदनीय मनुष्याची निंदा करावी तसेच दुर्जनाला दंड देत सज्जनाचे रक्षण करावे आणि याप्रकारे सर्वांची इच्छा पूर्ण करावी. ॥37॥
Subject
प्रजाजनांनी निर्वाचित सभाध्यक्षाची (राष्ट्राध्यक्ष) कशा प्रकारे प्रशंसा करावी, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे -
Footnote
या अध्यायात खालील विषयांचे वर्णन आले आहे.^राजाचा अभिषेक व शिक्षा-दीक्षा, राजाचे कर्त्तव्य, प्रजेला राजाचा आश्रय, सभाध्यक्ष अभिषेक व शिक्षा-दीक्षा, राज्याचे कर्त्तव्य, प्रजेला राजाचा आश्रय, सभाध्यक्ष आदींची कर्त्तर्व्यकर्में, विष्णुपरमपदवर्णन, सभाध्यक्षाने ईश्‍वरोपसना करावी, राजा व प्रजा यांच्यातील पारस्परिक कर्त्तव्य, गुरुने शिष्याचा केलेला स्वीकार आणि त्यास शिक्षण-अध्यापन, यज्ञनुष्ठान, होम केलेल्या द्रव्यांची फलश्रुती, विद्वज्जनांची लक्षणे, मनुष्यांचे कर्त्तव्य, मनुष्यांचे एकमेकाविषयी व्यवहार, दुष्ट दोषांची निवृत्ती, ईश्‍वराला काय प्रार्थना करावी, युद्धात योद्धांचे कर्म, युद्धकर्म निरूपण, युद्धात सैनिकांचा पारस्परिक सहभाव, वीरांना प्रोत्साहित करणे, राज्याची व्यवस्था, त्याची कारणें व साधनें, राजाप्रती ईश्‍वराने केलेला उपदेश, राज्यकर्माची पूर्तता, राजा व प्रजेची कर्त्तव्यकर्में, राजा आणि प्रजेच्या सभांचे पारस्परिक व्यवहार, प्रजेद्वारे सभापतीस सहयोग देणे, प्रजाजनांप्रत सभापतीचा उपदेश वा प्रेरणा, प्रजेची स्वीकरणीय कर्में, सभापतीचे लक्षण, प्रजा व राजसभा या दोघांनी प्रतिज्ञा करणे, सभाध्यक्षाद्वारे स्वीकारणीय उद्दिष्टें, प्रजेच्या कल्याणासाठी सभापतीने कोणती कार्यें करावीत, सभाध्यक्ष आदी अधिकार्‍यांच्या पत्नीचे कर्त्तव्य, पति-पत्नीची पारस्परिक वागणूक, संतानाप्रत माता-पित्याची कर्त्तव्यें आणि प्रजाजनांनी सभाध्यक्षास केलेला उपदेश. या विषयांचा संबंध पाचव्या अध्यायातील मंत्राशी असल्यामुळे या सहाव्या अध्यायातील मंत्रार्थाची संगती पाचव्या अध्यायाशी लावली पाहिजे. ॥^सहावा अध्याय समाप्त ॥6॥