Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 36

37 Mantra
6/36
Devata- सोमो देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- पुरोष्णिक्, Swara- ऋषभः
Mantra with Swara
प्रागपा॒गुद॑गध॒राक्स॒र्वत॑स्त्वा॒ दिश॒ऽआधा॑वन्तु। अम्ब॒ निष्प॑र॒ सम॒रीर्वि॑दाम्॥३६॥

प्राक्। अपा॑क्। उद॑क्। अ॒ध॒राक्। स॒र्वतः॑। त्वा॒। दिशः॑। आ। धा॒व॒न्तु॒। अम्ब॑। निः। प॒र॒। सम्। अ॒रीः। वि॒दा॒म् ॥३६॥

Mantra without Swara
प्रागपागुदगधराक्सर्वतस्त्वा दिश आ धावन्तु । अम्ब नि ष्पर समरीर्विदाम् ॥

प्राक्। अपाक्। उदक्। अधराक्। सर्वतः। त्वा। दिशः। आ। धावन्तु। अम्ब। निः। पर। सम्। अरीः। विदाम्॥३६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अम्बा) संतानावर अमाप प्रेम करणार्‍या माते, तुझी (अरीः) तुझ्याकडे प्रेमाने (प्राक्) पूर्वदिशेकडून (अपाक्) पश्‍चिम (उदक्) उत्तर (अधराक्) दक्षिणदिशेकडून एवढेच नव्हे तर (सर्वतः) सर्व (दिशः) दिशेकडून (त्वा) तुझ्याकडे (आ) (धावन्तु) धावत येवोत. तुदेखील त्या संतानांना (निः) (पर) निरंतर प्रेम दे. त्याचप्रमाणे ते पुत्र पुत्री आदी तुझी संताने सदा (सम्) प्रेम तसेच आदरभावनेने तुझ्याकडे पाहतील ॥36॥
Essence
भावार्थ - आई-वडिलांचे कर्वव्य आहे की त्यांनी आपल्या संततीस विद्या आणि सद्गुणग्रहणाकडे प्रवृत्त करावे. त्यांच्या शरिराचे पालन-संगोपन अशा रीतीने करावे की ज्यायोगे ते शरिराने नीरोग आणि उत्साहित राहातील व सद्गुण अंगी बाळगतील. व त्याचप्रमाणे पुत्रांनी देखील आपल्या आई-वडिलांची सेवा करावी व त्यांना सर्वप्रकारे आनंदी ठेवावे. ॥36॥
Subject
पति-पत्नीच्या मुलांनी काय काय करावे (कसे वागावे) आणि त्या आई-वडिलांनी आपल्या मुलांचे पालन-संगोपन कसे करावे. हे पुढील मंत्रात सांगितले आहे-