Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 35

37 Mantra
6/35
Devata- द्यावापृथिव्यौ देवते Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
मा भे॒र्मा संवि॑क्था॒ऽऊर्जं॑ धत्स्व॒ धिष॑णे वी॒ड्वी स॒ती वी॑डयेथा॒मूर्जं॑ दधाथाम्। पा॒प्मा ह॒तो न सोमः॑॥३५॥

मा। भेः॒। मा। सम्। वि॒क्थाः॒। ऊर्ज॑म्। ध॒त्स्व॒। धिष॑णे॒ऽइति॑ धिष॑णे। वीड्वीऽइति॑ वी॒ड्वी। स॒ती॑ऽइति॑ स॒ती। वी॒ड॒ये॒था॒म्। ऊ॑र्जम्। द॒धा॒था॒म्। पा॒प्मा। ह॒तः। न। सोमः॑ ॥३५॥

Mantra without Swara
मा भेर्मा सँविक्था ऊर्जन्धत्स्व धिषणे वीड्वी सती वीडयेथामूर्जन्दधाथाम् । पाप्मा हतो न सोमः ॥

मा। भेः। मा। सम्। विक्थाः। ऊर्जम्। धत्स्व। धिषणेऽइति धिषणे। वीड्वीऽइति वीड्वी। सतीऽइति सती। वीडयेथाम्। ऊर्जम्। दधाथाम्। पाप्मा। हतः। न। सोमः॥३५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (कोणी विद्वान वयोवृद्ध मनुष्य पति-पत्नीस उपदेश करीत आहे अथवा परमपिता परमेश्‍वर वेदमंत्राद्वारे सर्व गृहस्थ स्त्री-पुरुषांना आदेश देत आहे) हे स्त्री (पत्नी) तू (विड्वी सती) शारीरिक आणि आत्मिक शक्ती युक्त होऊन आपल्या पतिपासून (मा भेः) भिऊ नकोस (मासंविक्था) भिऊन कंपित होऊ नकोस. (त्यावर प्रेम कर व त्याची प्रिय होशील, असे आचरण कर) (उर्ज्जम्) आपल्या शरीर आणि आत्म्याच्या शक्ती आणि पराक्रमाला ओळख व ती शक्ती (धत्स्व) धारण कर. (पति-पत्नीस उद्देशून) तुम्ही दोघे पति-पत्नी (धिषणे) सूर्याप्रमाणे व भूमीप्रमाणे परोपकार व पराक्रम करीत राहा. (वीडयेथाम्) दोघेही दृढ व शक्तिमान व्हा. (माझा आशीर्वाद) की तुम्ही दोघे (पाप्माः) एकमेकाच्या चुकीला किंवा अपराधाला (हतः) नष्ट करण्यास शिका (तुमच्यातील अपराध-भाव नष्ट व्हावा) आणि तुम्ही दोघे (सोम।) चन्द्राप्रमाणे आनन्द आणि शांती देणारे व्हा. (एकमेकास व सर्वांस आनन्द व शांतिदायक व्हा) ॥35॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. पति-पत्नींनी एकमेकाशी असे आचरण ठेवावे की ज्यायोगे त्यांच्यामधे भय आणि उद्वेगाची भावना नष्ट होर्सल, आत्म्यात दृढता आणि उत्साह वाढेल, गृहाश्रमाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ऐश्‍वर्य वृद्धी होईल आणि दोघेही एकमेकाच्या दोष व दुःखांना दूर करीत चंद्राप्रमाणे आल्हाददायक होतील. ॥35॥
Subject
पती-पत्नीने एकमेकाविषयी कशी वर्तणूक ठेवावी, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -