Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 34

37 Mantra
6/34
Devata- यज्ञो देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- स्वराट् आर्षी पंथ्याबृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
श्वा॒त्रा स्थ॑ वृत्र॒तुरो॒ राधो॑गूर्त्ताऽअ॒मृत॑स्य॒ पत्नीः॑। ता दे॑वीर्देव॒त्रेमं य॒ज्ञं न॑य॒तोप॑हूताः॒ सोम॑स्य पिबत॥३४॥

श्वा॒त्राः। स्थ॒। वृ॒त्र॒तुर॒ इति॑ वृत्र॒ऽतुरः॑। राधो॑गूर्त्ता॑ इति॑ राधः॑ऽगूर्त्ताः। अ॒मृत॑स्य। पत्नीः॑। ताः। दे॒वीः॒। दे॒व॒त्रेति॑ देव॒ऽत्रा। इ॒मम्। य॒ज्ञम्। न॒य॒त॒। उप॑हूता॒ इत्यु॑पऽहूताः। सोम॑स्य। पि॒ब॒त॒ ॥३४॥

Mantra without Swara
श्वात्रा स्थ वृत्रतुरो राधोगूर्ता अमृतस्य पत्नीः । ता देवीर्देवत्रेमँयज्ञन्नयतोपहूताः सोमस्य पिबत ॥

श्वात्राः। स्थ। वृत्रतुर इति वृत्रऽतुरः। राधोगूर्त्ता इति राधःऽगूर्त्ताः। अमृतस्य। पत्नीः। ताः। देवीः। देवत्रेति देवऽत्रा। इमम्। यज्ञम्। नयत। उपहूता इत्युपऽहूताः। सोमस्य। पिबत॥३४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सभाध्यक्ष आणि इतर राजकर्मचारी, राजपुरुष आदींची पत्नीला उद्देशून) हे (देवीः) विद्यावती स्त्रीजनहो, तुम्ही (वृत्रतुरः) विद्युतप्रमाणे प्रकाशमान वा किर्तीमान आणि वृष्टीसमान सुखकारी व्हा. (राधोगूर्त्ताः) धनाची वृद्धी होण्याकरीता व उद्योग-व्यवसायाकरिता सहाय्यकारी व्हा. (पत्न्यः) यज्ञात सहाय्य करणार्‍या (स्थ) व्हा. (देवत्रा) उत्तम गुणवान व विद्वान अशा आपल्या पतीविषयी प्रीती असणार्‍या होऊन राहा. (इदम्) या यज्ञाला (नयत) पूर्ततेकडे न्या (उपहूताः) पतीने बोलावल्यानंतर जी व त्यांच्यासह (अमृतस्य) अती स्वादिष्ट अशा सोम आदी औषधींचे रस (पिबत) प्या. ॥34॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे विद्वानांची पत्नी आपल्या धर्मयुक्त आचरणाने आपल्या पतीला आनंदित करते, त्याचप्रमाणे पतीचे देखील कर्तव्य आहे की त्याने तसेच प्रीतीपूर्ण आचरण करून पत्नीस प्रसन्न ठेवावे. याप्रमाणे दोघांनी परस्परात आमोद-प्रमोद करीत गृहश्रमधर्माचे पालन करावे. ॥34॥
Subject
वर वर्णन केलेल्या सभाध्यक्ष आदींच्या पत्नीसाठी कोणकोणती कर्में कर्त्तव्य आहेत, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -