Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 32

37 Mantra
6/32
Devata- सभापती राजा देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- पंचपदा ज्योतिष्मती जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
इन्द्रा॑य त्वा॒ वसु॑मते रु॒द्रव॑त॒ऽइन्द्रा॑य त्वादि॒त्यव॑त॒ऽइन्द्रा॑य त्वाभिमाति॒घ्ने। श्ये॒नाय॑ त्वा सोम॒भृते॒ऽग्नये॑ त्वा रायस्पोष॒दे॥३२॥

इन्द्रा॑य। त्वा॒। वसु॑मत॒ इति॒ वसु॑ऽमते। रु॒द्रव॑त॒ इति॑ रु॒द्रऽव॑ते। इन्द्रा॑य। त्वा॒। आ॒दि॒त्यव॑त॒ इत्या॑दित्यऽव॑ते। इन्द्रा॑य। त्वा॒। अ॒भि॒मा॒ति॒घ्न इत्य॑भिमाति॒ऽघ्ने। श्ये॒नाय॑। त्वा॒। सो॒म॒भृत॒ इति॑ सोम॒ऽभृते॑। अ॒ग्नये॑। त्वा॒। रा॒य॒स्पो॒ष॒द इति॑ रायस्पोष॒दे ॥३२॥

Mantra without Swara
इन्द्राय त्वा वसुमते रुद्रवते इन्द्राय त्वादित्यवते इन्द्राय त्वाभिमातिघ्ने । श्येनाय त्वा मोमभृतेग्नये त्वा रायस्पोषदे ॥

इन्द्राय। त्वा। वसुमत इति वसुऽमते। रुद्रवत इति रुद्रऽवते। इन्द्राय। त्वा। आदित्यवत इत्यादित्यऽवते। इन्द्राय। त्वा। अभिमातिघ्न इत्यभिमातिऽघ्ने। श्येनाय। त्वा। सोमभृत इति सोमऽभृते। अग्नये। त्वा। रायस्पोषद इति रायस्पोषदे॥३२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे सभापते (राष्ट्राध्यक्ष महोदय), (वसुमते) चोवीस वर्ष ब्रह्मचर्य धारण करणार्‍या विद्वानांसाठी आणि (रुद्रवते) चव्वेचाळीस वर्ष ब्रह्मचर्य धारण कलेल्या विद्वानांसाठी (इन्द्राय) परमऐश्‍वर्यशाली पुरुषांसाठी आम्ही (त्वा) आपणांस ग्रहण करतो. (आपल्या राष्ट्रात मोठ्या संख्येत ब्रह्मचारी आणि विद्वानजन असावे, ही आपणांकडून अपेक्षा करीत आहोत) (आदित्यवते) अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य धारण करून जे सूर्यासमान तेजस्वी बनलेले विद्वान आहेत, अशा विद्वानांसाठी तसेच (इन्द्राय) उत्तम गुणांच्या प्राप्तीसाठी आम्ही (त्वा) आपली कामना करतो. (अभिमातिघ्ने) दुरभिमानी शत्रूंना मारण्यासाठी (इन्द्राय) जे आपण समर्थ शत्रुविदारक आहात, अशा (त्वा) आपणांस आम्ही चाहतो. आपण (सोमभृते) उत्तम ऐश्‍वर्ययुक्त आहात. (श्येनाय) युद्ध आदी वीरत्वाच्याप्रसंगी आपण बहिरीससाणा पक्ष्याप्रमाणे झपाटा मारून आक्रमण करता. अशा (त्वा) आपणाला आम्ही (रायस्पोषद) धनाच्या विपुलतेसाठी व (अग्नये) विद्युत आदी पदार्थांच्या गुणांचा शोध, अनुसंधान व उपयोगासाठी आम्ही (त्वा) आपणास ग्रहण करतो (आम्ही प्रजाजन वरील उद्दिष्ट वा कार्यासाठी आपणास राष्ट्राध्यक्ष निवडीत आहोत वा निवडले आहे) ॥32॥
Essence
भावार्थ - त्यालाच राजा मानावे की जो इन्द्र, अग्नी, यम, सूर्य, वरूण आणि धनाढ्य यांच्या गुणांनी समृद्ध अशा विद्वानांचा प्रिय आहे, जो विद्येचा विस्तार-व उत्कर्ष करणारा आहे आणि सर्वांसाठी सुखकारी आहे. ॥32॥
Subject
जर राज्यव्यवहार सभेच्या अधीन असावेत, तर मग प्रजेने सभापतीला कशासाठी स्वीकार करावे (लोकसभा असल्यास राष्ट्रपतीची काय आवश्यकता आहे?) पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -