Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 29

37 Mantra
6/29
Devata- अग्निर्देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
यम॑ग्ने पृ॒त्सु मर्त्य॒मवा॒ वाजे॑षु॒ यं जु॒नाः। स यन्ता॒ शश्व॑ती॒रिषः॒ स्वाहा॑॥२९॥

यम्। अ॒ग्ने॒। पृत्स्विति॑ पृ॒त्ऽसु। मर्त्य॑म्। अवाः॑। वाजे॑षु। यम्। जु॒नाः। सः। यन्ता॑। शश्व॑तीः। इषः॑। स्वाहा॑ ॥२९॥

Mantra without Swara
यमग्ने पृत्सु मर्त्यमवा वाजेषु यञ्जुनाः । स यन्ता शश्वतीरिषः स्वाहा ॥

यम्। अग्ने। पृत्स्विति पृत्ऽसु। मर्त्यम्। अवाः। वाजेषु। यम्। जुनाः। सः। यन्ता। शश्वतीः। इषः। स्वाहा॥२९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) विवेकशील गुरुदेव, आपण (पृत्सु) संग्रामामधे (यम्) मनुष्याची (अवाः) रक्षा करतो आणि (वाजेषु) अन्न-धान्याच्या उत्पादनासाठी (यम्) ज्या मनुष्याची (जुनाः) नियुक्ती करता, (सः) तो (शश्‍वतीः) निरंतर व सातत्याने (इषः) आपल्या (राष्ट्रातील) प्रजाजनांच्या (यन्ता) जीवननिर्वाहासाठी साहाय्यकारी होतो अर्थात त्यांच्यापर्यंत नियमपूर्वक सर्व पदार्थ पोहचवितो. (गुरूकडून युद्धात वीरत्वाची आणि व्यापारात वैश्य कर्माची ज्या ज्या शिष्याने दीक्षा घेतली आहे, त्या क्षत्रियाने प्रजेचे रक्षण करावे आणि वैश्याने अन्न-धान्य, धन-संपदेची वृद्धी करून समाजाचे पोषण करावे) ॥29॥
Essence
भावार्थ - गुरूजनांकडून प्राप्त शिक्षा-दीक्षा सर्वांसाठी (शिष्यासाठी व नागरिकासाठी) उपकारक ठरत असते. ॥29॥
Subject
आता तो (वैश्य किंवा शिष्य) अध्यापकास काय म्हणतो, पुढील मंत्रात याविषयी वर्णन केले आहे -