Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 28

37 Mantra
6/28
Devata- प्रजा देवताः Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- निचृत् आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
कार्षि॑रसि समु॒द्रस्य॒ त्वा क्षि॑त्या॒ऽउन्न॑यामि। समापो॑ऽअ॒द्भिर॑ग्मत॒ समोष॑धीभि॒रोष॑धीः॥२८॥

कार्षिः॑। अ॒सि॒। स॒मु॒द्रस्य॑। त्वा। अक्षि॑त्यै। उत्। न॒या॒मि॒। सम्। आपः॑। अ॒द्भिरित्य॒त्ऽभिः। अ॒ग्म॒त॒। सम्। ओष॑धीभिः। ओष॑धीः ॥२८॥

Mantra without Swara
कार्षिरसि समुद्रस्य त्वाक्षित्या उन्नयामि । समापो अद्भिरग्मत समोषधीभिरोषधीः ॥

कार्षिः। असि। समुद्रस्य। त्वा। अक्षित्यै। उत्। नयामि। सम्। आपः। अद्भिरित्यत्ऽभिः। अग्मत। सम्। ओषधीभिः। ओषधीः॥२८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे वैश्यजन, तू (कार्षिः) कृषी कर्म करण्यात कुशल वा नांगर धरण्यात निष्णात आहेस मी (त्वा) तुला (समुद्रस्य) अंतरिक्षाचा (अक्षित्यै) शोध घेऊन परिपूर्ण होण्यासाठी (उत् यामि) उत्तमप्रकारे उत्कर्ष वा प्रोत्साहन देत आहे. तुम्ही सर्व कृषकजन (अद्भिः) यज्ञाद्वारे शोधित जलापासून (आपः) जल प्राप्त करा (अशुद्ध वा अस्वच्छ पाणी कृषीसाठी वापरू नका) तसेच (औषधीभिः) औषधीपासून (शोध करीत अधिक उपयोगी) औषधी (सम्) (अग्मत) प्राप्त करा. ॥28॥
Essence
भावार्थ - क्षेत्र म्हणते शेत व पर्वतादी स्थानांमधे अनेक प्रकारच्या औषधी उत्पन्न होतात. त्या औषदींद्वारे अग्निहात्रिादी यज्ञ केल्यास शुद्ध झालेले जल-परमाणू वर अंतरिक्षात थांबतात. तशा जल-परमाणूंनी आकाश भरलेले असते. विद्वज्जन (किंवा यज्ञाचे महत्त्व व गुण ओळखणारे याज्ञिकजन) निर्बुद्ध लोकांना शेती-भाती आदींच्या कामातच गुंतवतात, कारण ते विद्याभ्यास, अध्ययन आदीविषयी पूर्ण अज्ञानी असतात वा विद्याध्ययन करण्यास समर्थ नसतात (विद्वज्जन व याज्ञिक त्यांच्यासाठी, शेतीसाठी यज्ञ करतात) ॥28॥
Subject
आता अध्यापकाने प्रत्येक माणसाला (नागरिक वा शिष्याला) काय उपदेश करावा, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -