Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 25

37 Mantra
6/25
Devata- सोमो देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- आर्षी विराट अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
हृ॒दे त्वा॒ मन॑से त्वा॒ दि॒वे त्वा॒ सूर्या॑य त्वा। ऊ॒र्ध्वमि॒मम॑ध्व॒रं दि॒वि दे॒वेषु॒ होत्रा॑ यच्छ॥२५॥

हृ॒दे। त्वा॒। मन॑से। त्वा॒। दि॒वे। त्वा॒। सूर्य्या॑य। त्वा॒। ऊ॒र्ध्वम्। इ॒मम्। अ॒ध्व॒रम्। दि॒वि। दे॒वेषु॑। होत्राः॑। य॒च्छ॒ ॥२५॥

Mantra without Swara
हृदे त्वा मनसे त्वा दिवे त्वा सूर्याय त्वा । ऊर्ध्वमिममध्वरन्दिवि देवेषु होत्रा यच्छ ॥

हृदे। त्वा। मनसे। त्वा। दिवे। त्वा। सूर्य्याय। त्वा। ऊर्ध्वम्। इमम्। अध्वरम्। दिवि। देवेषु। होत्राः। यच्छ॥२५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (आश्रमस्थ शिष्येला गृहाश्रमाच्या आरंभी वा स्वयंवराच्यावेळी गुरुपत्नी आशिर्वाद देत आहे) हे ब्रह्मचारीणी कन्ये, ज्याप्रमाणे आम्ही सर्व (गुरुपत्नी व गृहिणी स्त्रिया) (देवेषु) सुख देणार्‍या पतीजवळ नांदत आहोत आणि अग्निहोत्र आदी कर्म आचरत आहोत, तशी तूदेखील हो. आम्ही (हृदे) हार्दिक आनन्दाच्या प्राप्ती करिता (त्वा) तुला उपदेश करीत आहोत, (मनसे) चांगले-वाईट यामधे विवेक करण्यासाठी (त्वा) तुला सांगत आहोत, (दिवे) सर्व सुखांच्या प्राप्तीकरीता (त्वा) तुला सांगत आहोत आणि (सूर्य्याय) सूर्याचे गुण (प्रकाश, प्रेरणा, जीवनशक्ती) धारण करण्यासाठी (त्वा) तुला उपदेश करीत आहोत, त्याप्रमाणे तूदेखील (दिवि) समस्त सुखांच्या प्राप्तीकरीता या (अध्वरम्) निरंतर सुखदायक अशा गृहस्थाश्रम रूप यज्ञाची (उर्द्ध्वम्) उन्नती (यच्छ) करीत जा (आदर्श गृहस्थी स्त्री म्हणून यश मिळवू) ॥15॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे पतीची सेवा करीत त्याच्याजवळ राहणारी पतिव्रता गुरुपत्नी अग्निहोत्रादी गृहकर्म करण्यात दृढनिश्‍चयी असते, त्याप्रमाणे ब्रह्मचारिणी कन्या व ब्रह्मचारी युवकांनी देखील वागले पाहिजे. ॥25॥
Subject
आणखी कोणता उपदेश करावा, ते पुढील मंत्रात सांगितले आहे -