Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 24

37 Mantra
6/24
Devata- लिङ्गोक्ता देवताः Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप्,त्रिपाद गायत्री, Swara- धैवतः, षड्जः
Mantra with Swara
अ॒ग्नेर्वोऽप॑न्नगृहस्य॒ सद॑सि सादयामीन्द्रा॒ग्न्योर्भा॑ग॒धेयी॑ स्थ मि॒त्रावरु॑णयोर्भाग॒धेयी॑ स्थ॒ विश्वे॑षां दे॒वानां॑ भाग॒धेयी॑ स्थ। अ॒मूर्याऽउप॒ सूर्ये॒ याभि॒॑र्वा॒ सूर्यः॑ स॒ह। ता नो॑ हिन्वन्त्वध्व॒रम्॥२४॥

अ॒ग्नेः। वः। अप॑न्नगृह॒स्येत्यप॑न्नऽगृहस्य। सद॑सि। सा॒द॒या॒मि॒। इ॒न्द्रा॒ग्न्योः। भा॒ग॒धेयी॒रिति॑ भाग॒ऽधेयीः॑। स्थ॒। मि॒त्रावरु॑णयोः। भा॒ग॒धेयी॒रिति॑ भाग॒ऽधेयीः॑। विश्वे॑षाम्। दे॒वाना॑म्। भा॒ग॒धेयी॒रिति॑ भाग॒ऽधेयीः॑। स्थ॒। अ॒मूः। याः। उप॑। सूर्य्ये॑। याभिः॑। वा॒। सूर्य्यः॑। स॒ह। ताः। नः। हि॒न्व॒न्तु॒। अ॒ध्व॒रम् ॥२४॥

Mantra without Swara
अग्नेर्वापन्नगृहस्य सदसि सादयामीइन्द्राग्न्योर्भागधेयी स्थ मित्रावरुण्योर्भागधेयी स्थ विश्वेषान्देवानाम्भागधेयी स्थ । अमूर्याऽउप सूर्ये याभिर्वा सूर्यः सह । ता नो हिन्वन्त्वध्वरम् ॥

अग्नेः। वः। अपन्नगृहस्येत्यपन्नऽगृहस्य। सदसि। सादयामि। इन्द्राग्न्योः। भागधेयीरिति भागऽधेयीः। स्थ। मित्रावरुणयोः। भागधेयीरिति भागऽधेयीः। विश्वेषाम्। देवानाम्। भागधेयीरिति भागऽधेयीः। स्थ। अमूः। याः। उप। सूर्य्ये। याभिः। वा। सूर्य्यः। सह। ताः। नः। हिन्वन्तु। अध्वरम्॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (गुरुपत्नी शिष्यागणांना म्हणत आहे) हे ब्रह्मचारिणी कन्यांनो, (अमूः) त्या (याः) ज्या अशा स्त्रिया आहेत की ज्यांनी स्वयंवरविवाह-पद्धतीने आपले पती निवडले आहेत, तसेच ज्या स्त्रिया (इन्द्राग्न्योः) सूर्याच्या आणि विद्युतेच्या गुणांना (भागधेयीः) वेगवेगळे करून जाणणार्‍या (स्थ) आहेत, (विवेषाम्) विदुषी असून पृथ्वी आदी पदार्थांचा उपभोग घेणार्‍या (स्थ आहेत, त्या तशा विदुषी स्त्रियांचा सभेत (वः) तुम्हा ब्रह्मचारिणी कन्यांना (अपन्नगृहस्य) मी तुमची आचार्य वा गुरुपत्नी अविवाहित व धर्मानुष्ठान करणार्‍या (अग्ने) ब्रह्मचारी युवकांच्या (सदसि) सभेत (सादयामि) स्थापित करते (स्वयंवराकरिता नेत आहे) (वा) अथवा (याभिः) ज्या स्त्रिया (सह) माझ्याप्रमाणे (सूर्यः) सूर्यलोकाच्या गुणांना जाणण्यात अतिकुशल आहेत, (त्वः) त्या अनुभवी विवाहिता गृहिणी स्त्रिया (नः) आमच्या (अध्वरम्) गृहकार्याविषयी (हिन्वनतु सहाय्य करणार्‍या असाव्यात. (तुमचे व माझे मार्गदर्शन करणार्‍या असाव्यात) ॥24॥
Essence
भावार्थ - ब्रह्मचर्य-धर्माचे पालन केलेल्या युवती कन्या, अविवाहित, ब्रह्मचारी आणि गुण, कर्म व स्वभावाने आपल्या अनुरूप अशा पुरुषाशी विवाह करण्यास पात्र असतात. गुरुजनांच्या पत्नींनी त्या कन्यांना असाच उपदेश करावा. यामुळे त्या कन्या आपल्याशी समान गुण कर्म स्वभाव असलेल्या पुरुषाशी विवाह करून सदा सुखी राहतील. (या मंत्रातील दुसरा भावार्थ असा की) ज्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले असेल अथवा ज्या पतीची पत्नी मेली असेल (आणि त्या स्त्रीस वा त्या पुरुषास) संतानप्राप्तीची कामना असेल, तर त्यांनी नियोग करावा, पण व्यभिचारादी कुकर्म कदापी करूं नये. ॥24॥
Subject
ब्रह्मचर्य धारणासाठी गुरुपत्नीने आपल्या कन्यांना कसा व कोणकोणता उपदेश करावा, पुढील मंत्रात याविषयी सांगितले आहे -