Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 23

37 Mantra
6/23
Devata- अब्यज्ञसूर्या देवताः Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- निचृत् आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
ह॒विष्म॑तीरि॒माऽआपो॑ ह॒विष्माँ॒२ऽआवि॑वासति। ह॒विष्मा॑न् दे॒वोऽअ॑ध्व॒रो ह॒विष्माँ॑२ऽअस्तु॒ सूर्यः॑॥२३॥

ह॒विष्म॑तीः। इ॒माः। आपः॑। ह॒विष्मा॑न्। आ। वि॒वा॒स॒ति॒। ह॒विष्मा॑न्। दे॒वः। अ॒ध्व॒रः। ह॒विष्मा॑न्। अ॒स्तु॒। सूर्यः॑ ॥२३॥

Mantra without Swara
हविष्मतीरिमा आपो हविष्माँ आ विवासति । हविष्मान्देवो अध्वरो हविष्माँ अस्तु सूर्यः ॥

हविष्मतीः। इमाः। आपः। हविष्मान्। आ। विवासति। हविष्मान्। देवः। अध्वरः। हविष्मान्। अस्तु। सूर्यः॥२३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वज्जनहो, तुम्ही ते ते कर्म करा की ज्यामुळे (इमा:) हे जल (हविषमती:) चांगले आदान-प्रदान क्रियेमुळे शुद्ध आणि सुखकारक होईल (तुम्ही यज्ञाद्वारे अशुद्ध जलावर क्रिया करून सर्वाना स्वच्छ वृष्टिजल द्या) त्यामुळे ते शुद्धजल जगावर नाना उपकार करणारे होईल. (हविष्मान्) यज्ञामुळे पवन देखील उपकारक होईल (आ) पवन उत्तम प्रकारे अनुपकारक दोषांना (विवासति) दूर करील. (देवः) सुखप्रदाता (अध्वरः) यज्ञदेखील (हविष्मान्) परमानन्ददायी होईल (सूर्य्यः) सूर्यलोकदेखील (हविष्मान्) सुगन्धीमय होऊन सुखकर्ता होईल. ॥23॥
Essence
भावार्थ - या मंत्रामधे वाचकलुप्तोपमालंकार आहे. ज्या वायू आणि जलाच्या साहाय्याने अनेक प्रकारच्या सुख सोयी मिळविल्या जातात आणि जय वायू व जलाद्वारे आपल्या उत्तम पदार्थांच्या (विक्री वा निर्मितीसाठी) देश-देशांतरापर्यंत नेता येणे शक्य आहे, त्या वायू, जल, अग्नी आदी पदार्थांपासून घेण्याचे कार्य केवळ कुशल मनुष्यच करू शकतो, तसा कुशल मनुष्य नानाविध करागीरी, कलाकौशल्यादींना जाणणारा आणि त्याची क्रिया करणारा आणि यज्ञाद्वारे वृष्टी करविणारा असतो. ॥23॥
Subject
यानंतर राजा आणि प्रजा यांनी कोणत्या पदार्थांनी काय काय कर्मे पूर्ण करावीत, याविषयी पुढील मंत्रात वर्णन केले आहे-