Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 19

37 Mantra
6/19
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- ब्राह्मी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
घृ॒तं घृ॒॑तपावानः पिबत॒ वसां॑ वसापावानः पिबता॒न्तरि॑क्षस्य ह॒विर॑सि॒ स्वाहा॑। दिशः॑ प्र॒दिश॑ऽआ॒दिशो॑ वि॒दिश॑ऽउ॒द्दिशो॑ दि॒ग्भ्यः स्वाहा॑॥१९॥

घृ॒तम्। घृ॒त॒पा॒वा॒न॒ इति॑ घृतऽपावानः। पि॒ब॒त॒। वसा॑म्। व॒सा॒पा॒वा॒न॒ इति॑ वसाऽपावानः। पि॒ब॒त॒। अ॒न्तरि॑क्षस्य। ह॒विः। अ॒सि॒। स्वाहा॑। दिशः॑। प्र॒दिश॒ इति॑ प्र॒ऽदिशः॑। आ॒दिश॒ इत्या॒ऽदिशः॑। वि॒दिश॒ इति॑ वि॒ऽदिशः॑। उ॒द्दिश॒इत्यु॒त्ऽ दिशः॑। दि॒ग्भ्य इति॑ दिक्ऽभ्यः। स्वाहा॑ ॥१९॥

Mantra without Swara
घृतङ्घृतपावानः पिबत वसाँ वसापावानः पिबतान्तरिक्षस्य हविरसि स्वाहा । दिशः प्रदिशऽआदिशो विदिशऽउद्दिशो दिग्भ्यः स्वाहा ॥

घृतम्। घृतपावान इति घृतऽपावानः। पिबत। वसाम्। वसापावान इति वसाऽपावानः। पिबत। अन्तरिक्षस्य। हविः। असि। स्वाहा। दिशः। प्रदिश इति प्रऽदिशः। आदिश इत्याऽदिशः। विदिश इति विऽदिशः। उद्दिशइत्युत्ऽ दिशः। दिग्भ्य इति दिक्ऽभ्यः। स्वाहा॥१९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (घृतपावानः) (शुद्ध जलम्, व आरोग्यदायी) जलाचे सेवन करणार्‍या वीरजनहो, (घृत=उदंक जलम् निघण्टु-1/12) तुम्ही (गृतम्) अमृतसम हे जल (पितब्ब) प्या. हे (वसापावानः) रणनीतीचे पालन कररार्‍या वीरांनो, तुम्ही (वसाम्) उच्चाराने वीररसाचे वचन व घोष करा की जो घोष शत्रूंना स्तब्ध करणारा आहे त्या वीररसाचे तुम्ही (पिबत) पान वा सेवन करा. हे सेनाध्यक्ष, तुम्ही चक्रव्यूह आदी सैनिक रचून आपल्या सैनिकांना अशा ठिकाणी नियुक्त करा की (अन्तरिक्षस्य) आकाशातील शत्रुगतीला (हवि) अडथळा होईल अथवा तुम्ही युद्धात शत्रूंना सर्व दिशांनी घेरणारे (असि) व्हा. आपल्या (स्वाहा) शोभित वाणीद्वारे (आदेशाद्वारे) (दिशः) पूर्व, परिचय, उत्तर, दक्षिण दिशा (प्रनिशः) आग्नेयी, नैऋति, वायवी आणि ऐशानी या चार उपदिशा (आदिशः) पुढची दिशा (विदिशा) मागची दिशा आणि (उद्विशः) वरची दिशा वा ज्या दिशेकडे शत्रू दिसेल, त्या सर्व (दिग्भ्यः) दिंशामधे आपल्या सैनिकांनी आवश्यक संख्येत आणि योग्य व्यवस्थेत ठेवा. (सैनिकी रचना करा) आणि शत्रूवर विजय मिळवा. ॥19॥
Essence
भावार्थ - सेनाध्यक्षासाठी आवश्यक रणनीती अशी की त्यांनी आपापल्या सेनेतील (वा तुकडीतील) सैनिकांची पुष्ट, स्वस्थ व उत्साही ठेवावे. तसेच प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी चक्रव्यूह, श्येनव्यूह, आणि शकटव्यूहाची रचना करून, चतुर चाली रचून आपले सैन्य या व त्या भागात नेमावे आणि अशाप्रकारे शत्रूंना सर्व दिशांनी घेरुन विजय संपादित करावा. विजयानंतर न्यायमार्गाने प्रजेचे रक्षण व पालन करावे. ॥19॥
Subject
युद्धामधे काय काय करावे, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -