Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 16

37 Mantra
6/16
Devata- द्यावापृथिव्यौ देवते Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- निचृत् आर्षी त्रिष्टुप्,ब्राह्मी उष्णिक्, Swara- ऋषभः
Mantra with Swara
रक्ष॑सां भागोऽसि॒ निर॑स्त॒ꣳ रक्ष॑ऽइ॒दम॒हꣳ रक्षो॒ऽभिति॑ष्ठामी॒दम॒हꣳ रक्षोऽव॑बाधऽइ॒दम॒हꣳ रक्षो॑ऽध॒मं तमो॑ नयामि। घृ॒तेन॑ द्यावापृथिवी॒ प्रोर्णु॑वाथां॒ वायो॒ वे स्तो॒काना॑म॒ग्निराज्य॑स्य वेतु॒ स्वाहा॒ स्वाहा॑कृतेऽऊ॒र्ध्वन॑भसं मारु॒तं ग॑च्छतम्॥१६॥

रक्षसा॒म्। भा॑गः॒। अ॒सि॒। निर॑स्त॒मिति॒ निःऽअ॑स्तम्। रक्षः॑ इ॒दम्। अ॒हम्। रक्षः॑। अ॒भि। ति॒ष्ठा॒मि॒। इ॒दम्। अ॒हम्। रक्षः॑। अव॑बा॒धे॒। इ॒दम्। अ॒हम्। रक्षः॑। अ॒ध॒मम्। तमः॑। न॒या॒मि॒। घृ॒तेन॑। द्या॒वा॒पृ॒थि॒वी॒ इति॑ द्यावापृथिवी। प्र। ऊ॒र्णु॒वा॒था॒म्। वायो॒ऽइति॒ वायो॑। वेः। स्तो॒काना॑म्। अ॒ग्निः। आज्य॑स्य। वे॒तु॒। स्वाहा॑। स्वाहा॑कृत॒ऽइति॒ स्वाहा॑ऽकृते। ऊ॒र्ध्वन॑भस॒मित्यू॒र्ध्वन॑भसम्। मा॒रु॒तम्। ग॒च्छ॒त॒म् ॥१६॥

Mantra without Swara
रक्षसाम्भागो सि निरस्तँ रक्षः इदमहँ रक्षो भि तिष्ठामीदमहँ रक्षो व बाधऽइदमहँ रक्षो धमन्तमो नयामि । घृतेन द्यावापृथिवी प्रोर्णुवाथाँ वायो वे स्तोकानामग्निराज्यस्य वेतु स्वाहा स्वाहाकृते ऊर्ध्वनभसम्मारुतङ्गच्छतम् ॥

रक्षसाम्। भागः। असि। निरस्तमिति निःऽअस्तम्। रक्षः इदम्। अहम्। रक्षः। अभि। तिष्ठामि। इदम्। अहम्। रक्षः। अवबाधे। इदम्। अहम्। रक्षः। अधमम्। तमः। नयामि। घृतेन। द्यावापृथिवी इति द्यावापृथिवी। प्र। ऊर्णुवाथाम्। वायोऽइति वायो। वेः। स्तोकानाम्। अग्निः। आज्यस्य। वेतु। स्वाहा। स्वाहाकृतऽइति स्वाहाऽकृते। ऊर्ध्वनभसमित्यूर्ध्वनभसम्। मारुतम्। गच्छतम्॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रारंभी मंत्राच्या अर्ध्या भागात शिष्य व आचार्य यांच्या अध्यापन-अध्ययन कार्यात विघ्नकारी स्वार्थी स्वार्थी जनांचा निषेध आणि निंदा केली आहे) आचार्य म्हणतात-अरे दुष्कर्मा माणसा, तू (रक्षसाम्) दुष्टांचा म्हणजे पराथाचा नाश करून स्वार्थ साधणार्‍या माणसांचा (भागः) भाग म्हणजे साथी (असि) आहेस. यामुळे (रक्षः) अरे राक्षस-स्वभाव असलेल्या माणसा, तू (निरस्तम्) निघून जा, माझ्या मार्गावरून बाजूला हो. मी (इदम्) अशा (रक्षः) तुझ्यासारख्या स्वार्थ साधक दुर्जनाला (अभितिष्ठामि) तिरस्कृत करतो, त्यासाठी तुझ्यासमोर बाधा म्हणून उभा ठाकतो. केवळ उभाच नव्हे, तर (अहम्) मी (इदम्) अशा (रक्षः) दुष्टाचा (अवबाधे) वाटेत आडवा येऊन तिरस्कार करून त्यास ताडन करतो की ज्यामुळे त्याने पुन्हा माझ्या (व शिष्याच्या) वाटेत येऊ नये. (अहम्) मी (इदम्) तुझ्यासारख्या (रक्ष।) दुर्जनाला (अधमम्) दुःसंह दुःखापर्यंत (नयामि) नेतो (तुझी ताडना करून अत्यंत पीडित व दुःखी करतो) आता यापुढे आचार्य श्रेष्ठ गुणग्राही शिष्यासाठी उपदेश करीत आहेत-हे (वायो) तू गुणग्राहक आहेस आणि सत-असत व्यवहाराविषयी विवेक करणारा आहेस. तुझ्या (स्तोकानाम्) लहान-सहान व्यवहारांचे (वाः) ज्ञना प्राप्त कर (काय करणे काय न करणे, याचा विचार करून आचरण कर) तू करीत असलेल्या यज्ञाने जे शुद्ध झाले आहे, त्या जलाचे (द्यावापृथिवी) सूर्य आणि भूमी (प्रोर्णुवाथाम्) चांगल्याप्रकारे भरून राहोत. (अग्निः) तू घृत आदी पदार्थांद्वारे जो यज्ञ करीत आहेस, त्या उत्तम यज्ञास समस्त विद्यावान विद्वज्जन (वेतु) जाणोत (तू करीत असलेल्या श्रेष्ठ यज्ञाची कीर्ती विद्वानांपर्यंत जावी) (स्वाहा) (त्यानी तुझ्याविषयी सुवचन म्हणावेत) (स्वाहाकृते) तु हवनात प्रयुक्त केलेले घृत आदी सिग्धद्रव्य पूर्वोक्त सूर्य आणि भूमी (ऊर्ध्वनभसम्) यांना प्राप्त व्हावेत आणि तुझ्या यज्ञामुळे शुद्ध झालेले जल वर नेणार्‍या (मारुतम्) पवनाशी (गच्छतम्) मिळोत. (पवनामुळे आकाशातून पाऊस पडो) ॥16॥
Essence
भावार्थ - श्रेष्ठ व अनिष्ट यांचा विवेक बाळगणारे बुद्धिमान विद्वान जन आपल्या शिष्यांना यथोचित शिक्षण व संस्कार देतात. यज्ञामुळे जल आणि वायूची शुद्धी होते आणि त्या शुद्धीमुळे वृष्टी होऊन सर्व प्राण्यांसाठी सुखाची उत्पत्ती होते. ॥16॥
Subject
आता शिष्यवर्गापैकी एका शिष्याला संबोधून आचार्यांनी उपदेश केला आहे -