Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 13

37 Mantra
6/13
Devata- आपो देवताः Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- निचृत् आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
देवी॑रापः शु॒द्धा वो॑ढ्व॒ꣳ सुप॑रिविष्टा दे॒वषु॒ सुप॑रिविष्टा व॒यं प॑रि॒वे॒ष्टारो॑ भूयास्म॥१३॥

देवीः॑। आ॒पः॒। शु॒द्धाः। वो॒ढ्व॒म्। सुप॑रिविष्टा॒ इति॑ सुऽप॑रिविष्टाः॒। दे॒वेषु॑। सुप॑रिविष्टा॒ इति॒ सुऽप॑रिविष्टाः॒। व॒यम्। प॒रि॒वे॒ष्टार॒ इति॑ परिऽवे॒ष्टारः॑। भू॒या॒स्म॒ ॥१३॥

Mantra without Swara
देवीरापः शुद्धा वोढ्वँ सुपरिविष्टा देवेषु सुपरिविष्टा वयम्परिवेष्टारो भूयास्म ॥

देवीः। आपः। शुद्धाः। वोढ्वम्। सुपरिविष्टा इति सुऽपरिविष्टाः। देवेषु। सुपरिविष्टा इति सुऽपरिविष्टाः। वयम्। परिवेष्टार इति परिऽवेष्टारः। भूयास्म॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे कुमारिकांनो, (आपः) श्रेष्ठ गुणांत रमण करणार्‍या गुणवती आणि (शुद्धाः) सत्कर्मांचे आचरण करणार्‍या म्हणून पवित्र तसेच (देवीः) विद्येमुळे प्रकाशवती अशा विदुषी स्त्रिया (देवेषु) दिव्यगुणमुक्त श्रेष्ठ पती मिळण्याकरिता (सुपरिविष्टाः) व त्यांची सेवा करण्याकरिता (गुण, कर्म, स्वभावादीनी) आपल्या सारखे असलेले पती (वोढ्वम्) प्राप्त करतात तसेच ते विद्वान दिव्यगुणयुक्त पती देखील आपल्या सारख्या स्त्रीला पत्नी म्हणून निवडतात, त्याप्रमाणे तुम्ही देखील व्हा. (गुण, कर्म, स्वभावाने आपल्यासदृश असलेला पती निवडा) आम्ही देखील (परिवेष्टा) तशा सेवा कर्माच्या पात्रतेपर्यंत (भूयास्म) पोहचण्याचे यत्न करावेत. (सेवाभावी, विद्वान आणि गुणवान होण्यास सिद्ध व्हावे) ॥13॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे एक विदुषी अर्थात विद्वानाची पत्नी सदैव पातिव्रत्यधर्मासाठी तत्पर असते, त्याप्रमाणे ब्रह्मचारिणी कन्या देखील त्या विदुषी स्त्रियांसारख्या समान गुण, कर्म आणि स्वभाव असणार्‍या व्हाव्यात. तसेच ब्रह्मचारी कुमारांनीदेखील गुरुजनांकडून विद्या-शिक्षा ग्रहण करून स्त्री आणि पुरुषांची रक्षा करण्याच्या कामी सदा तत्पर असावयास हवे. ॥13॥
Subject
आता ब्रह्मचारी बालक आणि ब्रह्मचारिणी कन्या यांनी गुरुपत्नीचा कशाप्रकारे मान-सन्मान करावा, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -