Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 12

37 Mantra
6/12
Devata- विद्वांसो देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- भूरिक् प्राजापत्या अनुष्टुप्,साम्नी उष्णिक्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
माहि॑र्भू॒र्मा पृदा॑कु॒र्नम॑स्तऽआतानान॒र्वा प्रेहि॑। घृ॒तस्य॑ कु॒ल्याऽउप॑ऽऋ॒तस्य॒ पथ्या॒ऽअनु॑॥१२॥

मा। अहिः॑। भूः॒। मा। पृदा॑कुः। नमः॑। ते॒। आ॒ता॒नेतेत्या॑ऽतान। अ॒न॒र्वा। प्र। इ॒हि॒। घृ॒तस्य॑। कु॒ल्याः। उप॑। ऋ॒तस्य॑। पथ्याः॑। अनु॑ ॥१२॥

Mantra without Swara
माहिर्भूर्मा पृदाकुर्नमस्तऽआतानानर्वा प्रेहि । घृतस्य कुल्याऽउप ऋतस्य पथ्याऽअनु ॥

मा। अहिः। भूः। मा। पृदाकुः। नमः। ते। आतानेतेत्याऽतान। अनर्वा। प्र। इहि। घृतस्य। कुल्याः। उप। ऋतस्य। पथ्याः। अनु॥१२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (आतान) उत्तम प्रकारे सुखाचा विस्तार करणारे विद्वान् (प्रभूत सुख अनुभवीत असलेल्या हे विद्वान महोदय), आपण कधीही (अहिः) सापाप्रमाणे कुटिलगामी आणि (पृदाकुः) मूर्खाप्रमाणे अहंकारी अथवा व्याघ्राप्रमाणे हिंसक (मा) (मा) (भूः) होऊ नका. (आपल्या मनात कुटिलता, कष्ट, अहंकार अथवा हिंसा आदी दुष्टभाव कधीही उत्पन्न होऊ नये वा आपण होऊ देऊ नका) (ते) (नमः) आपल्या सुख-आनन्दासाठी आधीच सर्वत्र अन्न आदी पदार्थांची उचित व्यवस्था आहे (म्हणून आपण कुटिल वा कपटी होण्याचे कारण नाही) (अनर्वा) ज्याच्याजवळ घोडा आदी कोणतेही वाहन नाही असा निराधार पुरुष (प्रवासी) ज्याप्रमाणे (घृतस्य) पाण्याच्या (कुल्याः) धारा वा कालव्यांना पाहून आनंदित होतो, त्याप्रमाणे आपण (ऋतस्य) सत्य व सत्याचरणाच्या (पथ्याः) मार्गाकडे सतत चालत जा व आनंदी राहा. ॥12॥
Essence
भावार्थ – धर्ममार्गावलंबी कोणाही मनुष्याने धर्ममार्गावर चालत असतांना कुटिल होऊ नये. याउलट सदैव सरळमार्गी असावे. ॥12॥
Subject
तो विद्वान (याज्ञिक) कसा असावा, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -