Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 11

37 Mantra
6/11
Devata- वातो देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- स्वराट् प्राजापत्या बृहती,भूरिक् आर्षी उष्णिक्,निचृत् गायत्री, Swara- ऋषभः
Mantra with Swara
घृ॒तेना॒क्तौ प॒शूँस्त्रा॑येथा॒ रेव॑ति॒ यज॑माने प्रि॒यं धाऽआवि॑श। उ॒रोर॒न्तरि॑क्षात् स॒जूर्दे॒वेन॒ वाते॑ना॒स्य ह॒विष॒स्त्मना॑ यज॒ सम॑स्य त॒न्वा भव। वर्षो॒ वर्षी॑यसि य॒ज्ञे य॒ज्ञप॑तिं धाः॒ स्वाहा॑ दे॒वेभ्यो॑ दे॒वेभ्यः॒ स्वाहा॑॥११॥

घृ॒तेन॑। अ॒क्तौ। प॒शून्। त्रा॒ये॒था॒म्। रेव॑ति। यज॑माने। प्रि॒यम्। धाः॒। आ। वि॒श॒। उ॒रोः। अ॒न्तरि॑क्षात्। स॒जूरिति॑ स॒ऽजूः। दे॒वेन॑। वाते॑न। अ॒स्य। ह॒विषः॑। त्मना॑। य॒ज॒। सम्। अ॒स्य॒। त॒न्वा᳖। भ॒व॒। वर्षो॒ऽइति॒ वर्षो॒। वर्षीय॑सि। य॒ज्ञे। य॒ज्ञप॑ति॒मिति॑ य॒ज्ञऽप॑तिम्। धाः॒। स्वाहा॑। दे॒वेभ्यः॑। दे॒वेभ्यः॑। स्वाहा॑ ॥११॥

Mantra without Swara
घृतेनाक्तौ पशूँस्त्रायेथाँ रेवति यजमाने प्रियन्धाऽआविश । उरोरन्तरिक्षात्सजूर्देवेन वातेनास्य हविषस्त्मना यज समस्य तन्वा भव । वर्षा वर्षीयसि यज्ञे यज्ञप्तिन्धाः स्वाहा देवेभ्यो देवेभ्यः स्वाहा ॥

घृतेन। अक्तौ। पशून्। त्रायेथाम्। रेवति। यजमाने। प्रियम्। धाः। आ। विश। उरोः। अन्तरिक्षात्। सजूरिति सऽजूः। देवेन। वातेन। अस्य। हविषः। त्मना। यज। सम्। अस्य। तन्वा। भव। वर्षोऽइति वर्षो। वर्षीयसि। यज्ञे। यज्ञपतिमिति यज्ञऽपतिम्। धाः। स्वाहा। देवेभ्यः। देवेभ्यः। स्वाहा॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (घृतेन, अक्तौ) घृताला प्रिय मानणारे, घृताची कामना करणारे याज्ञिकजनहो, तुम्ही (पशून्) गौ आदी पशूंचे (त्रायेथाम्) पालन करा (त्यायोगे तुम्हांस यज्ञाकरिता शुद्ध तूप मिळत राहील) तुम्ही एक एक करून सर्व जण (देवेन) सर्वत्र व्याप्त (वातेन) पवनाशी (सजूः) ज्याप्रमाणे सर्वजण समान प्रीती करतात वा त्यास चाहतात, तसेच (उरोः) विस्तृत (अन्तरिक्षात्) अंतरिक्षातून प्राप्त होणार्‍या (प्रियम्) (वायू, वृष्टी, जल, प्रकाश आदी) प्रिय सुखकारक पदार्थांनी या (रेवति) ऐश्‍वर्यवान (यजमाने) यज्ञ करणार्‍या धनवान व्यक्तीला (धाः) धारण करा (अधिक समृद्ध करा वा कार्यात यशस्वी होण्यास साहाय्य करा) आणि यजमानाची (आविश) इच्छा जाणून घ्या. (त्याप्रमाणे साहाय्य करा) आणि यजमानाची (आविश) इच्छा जाणून घ्या. (त्याप्रमाणे विधी करा) (अस्य) या यजमानाने (हविषः) होमाकरिता आणलेल्या पदार्थांद्वारे (त्मना) स्वतःची निष्पादित वस्तूप्रमाणे होम करा. (योग्य तेवढेच वापरा आणि आपलेच कार्य समजून आत्मीय भावनेने यज्ञ करा) म्हणजे यज्ञाच्या कोणतीही क्रिया वा विधी विपरीत वा अशुद्ध रीतीने करूं नका. तसेच (अस्य) या यजमानाच्या (तन्वा) शरीराशी (सम्) (भव) एकीभाव ठेवा, म्हणजे त्याचा विरोध करून त्याच्या इच्छेच्या विरूद्ध द्विधा आचरण करूं नका. हे यज्ञकर्माद्वारे सर्वांना सुख देणार्‍या याज्ञिकांनो, (देवेभ्यः) (स्वाहा) (देवेभ्यः) (स्वाहा) सत्कर्माच्या अनुष्ठानाने प्रभावित होऊन जे धर्मप्रिय मानी जन यज्ञ पाहण्याच्या इच्छेने वारंवार यज्ञस्थलाकडे येतात, त्या विद्वानांचा आदर व स्नेहयुक्त वाणीने स्वागत करून त्यांचा यथोचित सत्कार करा. तसेच यज्ञपती यजमानाची (वर्षीयसि) सर्व सुखांची वृष्टी करणार्‍या यज्ञाकडे (धाः) प्रवृत्ती अशीच वाढू द्या. ॥11॥
Essence
भावार्थ - यज्ञाकरिता घृत आदी पदार्थांची आवश्यकता असते, त्यामुळे यम करणार्‍यांनी गौ आदी पशूं पाळावेत आणि घृत आदी उत्तमोत्तम पदार्थांद्वारे अग्निहोत्र करावा. उत्तम यज्ञाने जलाची आणि वायूची शुद्धता करावी. या रीतीने सर्व जीवांसाठी सुखाची व्यवस्था केली पाहिजे ॥11॥
Subject
आता यज्ञ करणारे व करविणारे यांच्या कर्त्तव्य-कर्माविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -