Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 10

37 Mantra
6/10
Devata- आपो देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- प्राजापत्या बृहती,भूरिक् आर्षी गायत्री Swara- मध्यमः
Mantra with Swara
अ॒पां पे॒रुर॒स्यापो॑ दे॒वीः स्व॑दन्तु स्वा॒त्तं चि॒त्सद्दे॑वह॒विः। सं ते॑ प्रा॒णो वाते॑न गच्छता॒ꣳ समङ्गा॑नि॒ यज॑त्रैः॒ सं य॒ज्ञप॑तिरा॒शिषा॑॥१०॥

अ॒पाम्। पे॒रुः। अ॒सि॒। आपः॑। दे॒वीः। स्व॒द॒न्तु॒। स्वा॒त्तम्। चि॒त्। सत्। दे॒व॒ह॒विरिति॑ देवऽह॒विः। सम्। ते॒। प्रा॒णः। वाते॑न। ग॒च्छ॒ता॒म्। अङ्गा॑नि। यज॑त्रैः। यज्ञप॑तिरिति॑ य॒ज्ञऽपतिः। आ॒शिषेत्या॒ऽशिषा॑ ॥१०॥

Mantra without Swara
अपाम्पेरुरस्यापो देवीः स्वदन्तु स्वात्तञ्चित्सद्देवहविः । सन्ते प्राणो वातेन गच्छताँ समङ्गानि यजत्रैः सँयज्ञपतिराशिषा ॥

अपाम्। पेरुः। असि। आपः। देवीः। स्वदन्तु। स्वात्तम्। चित्। सत्। देवहविरिति देवऽहविः। सम्। ते। प्राणः। वातेन। गच्छताम्। अङ्गानि। यजत्रैः। यज्ञपतिरिति यज्ञऽपतिः। आशिषेत्याऽशिषा॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे शिष्या, तू (अपाम्) जल आदी पदार्थांचा (पेरु) रक्षक (असि) आहेस. संसारातील प्राण्यांनी तू करीत असलेल्या यज्ञाद्वारे शुद्ध झालेल्या आणि (देवीः) यज्ञामुळे दिव्य सुख देणाऱ्या (आपः) पाण्याचा उपभोग घ्यावा. (चित्) आणि (स्वात्तम्) धर्मयुक्त व्यवहारामुळे प्राप्त झालेल्या पदार्थांचे (देवहविः) विद्वानांसाठी भोग्य असलेल्या पदार्थाप्रमाणे शुद्ध अशा पदार्थांचा (संस्वदन्तु) चांगल्या प्रकारे सर्व जीवांनी (संस्वदन्तु) चांगल्या प्रकारे आस्वाद घ्यावा. (आशिषा) माझ्या आशीर्वादाने (ते) तुझे (अंगानि) डोके आदी अवयव (यजत्रैः) यज्ञ करणार्‍या याज्ञिकांशी (सम्) सम्यकप्रकारे सहयुक्त व्हावेत (तू शरीर व मनाने याज्ञिकांशी एकरूप हो) (प्राणः) तुझ्या शरीरातील प्राणवायू (वातेन) पवित्र व शुद्ध वायूसह (संगच्छताम्) उत्तम प्रकारे रमण म्हणजे (श्‍वासोच्छ्वास) करोत आणि अशाप्रकारे तू (यज्ञपतिः) विद्येचा प्रचार-प्रसाररूप यज्ञाचे पालन करणारा हो ॥10॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. यज्ञामधे ज्या आहुत्या दिल्या जातात, त्या सूर्यासह वर्तमान राहतात म्हणजे पृथ्वीवरील सर्व पदार्थ सूर्याच्या आकर्षणशक्तीने परमाणू रूप होऊन वर आकाशात असतात. पृथ्वीचे पाणी वर ओढले जाऊन वृष्टी होते. त्या वृष्टीने अन्न आणि अन्नामुळे सर्व प्राणी सुखी होतात. या कार्यपरंपरेमुळे यज्ञाद्वारे शोधित जलाचा आणि हवन केलेल्या द्रव्यांचा सर्व प्राणी भोग घेत असतात. ॥10॥
Subject
आता यज्ञोपवीत धारण केल्यानंतर शिष्यासाठी आवश्यक आहे की त्याने विद्या, उत्तम ज्ञान. आणि अग्निहोत्रादि कर्मांचे अनुष्ठान करावे. गुरूने त्यास या अर्थाचा उपदेश करावा, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे -