Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 6 / Mantra 1

37 Mantra
6/1
Devata- सविता देवता Rishi- आगस्त्य ऋषिः Chhand- निचृत् पङ्क्ति,आसुरी उष्णिक्,भूरिक् आर्षी उष्णिक्, Swara- धैवतः, ऋषभः
Mantra with Swara
दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम्। आद॑दे॒ नार्य॑सी॒दम॒हꣳ रक्ष॑सां ग्रीवाऽअपि॑कृन्तामि। यवो॑ऽसि य॒वया॒स्मद् द्वेषो॑ य॒वयारा॑तीर्दि॒वे त्वा॒ऽन्तरि॑क्षाय त्वा पृथि॒व्यै त्वा॒ शुन्ध॑न्ताँल्लो॒काः पि॑तृ॒षद॑नाः पितृ॒षद॑नमसि॥१॥

दे॒वस्य॑। त्वा॒। स॒वि॒तुः। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। अ॒श्विनोः॑। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुऽभ्याम्। पू॒ष्णः। हस्ता॑भ्याम्। आ। द॒दे॒। नारि॑। अ॒सि॒। इदम्। अ॒हम्। रक्ष॑साम्। ग्री॒वाः। अपि॑। कृ॒न्ता॒मि॒। यवः॑। अ॒सि॒। य॒वय॑। अ॒स्मत्। द्वेषः॑। य॒वय॑। अरा॑तीः। दि॒वे। त्वा॒। अ॒न्तरि॑क्षाय। त्वा॒। पृ॒थि॒व्यै। त्वा॒। शुन्ध॑न्ताम्। लो॒काः। पि॒तृ॒षद॑नाः। पि॒तृ॒सद॑ना॒ इति॑ पितृ॒ऽसद॑नाः। पि॒तृ॒षद॑नम्। पि॒तृ॒ष॑दन॒मिति॑ पि॒तृ॒ऽसद॑नम्। अ॒सि॒ ॥१॥

Mantra without Swara
देवस्य त्वा सवितुः प्रसवेश्विनोर्बाहुभ्याम्पूष्णो हस्ताभ्याम् । आददे नार्यसीदमहँ रक्षसाङ्ग्रीवाऽअपि कृन्तामि । यवोसि यवयास्मद्द्वेषो यवयारातीर्दिवे त्वान्तरिक्षाय त्वा पृथिव्यै त्वा शुन्धन्ताँलोकाः पितृषदनाः पितृषदनमसि ॥

देवस्य। त्वा। सवितुः। प्रसव इति प्रऽसवे। अश्विनोः। बाहुभ्यामिति बाहुऽभ्याम्। पूष्णः। हस्ताभ्याम्। आ। ददे। नारि। असि। इदम्। अहम्। रक्षसाम्। ग्रीवाः। अपि। कृन्तामि। यवः। असि। यवय। अस्मत्। द्वेषः। यवय। अरातीः। दिवे। त्वा। अन्तरिक्षाय। त्वा। पृथिव्यै। त्वा। शुन्धन्ताम्। लोकाः। पितृषदनाः। पितृसदना इति पितृऽसदनाः। पितृषदनम्। पितृषदनमिति पितृऽसदनम्। असि॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
विद्वान आचार्याचे सभाध्यक्षाला (राष्ट्राध्यक्षाला) उद्देशून कथन-हे सभाध्यक्ष, ज्याप्रमाणे (पितृषदनाः) विद्वज्जनांसह, त्यांच्या संगतीत राहणारे विद्वान व्यक्ती (देवस्य) प्रकाशमय आणि (सवितुः) विश्वाची उत्त्पत्ती करणार्‍या जगदीश्‍वराने (प्रसवे) उत्पन्न केलेल्या या संसारात (अश्‍विनोः) प्राण आणि अपान यांच्या साहाय्याने आणि (बाहुभ्यामथ) बल आणि पराक्रमाद्वारे तसेच (पूष्णः) पुष्टीदायक प्राण्याच्या (हस्ताभ्याम्) धारण आणि आकर्षणशक्तीद्वारे (त्वा) तुझा स्वीकार करतात, त्याप्रमाणे मी देखील (आददे) तुला ग्रहण करतो. (प्राण आणि अपान यांच्या धारण-आकर्षण शक्तीचे महत्त्व जाणणारे योगी विद्वान राष्ट्राध्यक्षाला मंत्रणा देतात, त्याला मार्गदर्शन करतात) ज्याप्रमाणे मी (आचार्य वा सेनाध्यक्ष) (रक्षसां) राष्ट्रात दुष्ट कर्म करणार्‍या लोकांचे (दुर्जन, अन्यायी व अत्याचारी जनांचे) (ग्रीवाः) गळे (कृन्तामि) कापून टाकतो (त्यांचा विनाश करतो) त्याप्रमाणे हे सभाध्यक्ष, तूही त्या दुष्टांचा संहार कर. हे राष्ट्राध्यक्ष तू (यवः) संयोग-वियोग करणारा (राज्यव्यवस्थेसाठी शासनयंत्रणा, सेना, न्याय आदी विभागांत व्यवस्था लावणारा) (असि) आहेस, (अस्मत्) माझ्याशी (आचार्य वा विद्वानांशी (द्वेषः) द्वेष अर्थात अप्रीती करणार्‍या शत्रूंना (यवय) माझ्यापासून दूर ठेव वा त्यांचा विनाश कर व जे माझ्याशी (अरातिः) सदैव शत्रुत्व भाव ठेवतात, त्यांना पण माझ्यापासून दूर ठेव. मी न्याय व्यवहार करणारा मनुष्य (आचार्य वा न्यायाधीश) (दिवे) विद्या आदी गुणांच्या विकासासाठी (त्वां) न्यायप्रिय अशा तुझी प्रार्थना करतो आणि (अन्तरिक्षाय) आभ्यंतर व्यवहारात सुख प्राप्त करण्यासाठी (राज्याची आंतरिक शासन-व्यवस्था सुनियंत्रित करण्यासाठी) (त्वां) तुला सांगत आहे कारण की तू स्वतः सत्याचे पालन करतोस आणि सत्य-व्यवहार करणार्‍यास साहाय्य करतोस. मी (पृथिव्यै) समस्त भूमीवर तुझे राज्य व्हावे, यासाठी (त्वा) राज्यविस्तार करणार्‍या तुला प्रेरणा देतो. माझ्याप्रमाणे इतर सर्व विद्वान व आचार्यांनी (त्वा) तुला (शुन्धताम्) प्रेरणा देऊन पवित्र करावे. हे सभाध्यक्ष, तू (पितृषदनम्) विद्वानांचे घर म्हणजे आश्रय स्थान (असि) आहेस. जनकाप्रमाणे सर्व प्रजाजनांचे पालन-रक्षण करीत जा. हे सभाध्यक्षाची (नारी ) पत्नी, तू देखील पतीप्रमाणे आचरण व कर्म करीत जा. ॥1॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे सर्व विद्यांत अती निपुण व विचक्षण मनुष्य आहेत, त्यांनी परमेश्‍वराच्या या सृष्टीत आपल्यातील दुष्ट भावाचा त्याग करीत इतरांचेही दुष्टभाव दूर करतात आणि राज्यशासन चालवतात, तेच सुखांचा उपयोग घेतात. ॥1॥
Subject
आता सहाव्या अध्याय आरंभ होत आहे ^पाचव्या अध्यायानंतर सहाव्या अध्यायाचा आरंभ होत आहे. या अध्यायाच्या प्रथम मंत्रामधे उत्तम शिक्षण प्राप्त केलेल्या सुशिक्षित सभाध्यक्ष (सभापती वा राष्ट्राध्यक्ष) विद्वानाला आचार्य आदी विद्वज्जनांनी काय उपदेश द्यावा, याविषयी कथन केले आहे -