Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 8

43 Mantra
5/8
Devata- अग्निर्देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- विराट् आर्षी बृहती,निचृत् आर्षी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
या ते॑ऽअग्नेऽयःश॒या त॒नूर्वर्षि॑ष्ठा गह्वरे॒ष्ठा। उ॒ग्रं वचो॒ऽअपा॑वधीत्त्वे॒षं वचो॒ऽअपा॑वधी॒त् स्वाहा॑। या ते॑ऽअग्ने रजःश॒या त॒नूर्वर्षि॑ष्ठा गह्वरे॒ष्ठा। उ॒ग्रं वचो॒ऽअपा॑वधीत्त्वे॒षं वचो॒ऽअपा॑वधी॒त् स्वाहा॑। या ते॑ऽअग्ने हरिश॒या त॒नूर्वर्षि॑ष्ठा गह्वरे॒ष्ठा। उ॒ग्रं वचो॒ऽअपा॑वधीत्त्वे॒षं वचो॒ऽअपा॑वधी॒त् स्वाहा॑॥८॥

या। ते॒। अ॒ग्ने॒। अ॒यःशये॒त्य॑यःऽश॒या। त॒नूः। वर्षि॑ष्ठा। ग॒ह्व॒रे॒ष्ठा। ग॒ह्व॒रे॒स्थेति॑ गह्वरे॒ऽस्था। उ॒ग्रम्। वचः॑। अप॑। अ॒व॒धी॒त्। त्वे॒षम्। वचः॑। अप॑। अ॒व॒ऽधी॒त्। स्वाहा॑। या। ते॒। अ॒ग्ने॒। र॒जः॒श॒येति॑ रजःश॒या। त॒नूः। वर्षि॑ष्ठा। ग॒ह्व॒रे॒ष्ठा। ग॒ह्व॒रे॒स्थेति॑ गह्वरे॒ऽस्था। उ॒ग्रम्। वचः॑। अप॑। अ॒व॒धी॒त्। त्वे॒षम्। वचः॑। अप॑। अ॒व॒धी॒त्। स्वाहा॑ ॥८॥

Mantra without Swara
या तेऽअग्ने यःशया तनूर्वर्षिष्ठा गह्वरेष्ठा । उग्रँ वचो अपावधीत्त्वेषँ वचो अपावधीत्स्वाहा । या ते अग्ने रजः शया तनूर्वर्षिष्ठा गह्वरेष्ठा । उग्रँ वचो अपावधीत्त्वेषँ वचो अपावधीत्स्वाहा । या ते अग्ने हरिशया तनूर्वर्षिष्ठा गह्वरेष्ठा । उग्रँ वचो अपावधीत्त्वेषं वचो अपावधीत्स्वाहा ॥

या। ते। अग्ने। अयःशयेत्ययःऽशया। तनूः। वर्षिष्ठा। गह्वरेष्ठा। गह्वरेस्थेति गह्वरेऽस्था। उग्रम्। वचः। अप। अवधीत्। त्वेषम्। वचः। अप। अवऽधीत्। स्वाहा। या। ते। अग्ने। रजःशयेति रजःशया। तनूः। वर्षिष्ठा। गह्वरेष्ठा। गह्वरेस्थेति गह्वरेऽस्था। उग्रम्। वचः। अप। अवधीत्। त्वेषम्। वचः। अप। अवधीत्। स्वाहा॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ- (या) जे (ते) या (अग्ने) विद्युतरूप अग्नाचे रूप (अयःशया) सुवर्ण आदी धातूमधे सुप्तावस्थेत आहे, जी विद्युत (वर्षिष्ठा) अत्यंत महान् व शक्तीशाली आहे (गहृरेष्ठा) वस्तूंच्या अभ्यंतरी निवास करणारी आहे. तिचे (तनूः) शरीर (उग्रम) क्रूर वा विनाशक असून (वचः) दुष्ट वचनांना (अज्ञानी व्यक्तीच्या अशास्त्रीय सिद्धांताना (अपावधत्) नष्ट करणारे आहे. ती विद्युत (वचः) शब्दाला तसेच (स्वाहा) उत्तमरीत्या हवनात टाकलेल्या अन्न आदी सामग्रीला (योग्य ठिकाणी पोहचविणारी) (अपावधीत्) दूर करणारी आहे. तसेच (ते) अग्ने) विद्युतरूप अग्नीचे (कर्षिष्ठा अत्यंत विस्तीर्ण रूप असून पदार्थांच्या (गहृरेष्ठा) अभ्यंतरी स्थित आहे. तसेच त्याचे लोकलोकांतरात पसरलेले असे (तनूः) शरीर म्हणजे विद्युत शक्ती (उग्रम्) क्रूर (अशुद्ध) (वचः) वावीला (सिद्धांत व तत्त्वांना) (अपावधीत्) नष्ट करते. (त्वेषम्) प्रदीप्त (वचः) वाणीला अथवा (स्वाहा) उत्तम वाणीला (अल्पावधीत) नष्ट करते मनुष्यांनी या शक्तीचे गुण जाणून घेऊन तिच्यापासून कार्यसिद्धी केली पाहिजे ॥8॥ ^(या मंत्रात ‘उग्रं वचः’ वाणी व (त्वेषम् वचः) प्रदीप्त वारीला विद्युत नष्ट करते, दुष्टवचनांचा नाश करते, या कथनाचा अर्थबोध नीट होत नाही. महर्षींनां कोणता अर्थ अभिप्रेत होता, तो कळणे शक्य नसल्यामुळे व्याख्या व अनुवाद करतांना केवळ शब्दार्थ दिला आहे.
Essence
भावार्थ - मनुष्यांकरिता हे योग्य आहे की त्यानी सर्व स्थूल आणि सूक्ष्म पदार्थात राहणारी जी विद्युत-शक्ती आहे, त्याचे योग्य रीतीने ज्ञान मिळवावे आणि त्याच्या उपयोगाद्वारे सर्व दुःखांचा नाश करावा ॥8॥
Subject
पुन्हा ती विद्युत कशी आहे, याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -
Footnote
यजुर्वेदाचे दुसरे एक भाष्यकार पं. दामोदर सातळेकर यांनी ‘उग्रम् वचः) या शब्दांचा अर्थ - “असुरों के विषम देश में स्थित रहनेवाला वह तुम्हारा शरीर दैत्यौं की उग्रवाणी को नाश करता हुआ तथा असुरों के कहे आक्षेप रूप वचन को विनाश करता हुआ” असा केला आहे आणि अग्नी शब्दाचा अर्थ विद्युत न घेता भौतिक अग्नी घेतला आहे. तरीही अर्थ आकलन नीट होत नाही - अनुवादक)